पनवेल स्थानक परिसरात अतिक्रमण हटवण्याच्या कारवाईला विरोध
पनवेल स्थानक परिसरात अतिक्रमण हटवण्याच्या कारवाईला विरोध
मुंबई / रमेश औताडे
पनवेल स्थानकाजवळ एका स्थानिक गावगुंडाने बेकायदेशीरपणे दुकाने थाटून सार्वजनिक जागेवर अतिक्रमण केले होते. पनवेल महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाला याची माहिती मिळताच, संबंधित अधिकाऱ्यांनी त्वरित कारवाईसाठी पथक पाठवले.
अतिक्रमण हटवण्याची कारवाई सुरू होताच, संबंधित गावगुंडाने अधिकाऱ्यांना आडवले. प्रशासनाची अधिकृत कारवाई रोखण्याचा प्रयत्न करत त्याने गैरवर्तन केले. त्याच्या या वर्तनामुळे काही काळ तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली.
घटनेची गंभीर दखल घेत, पनवेल महापालिकेने तातडीने अतिरिक्त सुरक्षा व्यवस्था बोलावून, अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली अतिक्रमण हटवण्याची तातडीची कारवाई सुरूच ठेवली. अखेर संबंधित दुकाने हटवून सार्वजनिक जागा मोकळी करण्यात आली.
या घटनेनंतर, पनवेल महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी संबंधित गावगुंडाविरुद्ध स्थानिक पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करणार असल्याचे सांगितले. सरकारी कामात अडथळा आणल्याबद्दल त्याच्यावर भारतीय दंड संहितेच्या संबंधित कलमांतर्गत गुन्हा दाखल होण्याची शक्यता आहे.
Comments
Post a Comment