सामाजिक उपक्रमांचे रोटरी क्लब तर्फे आयोजन
मुंबई / रमेश औताडे
रोटरी क्लबतर्फे दरवर्षी आयोजित करण्यात येणाऱ्या उपक्रमांतर्गत विविध शैक्षणिक व सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमांमध्ये विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा आणि उत्कृष्ट शिक्षकांचा गौरव अशा विशेष कार्यक्रमांचा समावेश होता.
या उपक्रमांतर्गत आयोजित स्पर्धेत सुमारे ४० ते ५० शाळांमधील विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहाने सहभाग नोंदवला. एकूण २५०० ते ३००० विद्यार्थी या उपक्रमात सहभागी झाले होते. यापैकी उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या २५० ते ३०० गुणवंत विद्यार्थ्यांना बक्षिसे देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.
शिवप्रसाद राठोड आणि नवनाथ पानसकर, रोटरी क्लब ऑफ साऊथ कफ परेड मुंबई अध्यक्ष नर्गिस गौर, प्रमुख पाहुणे मुख्य डिस्ट्रिक्ट गव्हर्नर राजन दुवा, नवनाथ पानसकर सातारा रोटरी हे उपस्थित होते. सातारा जिल्ह्यातून ७ आणि मुंबईमधून ८ अशा एकूण १५ शिक्षकांना 'नेशन बिल्डर अवॉर्ड देऊन विशेष सन्मानित करण्यात आले.
Comments
Post a Comment