पर्यावरण रक्षणासाठी सौरऊर्जा काळाची गरज


मुंबई / रमेश औताडे

सौरऊर्जा प्रकल्प ही काळाची गरज असून त्यासाठी युद्धपातळीवर काम सुरू झाले पाहिजे. असे मत व्यक्त करत आमदार कालिदास कोळमकर यांनी स्वतःच्या आमदार फंडातून लोकमान्य नगर प्रियदर्शनी सहकारी गृहनिर्माण सोसायटीच्या टेरेसवर सौरऊर्जा प्रकल्पाचा शुभारंभ केला. 

या सौरऊर्जा प्रकल्पामुळे सोसायटीचा वीजखर्च कमी  होणार असून, पर्यावरणपूरक ऊर्जेच्या वापरालाही चालना मिळणार आहे. गृहनिर्माण सोसायट्यांनी उपलब्ध जागेचा योग्य वापर करून सौरऊर्जेसारखे पर्यायी ऊर्जा स्रोत स्वीकारण्याची गरज आहे असे प्रकल्पाच्या उद्घाटनप्रसंगी सोसायटीचे अध्यक्ष नितीन भाऊराव पाटील यांनी सांगितले. यावेळी सचिव जेसिका थॉमस अँथोनी, खजिनदार आयुष्यमान प्रकाश कांबळे अन्य पदाधिकारी व सभासद उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

तर बेस्टचा वीजपुरवठा व बस सेवा १८ जून पासून बंद होणार

विधेयक मागे न घेतल्यास देशव्यापी संपाचा इशारा!

मेघमल्हारच्या रणरागिनींचा महिला दिनी सन्मान