Posts

Showing posts from February, 2025

मराठा आरक्षण पीपीटी सादरीकरण मुख्यमंत्री पहाणार

Image
       रवींद्र काळे पाटील मराठा आरक्षण क्रांती मोर्चा व ठोक मोर्चा यांच्या वतीने मराठा आरक्षण चिंतन आंदोलन समितीच्या मागण्या शासनाने स्वीकारल्या असल्याची माहिती एका भव्य पत्रकार परिषदेत शासनाचे वरिष्ठ प्रतिनिधी जलसंधारण मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली.  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जलसंधारण मंत्री राधाकृष्ण विखे पाटील  यांचे मार्फत सविस्तर मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले होते.छत्रपती संभाजीनगर येथे दिनांक २३ फेब्रुवारी २०२५ पासुन मराठा आरक्षण व इतर मागण्यांना मंजुरी मिळावी म्हणून समन्वयक रमेश केरे पाटील यांनी आमरण उपोषण सुरू केलेले होते. मराठा समाजाच्या वतीने सविस्तर मागण्या करण्यात आल्या होत्या त्याचे वाचन मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि मंत्री अतुल सावे यांचे समक्ष मराठा क्रांती मोर्चाचे मुख्य समन्वयक रविंद्र काळे पाटील यांनी सविस्तर रित्या केले.   मराठा आरक्षणा बाबत सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेल्या क्युरेटिव्ह पीटिशन साठी जेष्ठ अभ्यासक डॉ.राजेंद्र दाते पाटील यांनी अत्यंत अभ्यासु व उपयुक्त असे न्याय निवाडे घटना पीठाचे निर्...

शासनाने फसवणूक केल्यामुळे गिरणी कामगारांचे आंदोलन

Image
शासनाने फसवणूक केल्यामुळे गिरणी कामगारांचे आंदोलन मुंबई / रमेश औताडे मुंबईतल्या गिरणी कामगारांना शासनाने पनवेल येथील कोन गावात घरे देऊन फसवणूक केली आहे. १६० फुटाची  घरे  सहा लाखात देण्याचे आमिष देत चक्क फसवले आहे. त्यामुळे त्यांनी आता आझाद मैदानात आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.अशी माहिती शुक्रवारी मुंबई मराठी पत्रकार संघ येथे आयोजित पत्रकार परिषदेत समितीचे अध्यक्ष गणेश सुपेकर व कार्याध्यक्ष डॉ .ॲड .संतोष सावंत यांनी दिली. २०१६ ला झालेल्या २४१७ घरांच्या म्हाडा च्या लॉटरीतील मूळ गिरणी कामगार आता त्रस्त झाले आहेत. २०१९ ला यापैकी काहींनी पूर्ण  पैसे भरले.  म्हाडाने २०२४ ला म्हणजे तब्बल ५ वर्षांनी ताबा दिला, मात्र ताबा देताना २०२४ -२५ साठी ३५११ आणि आता ४५६० रुपये महिना देखभाल खर्चाची मागणी केली. गिरणी कामगारांनी कर्ज काढुन  म्हाडाचे पैसे भरले आणि ५ वर्ष ते पैसे म्हाडाने वापरले. असे असताना त्या लोकांचा कमीतकमी ३ वर्षाचा देखभाल खर्च माफ करण्यासाठी कामगारांनी आंदोलन केले असता १ वर्षाची माफी देऊन पुन्हा  विचार करू असे आश्वासन देण्याऱ्या म्हाडाने आता...

महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर काश्मीर ते कन्याकुमारी निर्भय महिलांचा प्रवास

Image
भारतासह जागतिक स्तरावर महिलांना रोमांचकारी रस्ते प्रवास अनुभवता यावा तसेच सुरक्षित रस्ते प्रवासाला चालना मिळावी, यासाठी जागतिक महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर ८ मार्च रोजी काश्मीर ते कन्याकुमारी अशी धाडसी महिला रस्ते प्रवास मोहीम सुरू करण्यात आली असून या मोहित ५० हून अधिक निर्भय महिला ३,७०० किमी अंतराचा थरारक प्रवास करणार आहेत. अशी माहिती मुंबईत पत्रकार परिषदेत आमदार प्रसाद लाड यांनी दिली.  यावेळी एम्बार्क च्या संचालिका  नीता लाड,  मेधा जोसेफ  आणि सुजल पटवर्धन आदी एम्बार्क चे पदाधिकारी उपस्थित होते. प्रसाद लाड म्हणाले, "हे महिलांच्या सक्षमीकरणासाठी एक आगळेवेगळे पाऊल आहे. या ऐतिहासिक मोहीमेला भारताचे केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या रस्ते सुरक्षा अभियान २०२५ अंतर्गत पाठबळ मिळाले आहे.  राष्ट्रीय स्तरावरील सुरक्षित रस्त्यांच्या दृष्टीने ही मोहीम केवळ एक प्रवास नसून महिलांसाठी सशक्ततेचा ठोस संदेश आहे. रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाच्या सहकार्याने हा उपक्रम महिलांना आपल्या स्वप्नांचा मार्ग स्वतः निवडण्यास प्रोत्साहन देणारा ठ...

विधी व न्याय विभागाकडून आझाद मैदानातील आंदोलनाची दखल

Image
माजी सरन्यायाधीश डाॅ.धनंजय चंद्रचूड एका जाहीर कार्यक्रम दरम्यान व्यासपीठावर बोलत असताना एक गुन्हेगार आरोपी व्यासपीठावर उपस्थित होता,  त्या गुन्हेगारांवर कारवाई करावी. तसेच डाॅ.चंद्रचूड यांनी अयोध्ये येथील राम मंदिर निकालापूर्वी केलेल्या वक्तव्याची गृह विभागाने तपासणी करावी या व इतर मागण्यासाठी कवी लेखक सामाजिक कार्यकर्ते अशोकराव टाव्हरे यांनी आझाद मैदान मुंबई येथे धरणे आंदोलन सुरू केले होते. या आंदोलनाची दखल विधी व न्याय विभागाचे अवर सचिव राजेश वडनेरकर यांनी घेतली असून, गृह विभागाला कार्यवाही बाबत लेखी निर्देश दिले आहेत. अशी माहिती  टाव्हरे यांनी आझाद मैदानात गुरुवारी दिली. कनेरसर जि.पुणे येथे २० ऑक्टोबर २०२४ रोजी भारताचे तत्कालीन सरन्यायाधीश डाॅ.धनंजय चंद्रचूड एका जाहीर कार्यक्रमासाठी आले होते. त्यावेळी गुन्हेगारीचा दावा प्रलंबित असलेला जवाहर दौंडकर हा डॉ. चंद्रचूड व्यासपीठावर उपस्थित होता, त्याच्यावर स्री विनयभंग व मारहाणीचा गुन्हा प्रलंबित आहे. हा सर्व प्रकार पाहणारी आयोजक कमिटी व संबधित पोलिस अधिकारी यांच्यावर कारवाई का नको ? असा सवाल करत  टाव्हरे यांनी आं...

वंध्यत्वाच्या समस्येवर मातृत्व चळवळ हि अभिमानाची गोष्ट -- पोलिस उपआयुक्त रश्मी नांदेडकर यांचे मत

Image
प्रदूषण, शहरीकरण, मानसिक ताण तणाव, रासायनिक घटकांचे हवेतील वाढते प्रमाण, खाण्या-पिण्याच्या सवयी इतर गोष्टींमुळे हार्मोन्स बदल होत आहेत. यामुळे निर्माण होणाऱ्या वंध्यत्वाच्या समस्या वाढत आहेत. विज्ञान व श्रद्धा यांचा संगम पुरातन काळापासून आहे. आजच्या युगात मदरहुड हॉस्पिटलने मोठी जनजागृती व व्यापक मातृत्व चळवळीचा शुभारंभ केला आहे हि मोठी अभिमानाची गोष्ट आहे असे मत पोलिस उप आयुक्त रश्मी नांदेडकर यांनी व्यक्त केले. नवी मुंबईत खरखर येथे  मदरहुड फर्टिलिटी आणि आयव्हीएफ च्या वतीने " नेक्स्ट जनरेशन फर्टिलिटी ट्रीटमेंट सेंटर "  शुभारंभ सोहळ्या प्रसंगी त्या बोलत होत्या. यावेळी मुख्य संचालक सर्वानन आर, वरिष्ठ आयव्हीएफ मार्गदर्शन डॉ रिटा मोदी, सेवा संचालक डॉ रुपाली कदम,  आदी डॉक्टर यावेळी उपस्थित होते. हे केंद्र प्रजनन उपचारांच्या शोधात असणाऱ्या जोडप्यांना क्लिनिकल तज्ज्ञ, भूणशास्त्रातील आधुनिक तंत्रज्ञान, अत्याधुनिक आयव्हीएफ लॅब आणि सकारात्मक गर्भधारणा साध्य करण्यासाठी जोडप्यांच्या प्रवासाला पाठिंबा देण्यासाठी एक अनुभव टीम उपलब्ध करुन देत आहे. या शुभारंभ प्रसंगी बोलताना, ...

न्या. चंद्रचूड यांचे नेमके वक्तव्य काय ?

Image
भारताचे माजी सरन्यायाधीश डाॅ.धनंजय चंद्रचूड यांनी आपल्या वक्तव्यावर  ठाम राहिले तर जनता गोंधळात पडणार नाही. न्या. चंद्रचूड यांचे नेमके वक्तव्य काय ? याबाबत त्यांनीच खुलासा करावा अशी मागणी कवी लेखक समाजसेवक अशोकराव टाव्हरे यांनी मंगळवारी मुंबई मराठी पत्रकार संघ येथे पत्रकार परिषदेत केली. सर्वोच्च न्यायालयाने अयोध्या राम मंदिर खटल्याबाबतचा निकाल सन २०१९ मध्ये दिला होता. त्यावेळी पाच न्यायमुर्तींच्या खंडपीठात न्या. डाॅ. धनंजय चंद्रचूड यांचाही समावेश होता. त्यानंतर पाच वर्षांनी पुणे येथील कनेरसर या गावात  जाहीर सभेत त्यांनी  " अयोध्या निकालापुर्वी आम्हाला काही मार्ग सुचला नाही, त्यामुळे देवापुढे बसलो होतो "  असे  वक्तव्य केले होते. तर आता काही दिवसापूर्वी जागतिक पातळीवरील एका न्यूज चॅनेल वर दिलेल्या मुलाखतीत ते म्हणाले " राममंदिर निकालापुर्वी देवाला प्रार्थना केली नाही " असे सांगितले. अशी दोन वक्तव्य त्यांनी केली. या सर्व प्रकरणी  निर्माण झालेला संभ्रम दुर करावा अशी मागणी टाव्हरे यांनी पत्रकार परिषदेत केली.

लहुजी वस्ताद साळवे पुण्यतिथी अभिवादन

Image
समाजसुधारक आणि क्रांतिकारक लहुजी वस्ताद साळवे यांच्या पुण्यतिथीनिमित्त समाजसेविका सुनीता तुपसौंदर्य यांनी पुष्पहार अर्पण करून त्यांना अभिवादन केले. या वेळी त्यांनी वंचित आणि उपेक्षित घटकांसाठी कार्य करण्याचा संकल्प केला. सुनीताताई अनेक वर्षांपासून ग्रामीण भागातील पाणीटंचाई, शिक्षण, आरोग्य आणि महिलांच्या सशक्तीकरणासाठी कार्यरत आहेत. त्यांनी मोफत आरोग्य शिबिरे, शिक्षण उपक्रम आणि जलसंधारण प्रकल्प राबवत समाजात सकारात्मक बदल घडवले आहेत. या कार्यक्रमाला सामाजिक कार्यकर्ते, विद्यार्थी आणि स्थानिक नागरिकांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली. लहुजी वस्ताद साळवे यांच्या विचारांची प्रेरणा समाजासाठी दिशादर्शक आहे, असे मत उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केले. कार्यक्रमाच्या शेवटी सुनीता तुपसौंदर्य यांनी लहुजी वस्ताद यांच्या विचारांचा जागर करण्याची आणि वंचित, शोषित घटकांसाठी कार्यरत राहण्याची ग्वाही दिली.

लहुजी वस्ताद साळवे पुण्यतिथी अभिवादन

Image
समाजसुधारक आणि क्रांतिकारक लहुजी वस्ताद साळवे यांच्या पुण्यतिथीनिमित्त समाजसेविका सुनीता तुपसौंदर्य यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. या प्रसंगी त्यांनी समाजातील उपेक्षित वंचित घटकांसाठी लहुजी वस्ताद यांनी दिलेल्या लढ्याचा महत्त्वपूर्ण वारसा पुढे नेण्याचा संकल्प केला. "जगेन तर समाजासाठी आणि मरेन तर समाजासाठी" या ब्रीदवाक्याने प्रेरित होऊन सुनीता ताई गेल्या अनेक वर्षांपासून समाजसेवेत कार्यरत आहेत. ग्रामीण भागातील पाणीटंचाई, आरोग्यसेवा, शिक्षण आणि महिलांच्या हक्कांसाठी त्या सातत्याने लढा देत आहेत. विशेषतः गरिबांसाठी मोफत आरोग्य शिबिरे, शिक्षण उपक्रम आणि शुद्ध पाण्यासाठी प्रयत्नशील राहून त्यांनी समाजात सकारात्मक बदल घडवला आहे. या कार्यक्रमाला सामाजिक कार्यकर्ते, विद्यार्थी आणि स्थानिक नागरिकांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली. लहुजी वस्ताद साळवे यांच्या कार्यातून मिळणारी प्रेरणा समाजासाठी दिशादर्शक आहे, असे मत उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केले. कार्यक्रमाच्या शेवटी सुनीता तुपसौंदर्य यांनी लहुजी वस्ताद यांच्या विचारांचा जागर करण्याची आणि वंचित, शोषित घटकांसाठी कार्यर...

कोराना काळात जीवाची बाजी लावणाऱ्या डॉक्टरांना न्याय द्यावा

Image
      डॉ अरुण कोळी यांची  सरकारकडे गांभीर्यपूर्वक मागणी कोराना काळात उत्तम कामगीरी करणाऱ्या स्वतःच्या जिवाची पर्वा न करता कर्तव्य बजावणाऱ्या शासकीय वैद्यकिय अधिकाऱ्यांना सरकारने न्याय द्यावा अशी मागणी महाराष्ट्र राज्य  राजपत्रित वैद्यकिय अधिकारी महासंघाचे राज्य अध्यक्ष डॉ अरुण कोळी यांनी केली आहे. वैद्यकिय अधिकारी गट- ब यांचा अंतीम टप्प्यात असलेला पदोन्नतीचा प्रस्ताव विभागीय पदोन्नती समिती समोर मांडुन या वैद्यकिय अधिकाऱ्यांना तात्काळ पदोन्नती आदेश मिळावेत यासाठी वेळोवेळी पत्रव्यवहार झाला आहे तरीही सरकार गंभीर नाही. मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या १०० दिवसाच्या कार्यक्रमात शासकिय अधिकारी तथा कर्मचारी यांचे पदोन्नतीचे प्रस्ताव मार्गी लावन्याचे चे धोरण निश्चित केलेले आहे. त्याचप्रमाणे आदेश देत आम्हाला न्याय द्यावा व मुळ राज्य आरोग्य सेवा गट-ब वैद्यकिय अधिकारी संवर्गातील २१९ पदोन्नतीस प्रतीक्षेत आहेत त्यांनाही न्याय द्यावा अशी मागणी डॉ कोळी यांनी केली . सार्वजनिक आरोग्य विभागातील आरोग्य सेवा आयुक्तालया अंतर्गत महाराष्ट्र वैद्यकिय अधिकारी  गट ब यांची अंती...

पद्मश्री नामदेव ढसाळ स्मृती साहित्य संमेलन मुंबईत मोठ्या उत्साहात संपन्न झाले

Image
भारतीय कामगार चळवळीचे जनक नारायण मेघाजी लोखंडे साहित्यनगरी मुंबई येथे आयोजित केलेल्या साहित्य संमेलनामध्ये नामदेव ढसाळ यांच्या अलौकिक साहित्याचा गौरव करत विविध क्षेत्रातील ज्येष्ठ श्रेष्ठ मान्यवरांच्या उपस्थितीत मंत्रालयासमोर यशवंतराव चव्हाण सेंटर मुंबई येथील सभागृहात स्वागताध्यक्ष अशोकराव टाव्हरे यांच्या उपस्थितीत संपन्न झाले. ८९व्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डाॅ.श्रीपाल सबनीस यांनी यावेळी बोलताना ओघवत्या शैलीत नामदेव ढसाळांचे साहित्य, दलित पँथरचे कार्य विशद केले. गोलपिठापासून सुरू झालेला साहित्यप्रवास विश्वसाहित्यिक म्हणून अलौकिक असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.  संमेलनाध्यक्ष व गझलकार म.भा.चव्हाण यांनी नामदेव ढसाळांच्या कर्मभुमीत अशोकराव टाव्हरे यांनी परिश्रम घेऊन आयोजित केलेले साहित्य संमेलन वाचनसंस्कृती वृध्दींगत होण्यासाठी मोलाचे ठरणार असल्याचे  सांगितले. स्वागताध्यक्ष अशोकराव टाव्हरे  प्रास्ताविक करताना म्हणाले,  पद्मश्री नामदेवराव ढसाळ स्मृती साहित्य संमेलनाचे दुसरे वर्ष आहे. यानिमित्त कवीसंमेलन, परिसंवाद याद्वारे नवोदितांना व्यासपीठ उ...

*डॉ महाजन हॉस्पिटलमध्ये स्मार्ट आयसीयू युनिटला सुरूवात*

Image
*डॉ महाजन हॉस्पिटलमध्ये स्मार्ट आयसीयू युनिटला सुरूवात* मृत्युच्या दरात उभ्या असलेल्या रुग्णांना वाचवण्यासाठी रुग्णालयातील यंत्रणा महत्त्वाची भूमिका बजावते. अत्यंत गंभीर स्थिती असलेल्या रुग्णाला अतिदक्षता विभागात आणले जाते व त्यावर तातडीने उपचार केले जातात. अशा रुग्णांना उत्तमोत्तम उपचार मिळावे म्हणून डॉ महाजन हॉस्पिटलने पुढाकार घेतला आहे. नवीन तंत्रज्ञान व आधुनिक उपचार पद्धतीच्या माध्यमातून आरोग्यासंबंधी गंभीर गुंतागुतीवर मात करण्यासाठी होम क्रिटिकल केअरचे प्रणेते म्हणून ओळखल्या जाणाऱ्या फाल्कन आयसीयूने नुकतीच महाजन हॉस्पिटलशी हातमिळवणी करत मुंबईत दुसरे स्मार्ट आयसीयू युनिट स्थापन केले आहे.  अनुभवी तज्ज्ञ तसेच आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने चालवल्या जाणाऱ्या जागतिक दर्जाच्या आयसीयू सुविधांच्या वाढत्या गरजा लक्षात घेऊन ही सुविधा रुग्णांकरिता नक्कीच फायदेशीर ठरणार आहे.  फाल्कन आयसीयू संपूर्ण महाराष्ट्रात आरोग्यसेवेची सुलभता वाढवण्याच्या आपल्या वचनबद्धतेची अंमलबजावणी करते. नवीन आयसीयू युनिट मुंबईतील गंभीर आजारांनी पिडीत रुग्णांना आवश्यक सुविधा प्रदान करण्य...

महाराष्ट्राचा विकास सरपंचांच्याच मदतीनेच होणार

Image
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना अपेक्षित असलेला राज्याचा विकास सरपंचाच्या मदतीने निश्चितपणे पुढील काळात घडवू , महाराष्ट्राचा विकास सरपंचांच्या सहकार्याने होणार आहे. त्यासाठी त्यांच्या सर्व मागण्यांचा विचारही सरकार गांभीर्याने करत आहे. अशी ग्वाही अखिल भारतीय सरपंच परिषदेच्या शिष्टमंडळाला ग्रामविकास मंत्री विजयकुमार गोरे यांनी दिली. राज्यातील २७ हजार ९५१ ग्रामपंचायती मधील सरपंचाच्या शिष्टमंडळाने ग्रामविकास मंत्री विजयकुमार गोरे यांची मुंबईत मंत्रालयासमोरील कार्यालयात भेट घेतली. सरपंचांच्या मागण्यांचे निवेदन सरपंच परिषदेचे अध्यक्ष जयंत पाटील यांनी दिले. थकीत मानधन द्यावे, ग्रामपंचायत सदस्यांचा मासिक मीटिंग उपस्थिती भत्ता द्यावा व त्यात भरीव वाढ करावी. ग्रामपंचायती आर्थिक दृष्ट्या सक्षम करण्यासाठी ग्रामपंचायतीचे उत्पन्नवाढ व कर वसुली यावर परिणामकारक उपाययोजना कराव्यात .  सरपंचांना विमा संरक्षण व पेन्शन लागू व्हावी. स्वर्गीय सरपंच देशमुख यांच्या हत्यानंतर असे प्रकार परत घडू नयेत म्हणून सरपंचाच्या फिर्यादीवरून शासकीय कामात अडथळा असा गुन्हा नोंद करण्यासाठी सरपंच व कर्मचारी स...

जागतिक मंदिर संमेलनाचे आयोजन

Image
जगभरातील मंदिर परिसरात सर्व धर्मीय भक्तांना व मंदिर प्रशासनाला काय काय अडचणी येतात, अन्नदान, पूजा पाठ, गर्दी नियंत्रण व्यवस्थापन, सुरक्षा व्यवस्थापन,  मंदिर व भाविक याच्यासाठी सर्वांगीण व्यवस्थापन कसे असले पाहिजे यासाठी १७ ते १९ फेब्रुवारी २०२५ असे तीन दिवस जागतिक मंदिर संमेलनाचे आयोजन  करण्यात आले आहे. अशी  माहिती आमदार प्रसाद लाड यांनी मुंबईत एका पत्रकार परिषदेत मंगळवारी दिली. " मंदिरांचा महाकुंभ " ही संकल्पना समोर ठेवत हे संमेलन तिरुपती बालाजी या जगप्रसिद्ध ठिकाणी होत आहे. जगभरातील हजारो मंदिर प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत. मंदिर प्रशासन आणि व्यवस्थापन यासाठी जगभरातील सर्व सनातन धर्माची निमंत्रित मंडळी या संमेलनात आपले विचार, मार्गदर्शन, सूचना याचे आदान प्रदान करणार आहेत. टेम्पल कनेक्ट आणि अंत्योदय प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम होणार आहे. हिंदू, शीख, बौद्ध आणि जैन संस्थाना एकत्र आणत मंदिर व्यवस्थापनाच्या क्षेत्रात नवनवीन संकल्पना मांडण्याचे आणि पारंपरिक संस्कृतीचे जतन करण्याचे हे एक जागतिक व्यासपीठ असेल असे टेम्पल कनेक्ट चे संस्थापक गिरीश क...

दिवाकर शेजवळ यांना मूकनायक पुरस्कार

Image
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या' मूकनायक' या पाक्षिकामागील सामाजिक जाणीव आणि बांधिलकी जपणाऱ्या पत्रकारितेचा वारसा जतन करण्यासाठी मराठवाड्यातील' शाक्य मूनी प्रतिष्ठानने यंदा राज्यस्तरीय ' मूकनायक पुरस्कार' सुरू केला आहे. पहिल्या वर्षातील या प्रतिष्ठेच्या पुरस्कारासाठी ज्येष्ठ पत्रकार दिवाकर शेजवळ यांची निवड करण्यात आली आहे. ते गेली ३५ वर्षे पत्रकारितेत असून मुंबई मराठी पत्रकार संघाचे कार्यकारिणी सदस्य आहेत. या पुरस्काराचे स्वरूप २५ हजार रुपये रोख, मानपत्र आणि स्मृतिचिन्ह असे आहे. त्याची घोषणा बीड येथे झालेल्या एका बैठकीनंतर' शाक्य मूनी प्रतिष्ठान' चे अध्यक्ष प्रा. शरद वंजारे आणि सचिव प्रा. डॉ. संजय कांबळे यांनी एका पत्रकाद्वारे केली आहे. या बैठकीला प्रा. दिपक जमधाडे, सारीका वाघमारे, किशोरी मस्के, उज्वल गायकवाड, सिध्दार्थ वाघमारे हे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. दिवाकर शेजवळ यांना' मूकनायक पुरस्कार' येत्या रविवारी १६ फेब्रुवारी २०२५ रोजी सकाळी ११ वाजता अशोका हॉल पी.ई.एस अभियांत्रिकी महाविद्यालय, छत्रपती संभाजीनगर येथे आयोजित समारंभात...

शहरी व ग्रामीण भागातील विकास कामे ठप्प

Image
खेडेगावातील रस्ते, पुल, सरकारी रुग्णालये असे अनेक ठिकाणी सरकारने बांधकाम भूमिपूजन केले आहे. काही ठिकाणी बांधकाम सुरू आहे तर काही बांधकाम पूर्ण झाली आहेत. मात्र कंत्राटदारांची ९० हजाराची देणी बाकी आहेत. आम्ही यापुढची कामे कशी करायची ? असा सवाल बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडिया ने मुंबईत एका जाहीर पत्रकार परिषदेत सरकारला केला आहे. महाराष्ट्र राज्य कंत्राटदार संघटना एकत्र आल्या असून त्यांनी सरकारी बांधकामगेल्या पाच दिवसांपासून  थांबवले आहे. पायाभूत व बांधकाम प्रकल्पांवर त्याचा विपरीत परिणाम होत असल्याने प्रलंबित कंत्राटदारांनी आता हे आंदोलन अधिक तीव्र करण्याचा निर्णय घेतला आहे. बीएआय चे उपाध्यक्ष आनंद गुप्ता यावेळी म्हणाले, सार्वजनिक बांधकाम विभागाकडून तब्बल ४६,००० कोटी रुपये, ग्रामविकास विभागाकडून ८,००० कोटी रुपये, जल जीवन मिशनकडून १८,००० कोटी रुपये, जलसंपदा विभागाकडून १९,७०० कोटी रुपये, नगरविकास विभाग १७,००० कोटी येणे बाकी आहे.  'बीएआय' चे माजी अध्यक्ष  अविनाश पाटील म्हणाले, "गेल्या दोन-तीन वर्षांमध्ये जी कामे केली गेली आहेत, त्यांच्यापोटी जो परतावा येणे बाकी आहे. तर...

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ताज बँडस्टॅन्ड प्रकल्पाचे भूमिपूजन

Image
भारतातील आघाडीची हॉस्पिटॅलिटी कंपनी, इंडियन हॉटेल्स कंपनीने " ताज बँडस्टॅन्ड प्रोजेक्ट " ची घोषणा केली आहे. ताज बँडस्टॅन्ड मुंबईच्या स्कायलाईनची नवी व्याख्या रचण्यासाठी सज्ज करत नवीन लॅन्डमार्क होणार आहे.  जगभरात नाव असलेले ताजमहल हॉटेल हे नाव कुणाला माहिती नसेल असे नाही. सोमवारी मुख्यमंत्री  देवेंद्र फडणवीस आणि टाटा सन्सचे अध्यक्ष एन चंद्रशेखरन यांच्या उपस्थितीत "  ताज बँडस्टॅन्ड प्रकल्प " ची घोषणा करत भूमिपूजन केले. पहिले ताजमहल हॉटेल मुंबईत १९०३ साली सुरु केले गेले आणि तेव्हापासून आजतागायत, एक शतकभराहून अधिक काळापासून ताज ब्रँड या शहराच्या संस्कृतीचा अविभाज्य भाग बनून राहिला आहे. ताजच्या महान वारशाचे एक प्रमुख उदाहरण ताज बँडस्टॅन्ड पुढील शतकभर प्रतिष्ठित ब्रँड ताजचे नेतृत्व करत राहील.असे मत ताज चे मुख्य कार्यकारी अधिकारी पुनीत छटवाल यांनी सांगितले. दोन एकर जागेमध्ये पसरलेल्या ताज बँडस्टँडमध्ये ३३० खोल्या आणि ८५ अपार्टमेंट्स असतील.जागतिक दर्जाच्या सुविधांनी हे सुसज्ज असेल. या प्रकल्पामध्ये शहराच्या वैविध्यपूर्ण आणि समृद्ध सांस्कृतिक वारशाचे प्रतिबिंब अ...

पिओपी च्या गणेश मूर्तीवर बंदी आल्याने लाखो मूर्तिकार होणार बेरोजगार

Image
१३० वर्षाची परंपरा असणाऱ्या गणेश उत्सवातील  प्लास्टर ऑफ पॅरिस च्या मूर्तीवर बंदी आणण्यासाठी  काही पर्यावरण प्रेमी संस्था आक्रमक झाल्याने , हरित लवाद, महानगर पालिका, प्रदूषण मंडळ व इतर संबंधित प्राधिकरणाने आक्रमक भूमिका घेत राज्यातील पी ओ पी च्या मूर्ती विसर्जित करण्यावर बंदी आणली आहे. त्यामुळे गणेश मूर्तिकार व त्यावर अवलंबून असणारे लाखो कारागीर व त्यांचे कुटुंब हवालदिल झाले आहे. सरकारने याबाबत गांभीर्याने विचार करत आहाला न्याय द्यावा. अशी मागणी मूर्तिकार संघटनेने केली आहे. मुंबई प्रेस क्लब येथे या संदर्भात माहिती देताना संघटनेचे पदाधिकारी हितेश जाधव म्हणाले की, पी ओ पी गणेश मूर्ती मुळे पर्यावरणाची हानी होते असे पर्यावरण प्रेमी यांचे म्हणणे , तर शाडूची माती आम्ही आणायची कुठून असा सवाल त्यांनी  केला. या विषयावर  पर्यावरण संस्था न्यायालयात गेल्या आहेत. मात्र त्यांनी याला पर्याय दिला नाही. असा सवाल करत सिद्धेश दिघोळे म्हणाले, सरकारने याबाबत मूर्तिकार व त्यांच्या कुटुंबियांच्या रोजगाराचा विचार करावा. आम्ही जगायचे कसे ? असा सवाल केला. शाडू मातीची मूर्ती की पी ओ...

भारताला जोडणारी " राष्ट्रीय एकात्मता यात्रा "

Image
पूर्वोत्तर भारत आणि देशातील इतर भागाला जोडणारी " राष्ट्रीय एकात्मता यात्रा " आहे. असे मत केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांनी मुंबईत एका जाहीर पत्रकार परिषदेत केले. अखिल भारतीय विद्यार्थी परिषद व आंतर-राज्य छात्र जीवन दर्शन आयोजित 'राष्ट्रीय एकात्मता यात्रा २०२५' जनता अभिनंदन सोहळा मुंबई विद्यापीठात संपन्न झाला. यावेळी संघटनमंत्री आशिष चौहान, मुंबई विद्यापीठाचे डॉ. रवींद्र कुलकर्णी, विशाद मफतलाल, सचिव दीपक दळवी,  गितेश सामंत, रुपाली बोरीकर,  प्रशांत माळी आदी पदाधिकारी उपस्थित होते. "वेगळ्या भाषा, वेगळे वेश, तरीपण महान भारत देश', अशी घोषणा अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेत कार्यकर्ते देत असतात. ही घोषणा म्हणजे 'अभाविप' आणि राष्ट्रीय एकात्मता यात्रा यांच्यातील साम्यता आहे. देशात एकात्मतेचा भाव विविध समाजात निर्माण व्हावा हा या यात्रेमागचा उद्देश आहे असे आशिष चौहान यांनी सांगितले.  एकूण ३२ प्रमुख विभागात २३० युवा प्रतिनिधी या यात्रेत सहभागी झाले आहेत. त्यात १२५ युवक आणि १०५ युवती आहेत. ६८ हे जनजाती क्षेत्रातील आहेत. मुंबई, दिल्ली, चंदीगड, हैदराबाद, ...

अजून किती दिवस शेतकऱ्यांनी सरकारच्या आश्वासनवर जगायचे ?

Image
" जय जवान ,  जय किसान " असा नारा देत आम्ही शेतकऱ्यांचे कैवारी आहोत असे सांगणाऱ्या सरकारच्या विरोधात शेतकरी पुन्हा आक्रमक झाले आहेत. अजून किती दिवस आम्ही सरकारच्या आश्वासनवर जगायचे ? असा सवाल या शेतकऱ्यांनी केला आहे. मुरबाड तालुक्यातील सन २०२० - २१ मधील ५०० शेतकरी ३१ मार्च पर्यंत भात देऊनही सरकारचे सर्वर डाऊन आसल्याने शेतकरी आपल्या हक्काच्या  पैशापासून वंचीत राहीले आहेत. लोकमित्र रमेश हिंदुराव यांच्या नेतृत्वाखाली २०२१ पासुन पत्रव्यवहार व आझाद मैदानात आंदोलने करण्यात केली. मात्र आश्वासन देऊनही अद्याप हक्काचे पैसे  मिळाली नाहीत. याबाबत अन्न नागरी पुरवठा विभागाने कॅबीनेट मंजुरीसाठी प्रस्ताव सादर केला आहे. त्याला मंजुरी मिळावी म्हणून आमदार  किसन कथोरे यांनी मंत्री धनंजय मुंढे यांना पत्रही दिली आहे. आता मंत्रिमंडळ मंजुरी मिळून शासनाने आदेश काढावे यासाठी मुरबाडचे शेतकरी पुन्हा १० फेब्रुवारी पासून आझाद मैदान येथे उपोषणास बसण्याचे पत्र दिले आहे . उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री छागन भुजबळ आदी सर्वांना निवेदन दिली आहेत. मंत्री महोदयांनी आखासने दिली आहेत. रमे...

पिओपी च्या गणेश मूर्तीवर बंदी आल्याने लाखो मूर्तिकार होणार बेरोजगार

Image
१३० वर्षाची परंपरा असणाऱ्या गणेश उत्सवातील  प्लास्टर ऑफ पॅरिस च्या मूर्तीवर बंदी आणण्यासाठी  काही पर्यावरण प्रेमी संस्था आक्रमक झाल्याने , हरित लवाद, महानगर पालिका, प्रदूषण मंडळ व इतर संबंधित प्राधिकरणाने आक्रमक भूमिका घेत राज्यातील पी ओ पी च्या मूर्ती विसर्जित करण्यावर बंदी आणली आहे. त्यामुळे गणेश मूर्तिकार व त्यावर अवलंबून असणारे लाखो कारागीर व त्यांचे कुटुंब हवालदिल झाले आहे. सरकारने याबाबत गांभीर्याने विचार करत आहाला न्याय द्यावा. अशी मागणी मूर्तिकार संघटनेने केली आहे. मुंबई प्रेस क्लब येथे या संदर्भात माहिती देताना संघटनेचे पदाधिकारी हितेश जाधव म्हणाले की, पी ओ पी गणेश मूर्ती मुळे पर्यावरणाची हानी होते असे पर्यावरण प्रेमी यांचे म्हणणे , तर शाडूची माती आम्ही आणायची कुठून असा सवाल त्यांनी  केला. या विषयावर  पर्यावरण संस्था न्यायालयात गेल्या आहेत. मात्र त्यांनी याला पर्याय दिला नाही. असा सवाल करत सिद्धेश दिघोळे म्हणाले, सरकारने याबाबत मूर्तिकार व त्यांच्या कुटुंबियांच्या रोजगाराचा विचार करावा. आम्ही जगायचे कसे ? असा सवाल केला. शाडू मातीची मूर्ती की पी ओ...

विश्वसाहित्यिक पद्मश्री नामदेवराव ढसाळ स्मृती साहित्य संमेलन मुंबईत होणार

Image
विश्वसाहित्यिक पद्मश्री नामदेवराव ढसाळ स्मृती साहित्य संमेलन मुंबईत यशवंतराव चव्हाण सेंटर येथे १२ फेब्रुवारी रोजी कुलस्वामिनी साहित्य परिषदेच्या वतीने होत असल्याची माहिती संमेलनाचे स्वागताध्यक्ष लेखक व सामाजिक कार्यकर्ते कवी अशोकराव टाव्हरे यांनी पत्रकार परिषदेत दिली. संमेलनाचे उद्घाटन डॉ. श्रीपालजी सबनीस हे करणार असून संमेलनाध्यक्ष ज्येष्ठ साहित्यिक म.भा.चव्हाण आहेत. संमेलनाचे स्वागताध्यक्ष लेखक व सामाजिक कार्यकर्ते कवी अशोकराव टाव्हरे तर  निमंत्रक राजुशेठ खंडीझोड हे आहेत. १५ फेब्रुवारी २०२४ रोजी पहिले स्मृती साहित्य संमेलन  कनेरसर येथे पार पडले होते. आता दुसरे साहित्य संमेलन स्वर्गीय नामदेवराव ढसाळ यांच्या कर्मभुमीत होत आहे. संमेलन स्थळास भारतीय कामगार चळवळीचे जनक रावबहाद्दुर नारायण मेघाजी  लोखंडे साहित्य नगरी असे नाव देण्यात येणार आहे.  केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या कार्यावरील लेखक अशोकराव टाव्हरे यांचे " विकासाचा राजमार्ग " या पुस्तकाची तिसरी आवृत्ती व " हायवे ऑफ डेव्हलपमेंट " या पुस्तकाची दुसऱ्या आवृत्तीचे प्रकाशन होणार आहे. यावेळी खेड तालुका ...

अपोलो हॉस्पिटल ची कर्करोग मुक्त राष्ट्रव्यापी मोहीम

Image
भारतात दरवर्षी कॅन्सरच्या १४ लाखांहून जास्त केसेस आढळून आल्या असून २०२५ पर्यंत त्यांची संख्या वाढून १५ लाखांवर पोहोचेल. यासाठी जनजागृती करण्यासाठी अपोलो कॅन्सर सेंटर मे जागतिक कॅन्सर दिवसाचे औचित्य साधून एक राष्ट्रव्यापी मोहीम सुरु केली असल्याची माहिती पत्रकार परिषदेत दिली. कॅन्सर हा एक अधिसूचित आजार म्हणून वर्गीकृत केला जावा. अशी मागणी " युनिफाय टू नोटिफाय " या मोहिमेमध्ये सरकारकडे करण्यात आली आहे. यावेळी इंडियन मेडिकल असोसिएशनचे डॉ. घनश्याम दुलेरा  यांनी सांगितले की,  राष्ट्रीय कॅन्सर रजिस्ट्री मध्ये भारतीयांमध्ये कॅन्सर केसेसची संख्या वेगाने वाढत आहे. त्यामुळे भारत ही जगाची 'कॅन्सर कॅपिटल' बनू शकते.  अपोलो हॉस्पिटल्स चे संचालक व वरिष्ठ तज्ञ डॉ.अनिल डिक्रुझ म्हणाले की, "कॅन्सरला एक अधिसूचित आजार बनवल्याने राज्यस्तरावर कॅन्सर बद्दल लोकांची समज बदलेल. तर अपोलो हॉस्पिटल चे विभागीय कार्यकारी अधिकारी अरुणेश पुनेथा म्हणाले की, यामुळे भारतातील कॅन्सर देखभाली संदर्भातील क्रांतिकारी बदल घडून येतील.  देशातील १५ राज्यांनी कॅन्सरला एक अधिसूचित आजार म्हणून आधीच ...

अनिल गलगली यांचा सत्कार

Image
चांदिवली सफेद पुल येथील श्री साई श्रद्धा मित्र मंडळातर्फे साई भंडारा आयोजित करण्यात आला होता. यावेळी आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली, संस्थापक शैलेंद्र दीक्षित, संस्थेचे अध्यक्ष रवींद्र मोरे, महेंद्र दीक्षित, राजाराम माने, संजय लोहार, मधु सावंत, चेतन कोरगांवकर उपस्थित होते. पी आर न्यूज  रमेश औताडे 

साथरोग कायद्यात सुधारणा करत आरोग्य विभागातील रिक्त पदे भरणार - आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर

Image
साथीचे रोग नियंत्रणात राहावे यासाठी साथरोग कायद्याची कठोर अंमलबजावणी करावी. तसेच साथरोग कायद्यात  सुधारणा करण्याच्या सूचना देत रिक्त पदांचा व प्रतीक्षा यादिवरील जागा तात्काळ भरण्याच्या सूचना सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर सोमवारी मंत्रालयात झालेल्या बैठकीत सांगितले. यावेळी आरोग्य मंत्री म्हणाले, वैदयकीय अधिकायांच्या s २० मधील प्रतिक्षा यादीतील ४०० जागा १५ दिवसांच्या आत भरल्या जाणार आहेत. तसेच   वैदयकीय अधिकाऱ्यांच्या रिक्त पदांचा तात्काळ आढावा घेऊन (साधारण२००० पदे ) पदभरती प्रक्रिया राबविण्याच्या सूचनाही आरोग्य मंत्र्यांनी दिल्या. जिल्हा शल्य चिकित्सक व जिल्हा आरोग्य अधिकारी तज्ञ वैद्यकिय अधिकारी s २३ पदे एमपीएससी कक्षेबाहेर काढून सर्व पदे विभागीय पदोन्नतीद्वारे भरण्याची तात्काळ कार्यवाही करावी अशा सूचना त्यांनी यावेळी दिल्या. माणसाच्या जीवनात सर्वात महत्वाचा असणारा आरोग्याचा प्रश्न गंभीर होऊ नये व त्यासाठी काय काय उपाययोजना केल्या पाहिजेत याबाबत त्यांनी उपाययोजना करण्यास सांगितले. नगरविकास व ग्रामविकास विभागाने पाणी , अन्न , स्वच्छ्ता य...

मुंबई म्युनिसिपल कामगार संघ आक्रमक

Image
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर dr babasaheb ambedkar यांनी मुंबई महानगरपालिकेत सर्वात पहिली मुंबई म्युनिसिपल कामगार संघ हि युनियन स्थापन केली. युनियन ने आत्तापर्यंत कामगारांचे अनेक प्रश्न सोडवले आहेत. अजूनही त्याचा पाठपुरावा सुरू आहे. युनियन चे अध्यक्ष  ऍड . प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर , कार्याध्यक्ष  शेषराव राठोड, सरचिटणीस  संजीवन पवार व इतर सर्व पदाधिकारी वेळोवेळी कामगारांच्या प्रश्नासाठी आंदोलन करत असतात. आत्ताही अनेक मागण्या घेऊन आंदोलन सुरू आहे. आमच्या मागण्या मान्य केल्या नाही तर अजून तीव्र आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिला. नियुक्त जागी काम न करता गेल्या अनेक वर्षापासून वेतन घेत असलेल्या सफाई कामगार, कक्ष परिचर यांच्यावर परिपत्रक क्र. प्रकाअ पाच ०८ ऑगस्ट २०१९ नुसार कार्यवाही करावी.  रूग्ण कक्षामध्ये दाखल रूग्णसंख्येच्या प्रमाणात कक्ष परिचर, आया, महिला सफाई कामगार व पुरूष सफाई कामगार मिळावेत.  सर्व संवर्गाच्या रिक्त व पदोन्नतीच्या जागा तातडीने भरण्याबाबत. क्षय या आजारपणासाठी दिली जाणारी विशेष रजा आजार बरा होऊन कर्तव्यावर हजर होईपर्यंत मिळणेबा...

विरारमध्ये विरार रन २०२५ चे आयोजन

Image
  विरार :- यंग स्टार ट्रस्ट, अमेय क्लासिक क्लब, विराट फाऊंडेशन आयोजित विरार रन - २०२५, ९ फेब्रुवारी रविवार रोजी पार पडणार आहे. यात १८ वर्षांवरील सर्व वयोगटातील १० किमी दौड आयोजित करण्यात आली आहे. तसेच ६ ते १६ वयो गटातील मुलं व मुलींसाठी १.५ किमी दौड आयोजित करण्यात आली आहे.  १.५ किमी दौडमध्ये भाग घेणाऱ्या सर्वांसाठी प्रवेश मोफत आहे. तसेच यावेळी फन रन दरवर्षीप्रमाणे आयोजित करण्यात येते. तर विरार रन मध्ये महिलांसाठी विशेष 'वॉकथॉन' आयोजित करण्यात आली आहे. वॉकथॉनमध्ये कमीत कमी ५ जास्तीत जास्त १० महिलांचा एक संघ बनवणे आवश्यक आहे. प्रत्येक संघाला ५ सामाजिक संदेश देणे आवश्यक असणार आहे. यातील ४ सामाजिक संदेश आम्ही दिलेले आहेत तर पाचवा संदेश हा संघांना बनवायचा आहे. जसे वसई विरार महानगरपालिका मॅरॅथॉनचे ब्रीद वाक्य 'स्त्री भ्रूण हत्या टाळा, निसर्गाचा समतोल पाळा', विरार रनचे ब्रीद वाक्य 'गो ग्रीन गो क्लीन', विरार पोलिसांचे ब्रीद वाक्य 'से नो टू ड्रग्स', विरार मेडिकल असोसएशनचे ब्रीद वाक्य 'से नो टू डिप्रेशन' हे चार संदेश असणार आहेत. तर पाचवा सामाजि...

मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करणार

Image
एस टी को ऑपरेटिव्ह बँकच्या नवीन संचालक मंडळाने घेतलेल्या चुकीच्या निर्णयांमुळे बँकेच्या कार्यप्रणालीवर आणि कर्मचाऱ्यांच्या हितांवर प्रतिकूल परिणाम झाला आहे. या संदर्भात, आपण रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया , सहकार आयुक्त व राज्य सरकारकडे वारंवार तक्रारी करूनही त्याची दाखल घेतली जात नसल्याने या प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करणार असल्याची माहिती को ऑपरेटिव्ह बँक एम्प्लॉइज युनियनचे अध्यक्ष व माजी खासदार आनंदराव अडसूळ यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली. महाराष्ट्र राज्यातील राज्य परिवहन महामंडळातील कर्मचारी आणि अधिकारी यांची पगारदार वर्गाची स्टेट ट्रान्सपोर्ट को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड आहे त्यांच्या राज्यभर ५० शाखा व विस्तारित कक्षा आहेत. २०२३ साली बँकेची सभासद संख्या ६५ हजार असून ठेवी २ हजार ३०० कोटी आहेत तर कर्ज १ हजार ७०० कोटी व एकूण व्यवसाय ४ हजार कोटींचा होता . राज्यातील कर्मचारी वर्गाची सक्षम असलेली अशी ही बँक होती . या बँकेवर सन २०२३ मध्ये निवडून आलेले संचालक मंडळ यांनी आपल्या पदभार स्वीकारल्यानंतर बँकेच्या दृष्टीने चुकीचे निर्णय घेतले .  कर्ज व्याजदर ११ टक्क्यां...

अर्थसंकल्पात तज्ज्ञांची मते व अपेक्षा

Image
"केंद्रीय अर्थसंकल्प २०२५-२६ मध्ये आर्थिक विकास आणि समावेशक विकासावर भर देण्यात आला असला, तरी रिअल इस्टेट क्षेत्रासाठी विशिष्ट उपाययोजनांचा अभाव ही एक संधी गमावल्यासारखी आहे. ₹१ लाख कोटींचा शहरी विकास निधी शहरांना विकास केंद्र बनवण्यासाठी एक चांगले पाऊल असले, तरी या क्षेत्राला उद्योग दर्जा, सिंगल-विंडो क्लिअरन्स आणि घर खरेदीदारांसाठी वाढीव कर सवलतींसारख्या थेट प्रोत्साहनांची अपेक्षा होती. वार्षिक १२ लाख रुपयांपर्यंत आयकर सूट मर्यादा वाढवणे ही मध्यमवर्गीयांसाठी मोठी दिलासादायक बाब आहे. यामुळे केवळ डिस्पोजेबल उत्पन्नच वाढणार नाही, तर परवडणारी आणि मध्यम-उत्पन्न गृहनिर्माण प्रकल्पांनाही चालना मिळेल आणि घरमालकीला प्रोत्साहन मिळेल. शिवाय, टीडीएस चे तर्कसंगतीकरण आणि मध्यमवर्गीयांना कर कपातीद्वारे दिलासा मिळाल्याने खर्च करण्याची क्षमता वाढेल, ज्यामुळे अप्रत्यक्षपणे घरांची मागणी वाढेल. स्वामीह अंतर्गत ५०,००० घरांचे काम पूर्ण झाले आहे आणि २०२५ मध्ये आणखी ४०,००० घरे दिली जातील, ही एक उल्लेखनीय बाब आहे, ज्यामुळे घर खरेदीदारांवरील आर्थिक ताण कमी होईल. ₹१५,००० कोटींचा स्वामीह निधी २...

लाखो लॉटरी विक्रेत्यांना बेरोजगार करणार नाही - अजित पवार

Image
लॉटरी विक्रीवर लाखो मराठी कुटुंबाचा उदरनिर्वाह असल्यामुळे याबाबत मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत येत्या मंत्रिमंडळ बैठकीत चर्चा केली जाईल, लाखो लॉटरी विक्रेत्यांना बेरोजगार करणार नाही अशी ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली. महाराष्ट्र राज्य पेपर लॉटरी बंद करण्यात येऊ नये, या मागणीसाठी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या नेतृत्वाखाली उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या  दालनात शिवसेना लॉटरी विक्रेता सेना व लॉटरी बचाव कृती समितीची बैठक पार पडली. आमदार सुनील शिंदे, लॅाटरी आयुक्त प्रेरणा देशभुतार,अपर मुख्य सचिव (वित्त)वित्त विभाग ओमप्रकाश गुप्ता व अध्यक्ष मनोज वारंग,सरचिटणीस सिघ्देश पाटील,खजिनदार अविनाश सावंत ,सदस्य संतोष तोडणकर,विश्वजीत मयेकर व लॉटरी बचाव कृती समिती सदस्य चंद्रकात मोरे,स्नेहल कुमार शाह,गणेश कदम,विलास सातार्डकर,दिलीप धुरी उपस्थित होते. इतर राज्यात लॉटरी विक्री मोठया प्रमाणात सुरू होत असताना आपल्याकडे पारदर्शकपणे सोडत होऊनही महाराष्ट्र राज्य लॉटरी बंद करण्याचा निर्णय शासनाच्या विचाराधीन आहे. यावर लाखो कुटुंबांच उदरनिर्वाह चालतो. त्या...