माजी मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयातील मंजूर फाईल्स घोटाळा .....सखोल चौकशी करण्याची अरुण निटुरे यांची मागणी
माजी मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयातील मंजूर फाईल्स घोटाळा .....सखोल चौकशी करण्याची अरुण निटुरे यांची मागणी
मुंबई / रमेश औताडे
राष्ट्रीय किसान बहुजन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अरुण निटुरे यांनी पत्रकारांशी संवाद साधताना दावा केला की, एका माजी मुख्यमंत्र्यांच्या संबंधित विभाकडून मंजूर फाईल्स प्रकरणात मोठ्या प्रमाणात आर्थिक गैरव्यवहार झाला आहे. या गैरव्यवहारात माजी मुख्यमंत्री कार्यालयातील संबंधित अधिकारी गुंतले आहेत. या प्रकरणी सखोल चौकशी करण्यात यावी अशी मागणी केली आहे.
निटुरे यांनी सांगितले की, अनेक प्रकरणांमध्ये मंजूर फाइल्स नियमानुसार मंजूर केल्या गेल्या, मात्र संबंधित लाभार्थ्यांना निधी मिळालाच नाही. त्यामुळे कोट्यवधी रुपयांचा अपहार झाला आहे. हे प्रकरण गंभीर असून, त्याची चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली आहे.
ते म्हणाले की, "यामध्ये संबंधित विभागांचे अधिकार हस्तांतर, मंजूर फाइल्सचे अन्वेषण, मंत्री स्तरावरील फाइल्सचे परीक्षण आणि ईडी (ED) द्वारे चौकशी करणे आवश्यक आहे." तरच संपूर्ण सत्य समोर येईल आणि महाराष्ट्रात ईमानदारी आणि पारदर्शकता प्रस्थापित होईल, असे त्यांनी सांगितले. या प्रकरणाची चौकशी करून दोषींवर योग्य ती कारवाई करण्यात यावी," अशी मागणी केली आहे.
Comments
Post a Comment