फूटबॉल प्लस अकॅडमीचा दौरा ३० मार्च पासून सुरु
फूटबॉल प्लस अकॅडमीचा दौरा ३० मार्च पासून सुरु
मुंबई, / रमेश औताडे
भारतातील फूटबॉल विकासात क्रांती घडवण्याच्या उद्दिष्टाने आयोजित करण्यात आलेल्या बहुप्रतिक्षित ब्राझील लिजंड्स टूरने आपल्या अधिकृत प्रतिष्ठित प्रायोजकांची घोषणा दिमाखात केली आहे. टूरबाबतचा वाढता उत्साह आणि पाठिंबा या सहयोग करारांमधून अधोरेखित होत आहे. या टूरमध्ये एक ऐतिहासिक प्रदर्शन सामना आहे तसेच चेन्नईत सर्वसमावेशक फूटबॉल परिषदही घेतली जाणार आहे.
फूटबॉल प्लस अकॅडमीने आयोजित केलेल्या या टूरची सुरुवात ३० मार्च, २०२५ रोजी जवाहरलाल नेहरू स्टेडियमवर खेळल्या जाणाऱ्या एका नेत्रदीपक प्रदर्शन सामन्याने होणार आहे. रोनाल्डिन्हो, रिवाल्डो, ल्युशिओ, गिल्बेर्टो सिल्वा यांसारख्या ब्राझिलियन लिजंड्सचा सामना इंडियन ऑल स्टार्स आयएम विजयन, मेहताब होसेन, करनजित सिंग आदींशी होणार आहे. या सामन्यानंतर ३१ मार्च व १ एप्रिल, २०२५ रोजी दोन दिवसांची फूटबॉल परिषद होणार आहे. या परिषदेत कार्यशाळा, चर्चा आणि फिफा वर्ल्ड कप विजेत्यांसोबत संवाद होणार आहे. प्रतिष्ठित प्रायोजकां मध्ये स्ट्रीमिंग पार्टनर-फॅनकोड, तिकिटिंग पार्टनर-बुकमायशो, हायड्रेशन पार्टनर-बिस्लेरी, इंटरनेट पार्टनर-एसीटी, रेडिओ पार्टनर-रेडिओ सिटी, एनर्जी ड्रिंक पार्टनर-एनर्झाल, ट्रॅव्हल पार्टनर-ईझमायट्रिप आणि अपॅरल पार्टनर-निव्हिया आहे.
"ब्राझील लिजंड्स टूर: द गोल्डन एरामध्ये या प्रतिष्ठित सहयोगींचे स्वागत करताना आम्हाला शब्दातीत आनंद होत आहे," असे डेव्हिड आनंद म्हणाले. "भारतातील फूटबॉल अधिक उंचीवर नेण्याच्या तसेच महत्त्वाकांक्षी खेळाडूंसाठी शाश्वत मार्ग तयार करण्याच्या आमच्या कार्यात त्यांचे सहाय्य निर्णायक स्वरूपाचे आहे. त्यांच्या सहयोगामुळे परिषद प्रचंड यशस्वी होईल आणि भारतातील फूटबॉल परिसंस्थेवर दीर्घकाळ टिकणारा प्रभाव निर्माण होईल, असा आत्मविश्वास आम्हाला वाटतो."
फूटबॉल प्लस अकॅडमी आणि फूटबॉल+ समिटचे संस्थापक डेव्हिड आनंद यांच्या मते: ‘ब्राझील लिजंड्स टूर: द गोल्डन एरा’ची सुरुवात एका प्रदर्शन सामन्याने होईल. या सामन्यात फिफा वर्ल्डकप विजेत्या ब्राझीलचे रोनाल्डिन्हो, रिवाल्डो आणि गिल्बर्टो सिल्वा तसेच भारतातील ऑल-स्टार्स आयकन्स आयएम विजयन, मेहताब होसैन आदी सहभाग घेणार आहेत. दोन दिवसांच्या परिषदेत फूटबॉलचा तळागाळापासून विकास, फूटबॉल तंत्रज्ञानातील नवोन्मेष तसेच महत्त्वाकांक्षी प्रोफेशनल फूटबॉलपटूंसाठी करिअरचे मार्ग आदी विषयांवर कार्यशाळा व चर्चा होणार आहेत. देशातील विस्तृत संभाव्यता व फूटबॉलबद्दलचे प्रेम यांतून प्रतिभा शोधण्याच्या उद्दिष्टाने, मेंटॉरशिप, शिक्षण व कौशल्यविकास यांचा उपयोग करून घेत, हा कार्यक्रम भारतीय फूटबॉलसाठी रूपांतरणात्मक क्षण ठरणार आहे.
Comments
Post a Comment