Posts

इतर अधिकारात नावे असताना खरेदी दस्त नोंदणी

Image
इतर अधिकारात नावे असताना खरेदी दस्त नोंदणी  शेतकऱ्यांचा न्यायासाठी आंदोलनाचा इशारा मुंबई / रमेश औताडे  इतर अधिकारातील नावे कायम असताना खरपुडी बुद्रुक तालुका खेड, जिल्हा पुणे येथील आठ एकर जमिनीबाबत खरेदीदस्त नोंदविण्यात आला असल्याने सरकारी अधिकाऱ्यांचा कारभार पुन्हा एकदा चर्चेत आला असल्याने सामाजिक कार्यकर्ते अशोकराव टाव्हरे व इतर शेतकऱ्यांनी कठोर कारवाईची मागणी सरकारकडे केली आहे. महसुल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या आदेशानुसार जिल्हाधिकारी पुणे यांनी तहसीलदार खेड यांना पत्र दिले होते, तहसीलदार खेड यांनी १५५ अन्वये प्रकरण जिल्हाधिकारी यांचेकडे पाठविले असून प्रलंबित आहे, एकत्रीकरण योजनेतील दुरूस्तीबाबत उपसंचालक भुमी-अभिलेख यांनी चौकशी अहवाल मागितला असून खंडु काशिद व इतर हे शासनाकडे दाद मागणार आहे. हे खरेदीदस्त बेकायदा असून कारवाई झाली पाहिजे अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते अशोकराव टाव्हरे यांनी केली आहे.  शखंडु काशिद, बाजीराव काशिद, दिनकर काशिद, सिंधुताई काशिद, पमाबाई काशिद यांनी महसुल मंत्री, महसुल सचिव, महाराष्टाचे मुद्रांक नियंत्रक व नोंदणी महानिरीक्षक , जिल्...

रमेश औताडे

Image

योगेश वसंत त्रिवेदी यांना उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार

Image
            केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी केला प्रदान         मुंबई / रमेश औताडे  केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री श्री रामदास आठवले यांचे जनसंपर्क अधिकारी आणि स्टार महाराष्ट्र चे संपादक  हेमंत रणपिसे यांनी स्टार महाराष्ट्र साप्ताहिकाच्या वर्धापन दिनानिमित्त ज्येष्ठ राजकीय विश्लेषक योगेश वसंत त्रिवेदी यांना  राज्यस्तरीय उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार जाहीर केला होता. नुकतीच योगेश वसंत त्रिवेदी यांच्यावर एंजिओप्लास्टी करण्यात येऊन तीन स्टेंट बसविण्यात आले. त्यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी त्यांच्या निवासस्थानी भेट दिली.  यावेळी  त्यांना साप्ताहिक 'स्टार महाराष्ट्र'चा प्रतिष्ठित राज्यस्तरीय  उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार  प्रदान केला. या प्रसंगी संपादक  हेमंत रणपिसे आणि ज्येष्ठ पत्रकार भारत कदम हे आवर्जून उपस्थित होते. यावेळी योगेश त्रिवेदी यांनी  रामदास आठवले यांना पासष्टायन, गुरुजी आणि ज्येष्ठ पत्रकार विजय वैद्य ...

डॉ. संतोष पवार यांना मानद डॉक्टरेट प्रदान

Image
संगणक शिक्षण क्षेत्रातील २० वर्षांहून अधिक सेवेची दखल; पुणे येथे झालेल्या पदवी प्रदान समारंभात लुसियाना रिसर्च युनिव्हर्सिटीकडून गौरव;       पी आर न्यूज मिडिया नेटवर्क, मुंबई संगणक शिक्षण क्षेत्रात २० वर्षांहून अधिक काळ उल्लेखनीय सेवा देणारे तळमावले येथील डॉ. संतोष वनिता शामराव पवार यांना अमेरिकेतील लुसियाना रिसर्च युनिव्हर्सिटी (Louisiana Research University, USA) यांच्याकडून मानद डॉक्टरेट पदवी प्रदान करण्यात आली. पुणे येथे आयोजित पदवी प्रदान समारंभात विद्यापीठाच्या भारतातील समन्वयकांच्या हस्ते त्यांना ही मानद डॉक्टरेट प्रदान करून त्यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला. डॉ. संतोष पवार यांनी गेल्या दोन दशकांहून अधिक काळ संगणक शिक्षण क्षेत्रात कार्यरत राहून विद्यार्थ्यांना संगणक शिक्षणाची संधी उपलब्ध करून देणे, डिजिटल साक्षरतेला प्रोत्साहन देणे आणि आधुनिक तंत्रज्ञानाची ओळख करून देण्यासाठी योगदान दिले आहे. त्यांच्या या दीर्घकालीन सेवेची आणि कार्याची दखल घेऊन त्यांना मानद डॉक्टरेटने सन्मानित करण्यात आले. आजच्या डिजिटल युगात संगणक शिक्षण व तंत्रज्ञानाचे म...

अंगणवाडी कर्मचारी व अंगणवाडी आहार पुरवठादार महिला बचत गटांचे आझाद मैदानावर तीव्र आंदोलन

Image
मुंबई / रमेश औताडे  इस्कॉनचे सेंट्रल किचन रद्द करा! स्थानिक महिलांचा रोजगार वाचवा! अंगणवाडी कर्मचाऱ्यांना तुटपुंजी भाऊबीज नको, भरीव बोनस द्या! अंगणवाडी कर्मचाऱ्यांना पूर्ण प्रोत्साहन भत्ता द्या! आझाद मैदानावरील आंदोलनातून सरकारला इशारा* अंगणवाडी कर्मचारी व महिला बचत गटांच्या प्रश्नांवर सिटूच्या नेतृत्वाखाली राज्यव्यापी लढा उभारणार! मुंबई : २७ ऑक्टोबर २०२६ महाराष्ट्रातील शालेय पोषण आहार व अंगणवाडी आहाराचे काम वर्षानुवर्षे करणाऱ्या स्थानिक महिला बचत गट व महिला संस्थांना डावलून इस्कॉनला आहार पुरवठ्याचे काम देण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाविरोधात आज मुंबईतील आझाद मैदानावर तीव्र आंदोलन करण्यात आले. या निर्णयामुळे हजारो महिला बचत गट, स्वयंपाकी, मदतनीस आणि स्थानिक महिला संस्थांच्या रोजगारावर संकट निर्माण झाले असून, सरकारने हा निर्णय तातडीने रद्द करावा, अशी जोरदार मागणी आंदोलनातून करण्यात आली. ही अंगणवाडी आहार पुरवठादार संघटना (CITU) व अंगणवाडी कर्मचारी संघटना यांच्या वतीने आयोजित या आंदोलनात नागपूर, वर्धा, मुंबई आणि यवतमाळ येथील महिला बचत गटांच्या प्रतिनिधींनी सह...

दुष्काळ महाराष्ट्रात ; माझा वाटा किती?

Image
*दुष्काळ महाराष्ट्रात ; माझा वाटा किती? *दहा टक्के पाणी कपातीच्या निर्णयापासून नागरिकांच्या आत्मपरीक्षणापर्यंत;  आजच्या कृतींचा उद्याच्या जलसुरक्षेशी असलेला संबंध                विजयकुमार कट्टी  महाराष्ट्रातील दुष्काळाच्या बातम्या वाचताना माझ्या मनात एक प्रश्न पुन्हा पुन्हा उभा राहतो : या परिस्थितीत माझा वाटा किती? हा प्रश्न मी स्वतःला दोषी ठरवण्यासाठी विचारत नाही; पण माझा प्रत्यक्ष पाणीवापर कमी आहे, म्हणून या संकटाशी माझा संबंध नाही, असे मानण्याची सोयही स्वतःला देऊ इच्छित नाही. कारण पाण्याशी असलेले आपले नाते केवळ घरातील नळापुरते मर्यादित नसते. आपण खात असलेले अन्न, वापरत असलेले कपडे, खरेदी करत असलेल्या वस्तू, उपभोगत असलेल्या सुविधा आणि आपल्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी वापरली जाणारी नैसर्गिक संसाधने यांचा पाण्याशी प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष संबंध असतो. मग माझ्या जीवनशैलीचा आणि माझ्या कृतींचा या व्यवस्थेवर नेमका काय परिणाम होतो, हा प्रश्न मला टाळता येत नाही. दुष्काळ पडला की आपण त्याची कारणे शोधतो. पाऊस कमी झाला, हवामान बदलले, धर...

शेतकऱ्यांप्रमाणे मच्छीमारांकडे गांभीर्याने पाहावे -- रामदास संधे सरकारने

Image
मुंबई  / रमेश औताडे  शेतकऱ्यांप्रमाणेच मच्छीमारांनाही विविध सवलती आणि आर्थिक दिलासा द्यावा, अशी जोरदार मागणी मच्छीमारांचे राष्ट्रीय नेते रामदास संधे यांनी सरकारकडे केली आहे. मच्छीमारांच्या नौकांसाठी लागणाऱ्या डिझेलला एक भाव आणि इतर व्यावसायिक व उद्योगांसाठी वेगळा भाव असा दुटप्पी दर का लावला जात आहे, असा संतप्त सवाल विचारत संधे यांनी राज्य आणि केंद्र सरकारला जाब विचारला आहे. सरकारने या प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष दिले नाही, तर येत्या काळात आंदोलन अधिक तीव्र करण्याचा स्पष्ट इशारा त्यांनी दिला आहे. समुद्रात वाढलेले प्रदूषण, वारंवार येणारी चक्रीवादळे, वातावरणातील बदल आणि त्यातच डिझेलच्या गगनाला भिडलेल्या दरांमुळे सध्या पारंपरिक व यांत्रिक मच्छीमार प्रचंड आर्थिक अडचणीत सापडले आहेत. अशा परिस्थितीत मच्छीमारांच्या बोटींसाठी वापरल्या जाणाऱ्या डिझेलवर कर सवलत किंवा सबसिडी देण्याऐवजी त्यांच्याकडून इतर व्यावसायिकांप्रमाणेच जास्त दर उकळले जात आहेत. "एक देश, मग डिझेलचे दोन भाव का?" रामदास तांडेल म्हणाले, "मच्छीमारी हा मुख्यत्वे अन्नधान्य उत्पादनासारखाच एक महत्त्वाचा प्राथम...

गिरणी कामगारांच्या हक्काच्या घरासाठी महत्वाची बैठक

Image
गिरणी कामगारांच्या हक्काच्या घरासाठी महत्वाची बैठक मुंबई / रमेश औताडे  मुंबईतील गिरणी कामगारांना त्यांच्या हक्काची घरे मुंबईतच मिळावीत, या प्रमुख मागणीसाठी सनय छत्रपती शासन पक्ष आणि हेमंत धागा जनकल्याण फाऊडेंशन यांच्या संयुक्त विद्यमाने लढा उभारण्यात येत आहे. पुढील रणनीती आणि आंदोलनाची दिशा ठरविण्याकरिता शनिवार ३१ ऑक्टोबर  दुपारी २ वाजता दादर येथील आरजू हॉलमध्ये संयुक्त बैठक आयोजित करण्यात आली आहे. सनय छत्रपती शासन पक्षाचे मुंबई अध्यक्ष सर्जेराव निकम यांच्या पुढाकाराने  संपर्कप्रमुख स्वप्निल कळंबे, महेश लाड सरचिटणीस पक्षाचे कार्याध्यक्ष शंकर मोरे आणि दिव्यांग विभागाचे मुंबईतील पदाधिकारी विजय परब तसेच हेमंत धागा जनकल्याण फाउंडेशनचे अध्यक्ष हेमंत गोसावी साहेब यांच्या नेतृत्वाखाली गिरणी कामगारांच्या न्याय्य हक्कांसाठी एकत्रितपणे काम करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात येत आहे. गिरणी कामगारांना मुंबईतच घरे मिळाली पाहिजेत. त्यासाठी न्याय मिळेपर्यंत आमचा लढा सुरूच राहील असा इशारा सर्जेराव निकम यांनी दिला. घरांची ही केवळ मागणी नसून त्यांच्या कष्टाचा, त्यागाचा आणि हक्काचा...

वृक्षतोड हा कोरोनापेक्षा भयंकर रोग -- सयाजी शिंदे

Image

सह्याद्रीच्या कुशीत विनाशाचा नवा अध्याय? :

Image
सह्याद्रीच्या कुशीत विनाशाचा नवा अध्याय? :  ‘टोरंट’च्या नावाखाली निसर्गसंपदा आणि जनजीवन टांगणीला! मुंबई / रमेश औताडे  हिरवीगार अथांग झाडी, वाहणारे स्वच्छ पाण्याचे नैसर्गिक प्रवाह, सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यांत फिरणारा राज्याचा मानबिंदू आणि राज्यप्राणी असलेला 'शेकरू'... रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्याची ही मूळ ओळख आज एका मोठ्या धोक्याच्या छायेत सापडली आहे. विजेच्या निर्मितीसाठी आखला जाणारा 'टोरंट पंप स्टोरेज प्रकल्प' हा कर्जतमधील सहा गावांची समृद्ध परिसंस्था, वन्यजीव आणि स्थानिक जनजीवन पार उद्ध्वस्त करणारा ठरेल, अशी गंभीर भीती सध्या व्यक्त केली जात आहे. "वृक्षतोड हा केवळ निसर्गाचा ऱ्हास नसून तो मानवाच्या हत्येपेक्षाही मोठा आणि गंभीर गुन्हा आहे," असा ऐतिहासिक इशारा सर्वोच्च न्यायालयाने अनेकदा दिला आहे. निसर्गाचे संतुलन बिघडवणाऱ्यांवर कठोर दंडात्मक कारवायांचे निर्देश असतानाही, सरकार आणि प्रशासनाकडून निसर्गाचे रक्त आटवणाऱ्या या प्रकल्पांना हिरवा कंदील दाखवला जातोय का? असा जळजळीत सवाल आज प्रत्येक संवेदनशील नागरिक विचारत आहे. या प्रकल्पाची सर्वात धक्कादाय...

वरिष्ठ रेल्वे पोलीस संभाजी कट्यारे यांचे कौतुक

Image
मुंबई / रमेश औताडे  -   पी आर न्यूज मिडिया नेटवर्क  छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) रेल्वे पोलीस ठाण्याच्या पथकाने अपहृत झालेल्या एका वर्षाच्या बालिकेचा अवघ्या २४ तासांत शोध घेऊन तिची सुटका केली. या प्रकरणी संशयित महिला आरोपीला अटक करून तिच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक संभाजी कट्यारे यांनी दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १५ ऑक्टोबर २०२६ रोजी तक्रारदार महिला आपल्या पती आणि एक वर्षाच्या मुलीसह धाराशिव येथे जाण्यासाठी सीएसएमटी रेल्वे स्थानकात आली होती. रात्री रेल्वेची वाट पाहत असताना ते फलाट क्रमांक १२ आणि १३ च्या समोरील बाकड्याजवळ झोपले होते. १६ ऑक्टोबर रोजी पहाटे ४ ते ५.२५ वाजण्याच्या दरम्यान एका अनोळखी महिलेने झोपेचा फायदा घेत बालिकेला तिच्या पालकांच्या ताब्यातून पळवून नेले. याप्रकरणी सीएसएमटी रेल्वे पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम १३७ (२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन वरिष्ठ पोलीस निरीक्षक संभाजी कटारे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण पथक आणि ग...

मृत्यूनंतरही नेत्रदानामुळे अंधाच्या आयुष्यात उजळणार प्रकाश

Image
मोर्शी तालुक्यात कोरे परिवाराचा कौतुकास्पद निर्णय ;  मुंबई / रमेश औताडे  मृत्यूनंतरही दुसऱ्याच्या आयुष्यात प्रकाश आणण्याच्या उद्देशाने अमरावती जिल्ह्याच्या मोर्शी तालुक्यातील डोमक येथील कोरे परिवाराने अत्यंत संवेदनशील आणि प्रेरणादायी निर्णय घेतला आहे. दुर्दैवी मृत्यू झालेल्या स्व. श्री. आकाश उर्फ बंडू अंबादास कोरे (वय ४४) यांचे नेत्रदान करण्याचा निर्णय घेत त्यांनी समाजासमोर एक आदर्श निर्माण केला आहे. दिशा ग्रुप व दिशा एज्युकेशन फाऊंडेशनद्वारे संचालित 'दिशा इंटरनॅशनल आय बँक' या धर्मदाय नेत्रपेढीने ही मरणोत्तर नेत्रकमळ दान करून घेण्याची प्रक्रिया यशस्वीरीत्या पूर्ण केली. या अत्यंत कठीण प्रसंगातही कोरे परिवाराने दाखवलेल्या सामाजिक जाणिवेचे सर्वत्र कौतुक होत आहे. नेत्रदानाचे हे पवित्र आणि महान कार्य केल्याबद्दल दिशा इंटरनॅशनल आय बँकच्या संचालक मंडळाद्वारे कोरे कुटुंबियांचे मनापासून आभार मानण्यात आले. तसेच, मानवी अवयव प्रत्यारोपण कायद्यांतर्गत कोरे परिवाराला नेत्रदानाचे अधिकृत प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. या नेत्रदानामुळे लवकरच गरजवंतांच्या आयुष्यात अंधार दूर होऊन त्य...

विधान परिषद उपसभापती सचिन अहिर यांचे निर्देश

Image
विधान परिषद उपसभापती सचिन अहिर यांचे निर्देश अखिल भारतीय श्रमिक एकता युनियन चे यश मुंबई  / रमेश औताडे  मुंबई महानगर पालिकेच्या कंत्राटी ८ हजार कामगारांना  कायमस्वरूपी  करण्याच्या प्रक्रियेत अखिल भारतीय श्रमिक एकता युनियनच्या पात्र कामगारांचाही समावेश करण्याचे निर्देश मुंबई महानगरपालिकेला महाराष्ट्र विधान परिषदेचे उपसभापती सचिनभाऊ अहिर यांनी दिले. विधानभवन येथे २९ सप्टेंबर २०२६ रोजी झालेल्या या बैठकीत कामगार मंत्री आशिष जैस्वाल, महानगरपालिकेचे विजय गोपाल गोतारने, एस शेखर बांगरे, लीना इंगळे, अखिल भारतीय श्रमिक एकता युनियनचे अध्यक्ष मोहन पी. आर. देवेंद्र, सचिन साठे, वकील अनिरुद्ध कोयंडे, रोहित शिंदे उपस्थित होते. मुंबई महानगरपालिकेच्या अंतर्गत विविध योजनांमध्ये अनेक वर्षे कार्यरत असलेल्या व २०२३ पासून औद्योगिक न्यायालय, वांद्रे येथे लढा देत असलेल्या कामगारांच्या कायमस्वरूपी सेवेसंदर्भातील प्रश्नांवर या बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली. २७ जुलै २०२५ रोजी झालेल्या करारामध्ये अखिल भारतीय श्रमिक एकता युनियनलाही समाविष्ट करून घेण्यात यावे असे निर्देश सचिनभाऊ अहिर...

सामाजिक उपक्रमांचे रोटरी क्लब तर्फे आयोजन

Image
मुंबई / रमेश औताडे  रोटरी क्लबतर्फे दरवर्षी आयोजित करण्यात येणाऱ्या उपक्रमांतर्गत विविध शैक्षणिक व सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमांमध्ये विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा आणि उत्कृष्ट शिक्षकांचा गौरव अशा विशेष कार्यक्रमांचा समावेश होता. या उपक्रमांतर्गत आयोजित स्पर्धेत सुमारे ४० ते ५० शाळांमधील विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहाने सहभाग नोंदवला. एकूण २५०० ते ३००० विद्यार्थी या उपक्रमात सहभागी झाले होते. यापैकी उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या २५० ते ३०० गुणवंत विद्यार्थ्यांना बक्षिसे देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. शिवप्रसाद राठोड आणि नवनाथ पानसकर,  रोटरी क्लब ऑफ साऊथ कफ परेड मुंबई अध्यक्ष नर्गिस गौर, प्रमुख पाहुणे मुख्य डिस्ट्रिक्ट गव्हर्नर  राजन दुवा, नवनाथ पानसकर सातारा रोटरी हे उपस्थित होते. सातारा जिल्ह्यातून ७ आणि मुंबईमधून ८ अशा एकूण १५ शिक्षकांना 'नेशन बिल्डर अवॉर्ड  देऊन विशेष सन्मानित करण्यात आले.

युरोप मधील दुचाकी ब्रँड कोल्हापूर मार्गे मुंबईत

Image
युरोप मधील दुचाकी ब्रँड कोल्हापूर मार्गे मुंबईत मुंबई / रमेश औताडे कोल्हापूर म्हटले की तांबड्या मातीतील रांगडी कुस्ती आठवते. कोल्हापुरी चप्पल तर जगप्रसिद्ध आहे. मात्र कोल्हापूरच्या मराठी माणसाने  आपल्या चार पिढ्यांचा वारसा जपत युरोपातील दुचाकी वाहनाची बाजारपेठ भारतात विस्तारली आहे. चौथ्या पिढीचे नेतृत्व करणारे तुषार शेळके यांनी मुंबईत एक दुचाकी दालन उघडून त्याची प्रचिती दिली. दुचाकी वाहनांच्या बाजारपेठेत युरोपियन कंपन्यांची उपस्थिती वाढत असून, मोटोहाउस इंडियाने मुंबईत अंधेरी येथे नव्या दुचाकी दालनाचे उद्घाटन केले. या दालनात ऑस्ट्रियाची ब्रिक्स्टन मोटारसायकल आणि इटलीची व्हीएलएफ स्कूटर यांची मॉडेल्स सादर करण्यात आली आहेत. मुंबईतील वाहनप्रेमींपर्यंत आंतरराष्ट्रीय ब्रँडची वाहने पोहोचवणे आणि विक्रीनंतरची सेवा उपलब्ध करून देणे, हा नव्या दालनामागील उद्देश आहे. ब्रिक्स्टनच्या क्रॉसफायर ५०० एक्स, क्रॉसफायर ५०० एक्ससी, क्रॉमवेल १२०० आणि क्रॉमवेल १२०० एक्स या मोटारसायकली, तर व्हीएलएफच्या मॉबस्टर १३५ पेट्रोल स्कूटर आणि स्ट्राडा इलेक्ट्रिक स्कूटरची माहिती यावेळी देण्यात आली. भारतीय ...

जागतिक टपाल दिनानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन

Image
मुंबई / रमेश औताडे  ९ ते १५ ऑक्टोबर २०२६ दरम्यान राष्ट्रीय टपाल सप्ताह मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. युनिव्हर्सल पोस्टल युनियनच्या स्थापना दिनाचे औचित्य साधून जागतिक टपाल सप्ताह साजरा करण्यात आला. या वर्षासाठी जागतिक टपाल दिनाची संकल्पना ' जागतिक टपाल नेटवर्क, अमर्याद शक्यता ' अशी ठेवण्यात आली आहे. या प्रसंगी महाराष्ट्र मुख्य पोस्टमास्टर जनरल  रामचंद्र जयभाये यांनी  विविध सेवांचा लाभ घेण्याचे आवाहन केले आहे. महाराष्ट्र पोस्टात सध्या ३.५९ कोटींहून अधिक लाईव्ह बचत खाती कार्यरत असून इंडिया पोस्ट पेमेंट बँक  द्वारे लाखो नागरिकांना त्यांच्या दारात बँकिंग सेवा पुरवली जात आहे. याशिवाय आधार नोंदणी, पार्सल वितरण, आणि आंतरराष्ट्रीय टपाल सेवांमध्ये विभागाने उल्लेखनीय प्रगती केली आहे.  १२ ऑक्टोबर रोजी 'फिलाटेली दिन' साजरा केला जाणार असून यादरम्यान दुर्मिळ तिकीट प्रदर्शन, कार्यशाळा आणि २५ विशेष टपाल आवरणांचे अनावरण केले जाईल. १३ ऑक्टोबर रोजी 'आर्थिक समावेशकता दिना'निमित्त सर्व उपविभागांमध्ये 'डाक चौपाल' आयोजित करून नागरिकांना थेट बँकिंग आणि सरकारी य...

महसूलमंत्र्यांच्या आदेशाचा दोन महिन्यापासून सावळा गोंधळ

Image
महसूलमंत्र्यांच्या आदेशाचा दोन महिन्यापासून सावळा गोंधळ मुंबई / रमेश औताडे  राज्य सरकारने उपजिल्हाधिकारी यांच्या अधिकारांचे समान वाटप करण्याबाबत ३१ जुलै रोजी शासन निर्णय काढला आहे.  महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी तो तात्काळ लागू करण्याचे आदेश दिले. मात्र दोन महिना उलटूनही अनेक जिल्ह्यात हा निर्णय अंमलात आलेला नाही. या पार्श्वभूमीवर राज्यात सावळा गोंधळ सुरू झाला आहे. मुंबई, ठाणे, रायगड, पालघर यासह इतर जिल्ह्यात अद्याप जुनेच अधिकार वापरले जात असल्याचे समजते. दोन महिने उलटूनही अधिकारांचे वाटप झाले नसल्याने अप्पर मुख्य सचिव विकास खारगे पुन्हा आदेश दिले. जिल्हाधिकारी (३६ कामे), अपर जिल्हाधिकारी (२२ कामे), निवासी उप-जिल्हाधिकारी (२६ कामे), महसूल उप-जिल्हाधिकारी (१२ कामे) असे कामाचे वाटप केले आहे. सरकारने अधिकारांचे समान वाटप करून गैरवापर थांबवण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र काही जिल्ह्यांत अद्याप जुनेच अधिकार वापरले जात असल्याने महसूल विभागात गोंधळ निर्माण झाला आहे. महसूल मंत्री बावनकुळे यांनी याबाबत कठोर भूमिका घेतली असून सर्व जिल्ह्यांत जीआर तातडीने लागू करण्याचे...

धम्मचक्र परिवर्तन दिनाच्या पूर्वसंध्येला कार्यकर्ता मेळावा

Image
मुंबई / रमेश औताडे  आंबेडकरी रिपब्लिकन मोर्चाच्या वतीने १९ ऑक्टोबर रोजी धम्मचक्र परिवर्तन दिनाच्या पूर्वसंध्येला कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. सीताबर्डी येथील विदर्भ हिंदी साहित्य संमेलनाच्या सभागृहात हा मेळावा होणार आहे. असे मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष नारायणराव बागडे यांनी सांगितले. नारायण बागडे अध्यक्षस्थानी असून अण्णासाहेब कटारे यांच्या हस्ते मेळाव्याचे उद्घाटन होणार आहे. रिपब्लिकन चळवळीतील ज्येष्ठ नेते भाई तानसेन नन्नवरे, सैय्यद रालिम बापू , डॉ. सुधा जनबंधू , सुनीता दाभाडे , दशरथ कांबळे आणि उत्तमराव गायकवाड यांची प्रमुख उपस्थिती असून स्वागताध्यक्ष प्राध्यापक रमेश दुपारे आणि वैशाली तभाने आहेत. कार्यकर्त्यांची आर्थिक परिस्थिती, रिपब्लिकन पक्षाची सद्यस्थिती व वाटचाल, प्रस्थापित रिपब्लिकन नेत्यांची भूमिका आणि सत्तेसोबतचे संबंध यावर चर्चा होणार आहे.  नामदेवराव निकोसे, देवेंद्र बागडे, रमेश दुपारे, प्रवीण आवळे, प्रकाश कांबळे, राजूदादा पांजरे, डॉ. सुधा जनबंधू, वैशाली तभाने, पुण्यशील बोदिले, घेमाजी बागडे, अतुल गंगापूरकर आणि नरेश खन्ना उपस्थित होते.

पर्यावरण रक्षणासाठी सौरऊर्जा काळाची गरज

Image
मुंबई / रमेश औताडे सौरऊर्जा प्रकल्प ही काळाची गरज असून त्यासाठी युद्धपातळीवर काम सुरू झाले पाहिजे. असे मत व्यक्त करत आमदार कालिदास कोळमकर यांनी स्वतःच्या आमदार फंडातून लोकमान्य नगर प्रियदर्शनी सहकारी गृहनिर्माण सोसायटीच्या टेरेसवर सौरऊर्जा प्रकल्पाचा शुभारंभ केला.  या सौरऊर्जा प्रकल्पामुळे सोसायटीचा वीजखर्च कमी  होणार असून, पर्यावरणपूरक ऊर्जेच्या वापरालाही चालना मिळणार आहे. गृहनिर्माण सोसायट्यांनी उपलब्ध जागेचा योग्य वापर करून सौरऊर्जेसारखे पर्यायी ऊर्जा स्रोत स्वीकारण्याची गरज आहे असे प्रकल्पाच्या उद्घाटनप्रसंगी सोसायटीचे अध्यक्ष नितीन भाऊराव पाटील यांनी सांगितले. यावेळी सचिव जेसिका थॉमस अँथोनी, खजिनदार आयुष्यमान प्रकाश कांबळे अन्य पदाधिकारी व सभासद उपस्थित होते.

मातंग समाजाच्या आरक्षणासाठी आंदोलन

Image
मुंबई  / पी आर न्यूज मिडिया नेटवर्क  29 सप्टेंबर 2026 मुंबई आरक्षण मोर्चात सहभागी झालेले देऊळवाडी इथून कार्यकर्ते बालाजी सोपानराव सूर्यवंशी नरसिंग सोपान  सूर्यवंशी विठ्ठल दिगंबर गडीकर रामकृष्ण निवृत्ती गडीकर गंगाधर वामनराव गडीकर प्रदीप भगवान गडीकर मारुती दिनकर गडीकर साहेबराव वामनराव सूर्यवंशी राजकुमार सोपान सूर्यवंशी,टोटल आपल्या देऊळवाडी येथून 9 व्यक्तीचा समावेश मुंबईच्या मोर्चामध्ये सहभाग