मृत्यूनंतरही नेत्रदानामुळे अंधाच्या आयुष्यात उजळणार प्रकाश
मोर्शी तालुक्यात कोरे परिवाराचा कौतुकास्पद निर्णय ;
मुंबई / रमेश औताडे
मृत्यूनंतरही दुसऱ्याच्या आयुष्यात प्रकाश आणण्याच्या उद्देशाने अमरावती जिल्ह्याच्या मोर्शी तालुक्यातील डोमक येथील कोरे परिवाराने अत्यंत संवेदनशील आणि प्रेरणादायी निर्णय घेतला आहे. दुर्दैवी मृत्यू झालेल्या स्व. श्री. आकाश उर्फ बंडू अंबादास कोरे (वय ४४) यांचे नेत्रदान करण्याचा निर्णय घेत त्यांनी समाजासमोर एक आदर्श निर्माण केला आहे.
दिशा ग्रुप व दिशा एज्युकेशन फाऊंडेशनद्वारे संचालित 'दिशा इंटरनॅशनल आय बँक' या धर्मदाय नेत्रपेढीने ही मरणोत्तर नेत्रकमळ दान करून घेण्याची प्रक्रिया यशस्वीरीत्या पूर्ण केली. या अत्यंत कठीण प्रसंगातही कोरे परिवाराने दाखवलेल्या सामाजिक जाणिवेचे सर्वत्र कौतुक होत आहे.
नेत्रदानाचे हे पवित्र आणि महान कार्य केल्याबद्दल दिशा इंटरनॅशनल आय बँकच्या संचालक मंडळाद्वारे कोरे कुटुंबियांचे मनापासून आभार मानण्यात आले. तसेच, मानवी अवयव प्रत्यारोपण कायद्यांतर्गत कोरे परिवाराला नेत्रदानाचे अधिकृत प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. या नेत्रदानामुळे लवकरच गरजवंतांच्या आयुष्यात अंधार दूर होऊन त्यांना नवीन दृष्टी मिळणार आहे.
पी आर न्यूज मिडिया नेटवर्क
रमेश औताडे 7021777291
Comments
Post a Comment