महाराष्ट्र राज्य 2005 पूर्वी अंशतः/ टप्पा शिक्षक - शिक्षकेतर कर्मचारी संघटनेचे आणि अन्नत्याग साखळी उपोषण आंदोलन यशस्वी.*

*महाराष्ट्र राज्य 2005 पूर्वी अंशतः/ टप्पा शिक्षक - शिक्षकेतर कर्मचारी संघटनेचे आणि अन्नत्याग साखळी उपोषण आंदोलन यशस्वी.*


 सोमवार दिनांक 17/3/2025 सकाळी संकष्टी असल्याने श्रीगणेशाची आरतीने आंदोलनास सुरुवात केली. सुरुवातीला कमी असणारे संख्या दुपारनंतर वाढत गेली. सेवानिवृत्त बांधव आदरणीय काकासाहेब कोल्हे यांच्या नेतृत्वाखाली मोठ्या संख्येने उपस्थित होते. सुरुवातीलाच डेलिगेशन माननीय मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्यासोबत व्हावे असा संघटनेचा हट्ट होता पण तिघे  मंत्री महोदय व्यस्त असल्यामुळे त्यांची भेट होऊ शकली नाही. 
      मंगळवार दिनांक 18/3/2025 रोजी सकाळी आंदोलनाला दहा वाजता सुरुवात झाली. दहा वाजताच मंडप भरून गेला होता. दुपारनंतर मा. शिक्षण मंत्री दादा भुसे साहेब यांच्यासोबत डेलिगेशन साठी बोलवण्यात आलं. सदर बैठकीसाठी  प्रा. विजय शिरोळकर,  प्रा. योगेश्वर निकम,  प्रा. संपत कदम, मा.भास्कर देशमुख आणि मा. काकासाहेब कोल्हे  सहभागी झाले होते. सुरुवातीलाच मा. शिक्षण मंत्री यांनी यूपीएस/ एनपीएस स्वीकार करावा म्हणून आग्रह केला. त्यांना त्यामधील तोटे, सेवेचा एकूण कालावधी याबद्दल सांगण्यात आले त्यामुळे 2005 पूर्वी टप्पा अनुदान असणारे शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आपला प्रस्ताव स्वीकारू शकत नाही असे सांगितले. 2005 पूर्वी कर्मचाऱ्यांच्यासाठी समिती नेमली होती, त्या समितीचा अहवालानुसार  जुनी पेन्शन देण्यात यावी याकरिता आग्रह केला. हा धोरणात्मक निर्णय असल्याने आपण इथे  तात्काळ निर्णय घेऊ शकत नाही असे  मंत्री महोदयांनी स्पष्ट केले. दिलेल्या निवेदनावरती *हिरव्या शाईने* टिपणी टाकून कार्यवाही करिता मा. शिक्षण सचिव यांना आदेशित केले.  आज पर्यंत आपला विषय अधिकृतरित्या शिक्षण सचिवांच्या कडे गेला नव्हता पण या आंदोलनामुळे  हे यश मिळाल 🙏 हेही नसे थोडके!  
 
      पण एवढ्यावर आम्ही थांबलो नाही. मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांची भेट होण्यासाठी आंदोलन पुढेही चालू ठेवले.  पुन्हा शिक्षण राज्यमंत्री, शिक्षण सचिव, मुख्यमंत्री,उपमुख्यमंत्री यांच्यासोबत डेलिगेशनसाठी प्रयत्न चालू ठेवले. अधिवेशनानंतर भेट मिळेल असे आश्वासन मिळाले.
   आंदोलनादरम्यान शिक्षण सचिवांच्याकडे कार्यवाहीसाठी गेलेले निवेदनाआधारे  प्रस्ताव तयार करून तो अर्थ खात्याकडे पाठवावा यासाठी मा.प्रकाश आबिटकर साहेब यांच्याकडे गारगोटी,  राधानगरी भागातील शिष्टमंडळ व कोअर कमिटी सदस्य पोहचले आणि त्यांनी विनंती केली. या प्रश्नांमध्ये मा.प्रकाश आबिटकर साहेबांनी व्यक्तिशः लक्ष घालण्याचे आश्वासित केले. मंत्री मा.चंद्रकांतदादा पाटील यांची धावती भेट झाली. त्यांच्या  स्वीय सहाय्यक कडे निवेदन दिले आणि मार्ग काढण्यासंबंधी विनंती केली. दादांनीही सविस्तर विषय समजून घेण्यासाठी साठी कोल्हापूर मध्ये भेटीसाठी संघटनेला निमंत्रण दिले आहे.
         बीड जिल्हाध्यक्ष मा. गवते सर यांच्या प्रयत्नाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अजितदादा गटाचे  आमदार विजयसिंह पंडित, गेवराई बीड यांनी आंदोलनास भेट देऊन, दादांच्याकडे हा विषय ताकतीने मांडू असे आश्वासित केले. मा. शिक्षक आमदार सुधाकर अडबाले  साहेब यांची भेट घेऊन सदर विषयाची चर्चा केली. मा. शिक्षक आमदार जयंत आसगावकर साहेब यांची भेट घेऊन चर्चा केली.
  आंदोलनास कार्यसम्राट आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे सर यांनी आंदोलनास भेट देऊन पेन्शन मिळवून दिल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही  असा विश्वास दिला. आमदार नाना पटोले साहेब यांनी भेट देऊन तुमचा विषय काँग्रेस पक्ष विधानसभेमध्ये ताकतीने मांडेल असे आश्वासित केले. माजी आमदार श्रीकांत देशपांडे सर,  कायम  विनाअनुदानित शिक्षक संघटनेचे उपाध्यक्ष मा. खंडेराव जगदाळे सर पेन्शन संघर्ष समितीच्या मा. संगीता ताई शिंदे, मा.सचिन पगार सर, शिक्षक नेत्या शुभांगी ताई पाटील मॅडम, मा.  नितेश खांडेकर,  महाराष्ट्र राज्य मुख्याध्यापक संघटनेचे अध्यक्ष मा. तानाजीराव माने सर व इतर पदाधिकारी आदींनी भेट देऊन मार्गदर्शन केले व जाहीर पाठिंबा दिला.

  पुढे बेमुदत आंदोलन चालू ठेवायचं  याकरिता चर्चा झाली पण प्रकृती कारणास्तव बेमुदत सेवानिवृत्त बांधवांनी व उपस्थित सदस्यांनी असमर्थता दर्शवली. त्यामुळे पाचव्या दिवशी आंदोलन स्थगित केले आहे. आंदोलनातून  मिळालेले यश म्हणजे पेन्शन मिळण्यासाठी नक्कीच *राजमार्ग* ठरला आहे. आंदोलनास अपेक्षित संख्या असती तर नक्कीच घोषणा झाली असती पण आपण बांधव फारसं मनावर घेत नाही हे दुर्दैव.
     असो आपला प्रश्न सचिव स्तरावर पोहोचला आहे. त्याला गती देणं प्रत्येक बांधवाचं काम आहे. संघटना या कामी सर्व स्तरावर सकारात्मक प्रस्ताव तयार करून वित्त विभागाकडे पाठवण्यासाठी यथाशक्ती प्रयत्न करणार आहे. पेन्शनग्रस्त बांधवांनी आपल्या भागातील आमदारांना मंत्र्यांना सोबत घेऊन शिक्षण सचिव यांच्याकडे  सकारात्मक अहवालासाठी प्रयत्न करावे लागणार आहेत. पुढे वित्त विभागाकडे आणि मुख्यमंत्र्यांच्या कडे यथाशक्ती प्रयत्न करावे लागतील. पुढे ऑनलाईन मीटिंग घेऊन भविष्यातील दिशा ठरवली जाईल.
    सदर आंदोलनासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या बांधवांचे खूप खूप धन्यवाद,  निधी उपलब्ध करून दिलेल्या बांधवांनाही धन्यवाद. अत्यंत पारदर्शकपणे हिशोब ठेवला जाईल याबद्दल निश्चिंत रहा, जमा खर्च लवकरच जाहीर केला जाईल. आझाद मैदान आंदोलन यशस्वी करण्यासाठी मा. संपर्कप्रमुख भास्कर देशमुख सर, ठाणे जिल्हाध्यक्ष राजू लहासे सर आणि त्यांचे सर्व सहकारी, कोअर कमिटी सदस्य, जिल्हाध्यक्ष, तालुकाध्यक्ष, पदाअधिकारी, मुंबई स्थित महिला भगिनी  तसेच इतर बांधव यांनी खूप चांगल्या पद्धतीने आंदोलनाचे नियोजन केले आणि यशस्वी केले. आझाद मैदान पोलीस स्टेशन अधिकारी आणि कर्मचारी वर्ग यांनी खूप चांगले सहकार्य केले याबद्दल त्यांचे खूप खूप धन्यवाद. आज पर्यंतच्या आंदोलनातील दखल घेण्यापात्र विशेष बाब म्हणजे मुंबई टीमने सेवानिवृत्त बांधवांची राहण्याची जेवणाची उत्तम सोय केली खूप खूप धन्यवाद.
      संघटनेची जबाबदारी आणखीन वाढली असून सर्व आघाड्यावरती यश प्राप्तीसाठी प्रयत्न केले जातील.  कोअर कमिटी सदस्य जिल्हाध्यक्ष अत्यंत सक्रिय राहून यश प्राप्ती शिवाय संघटना थांबणार नाही, यानिमित्ताने तुम्हाला एवढा विश्वास देतो, धन्यवाद.

राज्याध्यक्ष  प्रा.विजय शिरोळकर

Comments

Popular posts from this blog

आता सहनशीलता संपली...राज्यभर १ ऑक्टोबरला रास्ता रोको करणार....अंगणवाडी महिलांचा सरकारला इशारा

स्वराज पक्षाच्या रडारवर आता शिधावाटप दुकाने

आचारसंहिते पूर्वीची " उमेद"