इतर अधिकारात नावे असताना खरेदी दस्त नोंदणी
इतर अधिकारात नावे असताना खरेदी दस्त नोंदणी
शेतकऱ्यांचा न्यायासाठी आंदोलनाचा इशारा
मुंबई / रमेश औताडे
इतर अधिकारातील नावे कायम असताना खरपुडी बुद्रुक तालुका खेड, जिल्हा पुणे येथील आठ एकर जमिनीबाबत खरेदीदस्त नोंदविण्यात आला असल्याने सरकारी अधिकाऱ्यांचा कारभार पुन्हा एकदा चर्चेत आला असल्याने सामाजिक कार्यकर्ते अशोकराव टाव्हरे व इतर शेतकऱ्यांनी कठोर कारवाईची मागणी सरकारकडे केली आहे.
महसुल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या आदेशानुसार जिल्हाधिकारी पुणे यांनी तहसीलदार खेड यांना पत्र दिले होते, तहसीलदार खेड यांनी १५५ अन्वये प्रकरण जिल्हाधिकारी यांचेकडे पाठविले असून प्रलंबित आहे, एकत्रीकरण योजनेतील दुरूस्तीबाबत उपसंचालक भुमी-अभिलेख यांनी चौकशी अहवाल मागितला असून खंडु काशिद व इतर हे शासनाकडे दाद मागणार आहे. हे खरेदीदस्त बेकायदा असून कारवाई झाली पाहिजे अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते अशोकराव टाव्हरे यांनी केली आहे.
शखंडु काशिद, बाजीराव काशिद, दिनकर काशिद, सिंधुताई काशिद, पमाबाई काशिद यांनी महसुल मंत्री, महसुल सचिव, महाराष्टाचे मुद्रांक नियंत्रक व नोंदणी महानिरीक्षक , जिल्हाधिकारी व तहसीलदार खेड यांच्याकडे कडे तक्रार केली आहे.
शंतनु श्रीरंग भावे याने इतर अधिकारातील नावे कमी करण्यासाठी तहसीलदार खेड यांचेकडे १५५ अन्वये इतर अधिकारातील नावे वगळण्यासाठी अर्ज दिला होता, त्यावरील निर्णय प्रलंबित आहे. भावे व इतरांची एकत्रीकरण अधिकारी यांचे आदेशानुसार सन १९७५ मध्ये कब्जेदार सदरी नावे दाखल झाली असून त्यापुर्वी कोठेही नावे नव्हती. गेल्या शंभर वर्षापासून अधिक काळ वडिलोपार्जित परंपरेनुसार सर्व जमिनीचा ताबा व वहिवाट ही काशिद यांची आहे.
इतर अधिकारातील नावे न वगळता दुय्यम निबंधक खेड यांनी खरेदीदस्त क्र.१०४१३/२०२६ ची नोंदणी केल्याने त्यांच्यावर कारवाईची मागणी तसेच संबधित खरेदीदस्ताची नोंद प्रमाणित करण्यात येऊ नये अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.
Comments
Post a Comment