केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा सत्कार; "सार्थ ज्ञानेश्वरी" भेट
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा सत्कार; "सार्थ ज्ञानेश्वरी" भेट
मुंबई / रमेश औताडे
रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या मान्यतेमुळे राज्य शासनाने नुकतीच आठ रोपवे प्रकल्पांना मंजुरी दिली आहे. यामध्ये पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील भिमाशंकर व निमगाव खंडोबा या तीर्थक्षेत्रांचा समावेश आहे. या निर्णयाच्या अनुषंगाने भाजपा नेते अशोकराव टाव्हरे आणि ॲड. समीर गोडसे यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे या कामाबद्दल अभिनंदन करत त्यांना "सार्थ ज्ञानेश्वरी" भेट म्हणून प्रदान केली.
भिमाशंकर आणि निमगाव खंडोबा येथे होणाऱ्या रोपवे प्रकल्पामुळे हे धार्मिक स्थळे पर्यटन केंद्र म्हणून विकसित होणार आहे. असल्याचे अशोकराव टाव्हरे यांनी सांगितले. या प्रकल्पामुळे भाविकांना या ठिकाणी ये-जा करणे सुलभ होणार आहे आणि स्थानिक अर्थव्यवस्थेलाही चालना मिळेल. तसेच, नाशिक फाटा ते राजगुरूनगर आणि वाघोली ते शिरूर या इलेव्हेटेड मार्गासाठी व तळेगाव-चाकण मार्गासाठी केंद्र आणि राज्य शासनाने निधी तरतूद केली असून लवकरच या प्रकल्पांचा कार्यारंभ होणार आहे.
Comments
Post a Comment