बदललेल्या जीवनशैलीमुळे आतड्याच्या कर्करोगात वाढ

       बदललेल्या जीवनशैलीमुळे आतड्याच्या कर्करोगात वाढ
मुंबई / रमेश औताडे 

धावपळीच्या व ताणतणावाच्या आयुष्यात बदललेली जीवनशैली व आहारातील बदल, व्यायामाचा अभाव, तंबाखू आणि मद्य सेवन, अनियमित झोप, लठ्ठपणा आणि मधुमेह, या सर्व कारणामुळे आतड्याच्या कर्करोगात वाढ होत आहे. वेळीच लक्ष दिले नाही तर हे प्रमाण अजून वाढत जाईल असे वास्तव समोर आले आहे.

फायबर कमी आणि प्रोसेस्ड फूड, रेड मीट, जंक फूड यांचे प्रमाण वाढले असल्याने व आहारात भाज्या, फळे, आणि तंतुमय पदार्थ नसल्यामुळे पचनसंस्था कमकुवत होते आहे. त्यामुळे आतड्यांवर ताण येतो. नियमित शारीरिक हालचाल नसल्याने स्थूलता आणि शारीरिक निष्क्रियता आल्याने आतड्यांमध्ये घाण साचून आतड्याचा कर्करोग होण्याचा धोका वाढत आहे. 

दिनचर्या व आपली आधुनिक जीवनशैली सुधारत , आहारात भरपूर फायबर, फळे, भाज्या, आणि संपूर्ण धान्यांचा समावेश करावा. व्यायामाची सवय लावावी आणि लठ्ठपणा नियंत्रित ठेवावा. तंबाखू, मद्य आणि जंक फूड टाळावे. वेळच्या वेळी तपासणी करावी. असे डॉ. पुरुषोत्तम  वशिष्ठ यांनी  " कर्करोग आतड्याचा " या अपोलो हॉस्पिटल ने आयोजित केलेल्या जनजागृती कार्यक्रमाच्या वेळी सांगितले.यावेळी डॉ अरूणेश पुनेथा, डॉ. दीपक कुमार गुप्ता, राजेश शिंदे उपस्थित होते.
अपोलो हॉस्पिटल चे पुढील कार्यक्रम अपडेट साठी
पी आर न्यूज मिडिया नेटवर्क 
संपादक रमेश औताडे 
7021777291

.

Comments

Popular posts from this blog

आता सहनशीलता संपली...राज्यभर १ ऑक्टोबरला रास्ता रोको करणार....अंगणवाडी महिलांचा सरकारला इशारा

आचारसंहिते पूर्वीची " उमेद"

स्वराज पक्षाच्या रडारवर आता शिधावाटप दुकाने