शेतकऱ्यांप्रमाणे मच्छीमारांकडे गांभीर्याने पाहावे -- रामदास संधे सरकारने
मुंबई / रमेश औताडे
शेतकऱ्यांप्रमाणेच मच्छीमारांनाही विविध सवलती आणि आर्थिक दिलासा द्यावा, अशी जोरदार मागणी मच्छीमारांचे राष्ट्रीय नेते रामदास संधे यांनी सरकारकडे केली आहे. मच्छीमारांच्या नौकांसाठी लागणाऱ्या डिझेलला एक भाव आणि इतर व्यावसायिक व उद्योगांसाठी वेगळा भाव असा दुटप्पी दर का लावला जात आहे, असा संतप्त सवाल विचारत संधे यांनी राज्य आणि केंद्र सरकारला जाब विचारला आहे. सरकारने या प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष दिले नाही, तर येत्या काळात आंदोलन अधिक तीव्र करण्याचा स्पष्ट इशारा त्यांनी दिला आहे.
समुद्रात वाढलेले प्रदूषण, वारंवार येणारी चक्रीवादळे, वातावरणातील बदल आणि त्यातच डिझेलच्या गगनाला भिडलेल्या दरांमुळे सध्या पारंपरिक व यांत्रिक मच्छीमार प्रचंड आर्थिक अडचणीत सापडले आहेत. अशा परिस्थितीत मच्छीमारांच्या बोटींसाठी वापरल्या जाणाऱ्या डिझेलवर कर सवलत किंवा सबसिडी देण्याऐवजी त्यांच्याकडून इतर व्यावसायिकांप्रमाणेच जास्त दर उकळले जात आहेत.
"एक देश, मग डिझेलचे दोन भाव का?" रामदास तांडेल म्हणाले, "मच्छीमारी हा मुख्यत्वे अन्नधान्य उत्पादनासारखाच एक महत्त्वाचा प्राथमिक व्यवसाय आहे. तरीही सरकार मच्छीमारांकडे दुर्लक्ष करत आहे. इतर उद्योग आणि व्यावसायिकांसाठी डिझेलचा दर वेगळा आणि मच्छीमारांच्या बोटींसाठी वेगळा भाव असा दुटप्पी न्याय का? सरकारने मच्छीमारांनाही शेतकऱ्यांचा दर्जा देऊन त्यांच्यासाठी सवलतींचा पाऊस पाडला पाहिजे.
डिझेलवरील व्हॅट व इतर कर पूर्णपणे माफ करून मच्छीमारांना सवलतीच्या दरात डिझेल उपलब्ध करून द्यावे, अशी प्रमुख मागणी तांडेल यांनी केली आहे. सरकारने या संवेदनशील प्रश्नावर तातडीने गांभीर्याने पावले उचलावीत, अन्यथा संपूर्ण किनारपट्टीवर मच्छीमार रस्त्यावर उतरतील आणि आंदोलन अधिक तीव्र करतील, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.
Comments
Post a Comment