युरोप मधील दुचाकी ब्रँड कोल्हापूर मार्गे मुंबईत
युरोप मधील दुचाकी ब्रँड कोल्हापूर मार्गे मुंबईत
मुंबई / रमेश औताडे
कोल्हापूर म्हटले की तांबड्या मातीतील रांगडी कुस्ती आठवते. कोल्हापुरी चप्पल तर जगप्रसिद्ध आहे. मात्र कोल्हापूरच्या मराठी माणसाने आपल्या चार पिढ्यांचा वारसा जपत युरोपातील दुचाकी वाहनाची बाजारपेठ भारतात विस्तारली आहे. चौथ्या पिढीचे नेतृत्व करणारे तुषार शेळके यांनी मुंबईत एक दुचाकी दालन उघडून त्याची प्रचिती दिली.
दुचाकी वाहनांच्या बाजारपेठेत युरोपियन कंपन्यांची उपस्थिती वाढत असून, मोटोहाउस इंडियाने मुंबईत अंधेरी येथे नव्या दुचाकी दालनाचे उद्घाटन केले. या दालनात ऑस्ट्रियाची ब्रिक्स्टन मोटारसायकल आणि इटलीची व्हीएलएफ स्कूटर यांची मॉडेल्स सादर करण्यात आली आहेत. मुंबईतील वाहनप्रेमींपर्यंत आंतरराष्ट्रीय ब्रँडची वाहने पोहोचवणे आणि विक्रीनंतरची सेवा उपलब्ध करून देणे, हा नव्या दालनामागील उद्देश आहे.
ब्रिक्स्टनच्या क्रॉसफायर ५०० एक्स, क्रॉसफायर ५०० एक्ससी, क्रॉमवेल १२०० आणि क्रॉमवेल १२०० एक्स या मोटारसायकली, तर व्हीएलएफच्या मॉबस्टर १३५ पेट्रोल स्कूटर आणि स्ट्राडा इलेक्ट्रिक स्कूटरची माहिती यावेळी देण्यात आली. भारतीय बाजारपेठेत विविध प्रकारच्या मोटारसायकली आणि इलेक्ट्रिक स्कूटर्सना मिळणारा प्रतिसाद लक्षात घेता, या नव्या दालनामुळे मुंबईतील दुचाकी बाजारपेठेत आणखी एक पर्याय उपलब्ध झाला आहे.
Comments
Post a Comment