मेघमल्हार संकुलात स्वच्छता अभियान उत्साहात पूर्ण
मेघमल्हार संकुलात स्वच्छता अभियान उत्साहात पूर्ण
रमेश औताडे / नवी मुंबई
‘आपले संकुल, आपला परिसर, आपली जबाबदारी’ या संकल्पनेतून मेघमल्हार संकुलात 21 ते 23 मार्च 2025 दरम्यान भव्य स्वच्छता मोहिम राबवण्यात आली. संकुलातील विविध सोसायट्यांचे रहिवासी, सामाजिक कार्यकर्ते व स्थानिक नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवून परिसर स्वच्छतेसाठी महत्वपूर्ण योगदान दिले.
या अभियानात कचरा संकलन, गार्डन स्वच्छता आणि सार्वजनिक ठिकाणी स्वच्छतेची काळजी घेण्यावर भर देण्यात आला. या उपक्रमात संकुलाच्या नागरिकांनी स्वच्छतेबाबत जागरूकता निर्माण करण्याचे कार्य केले.
मेघमल्हार सोसायटीचे अध्यक्ष अंकुश नाईक, कार्यकारी सदस्य व स्थानिक रहिवाशांनी एकत्र येऊन स्वच्छतेच्या मोहिमेला दिशा दिली. या अभियानामुळे परिसर अधिक स्वच्छ आणि सुंदर होण्यास मदत झाली असून, भविष्यातही अशा उपक्रमांद्वारे नागरिकांनी एकत्रितपणे योगदान देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
हा उपक्रम परिसरातील स्वच्छतेसाठी प्रेरणादायी ठरणार आहे.
Comments
Post a Comment