जिवंत सातबारा कसा करणार .....
मुंबई / रमेश औताडे
शेतीच्या मालकीहक्कात अडथळा आणणाऱ्या मयत खातेदारांच्या नावांची ७/१२ उताऱ्यावरून नोंद कमी करण्यासाठी मोठा निर्णय! महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली १ एप्रिलपासून संपूर्ण महाराष्ट्रात ‘जिवंत सातबारा मोहीम’ राबवली जाणार आहे!
या निर्णयामुळे काय फायदा होणार?
✅ सातबाऱ्यावर वारसांची अधिकृत नोंदणी होईल.
✅ खरेदी-विक्री व्यवहारात येणारे अडथळे दूर होतील.
✅ शेतीविषयक कर्ज मिळवणे सोपे होईल.
✅ वारसांमध्ये मालकीहक्कासंदर्भातील कायदेशीर वाद टाळता येतील.
महत्त्वाच्या तारखा:
📌 १ ते ५ एप्रिल – तलाठी गावनिहाय मयत खातेदारांची यादी तयार करून चावडी वाचन करतील.
📌 ६ ते २० एप्रिल – वारसांना आवश्यक कागदपत्रांसह अर्ज सादर करण्याची संधी.
📌 २१ एप्रिल ते १० मे – ई-फेरफार प्रणालीद्वारे सातबाऱ्यावर वारसांची अधिकृत nondani केली जाईल.
अर्ज करताना आवश्यक कागदपत्रे:*
✔ मृत्यू दाखला
✔ वारस प्रमाणपत्र किंवा स्वयंघोषणा प्रतिज्ञापत्र
✔ पोलिस पाटील, सरपंच किंवा ग्रामसेवक यांचा दाखला
✔ सर्व वारसांची माहिती (नाव, वय, पत्ता, मोबाईल क्रमांक)
✔ रहिवासी पुरावा
*संपूर्ण प्रक्रिया मोफत!*
कोणत्याही दलालाला किंवा अधिकाऱ्याला पैसे देऊ नका! महसूल विभागाने ही मोहीम पूर्णतः *मोफत* असल्याचे जाहीर केले आहे.
*प्रशासनाची जबाबदारी:*
*तहसीलदार* – तालुका स्तरावर समन्वय साधतील.
*जिल्हाधिकारी* – संपूर्ण मोहीम वेळेत पार पडेल याची जबाबदारी सांभाळतील.
*विभागीय आयुक्त* – राज्यभरातील प्रगतीवर देखरेख ठेवतील.
सातबाऱ्यावर आपला हक्क मिळवण्यासाठी ही सुवर्णसंधी दवडू नका!
Comments
Post a Comment