विधी व न्याय विभागाकडून आझाद मैदानातील आंदोलनाची दखल
माजी सरन्यायाधीश डाॅ.धनंजय चंद्रचूड एका जाहीर कार्यक्रम दरम्यान व्यासपीठावर बोलत असताना एक गुन्हेगार आरोपी व्यासपीठावर उपस्थित होता, त्या गुन्हेगारांवर कारवाई करावी. तसेच डाॅ.चंद्रचूड यांनी अयोध्ये येथील राम मंदिर निकालापूर्वी केलेल्या वक्तव्याची गृह विभागाने तपासणी करावी या व इतर मागण्यासाठी कवी लेखक सामाजिक कार्यकर्ते अशोकराव टाव्हरे यांनी आझाद मैदान मुंबई येथे धरणे आंदोलन सुरू केले होते.
या आंदोलनाची दखल विधी व न्याय विभागाचे अवर सचिव राजेश वडनेरकर यांनी घेतली असून, गृह विभागाला कार्यवाही बाबत लेखी निर्देश दिले आहेत. अशी माहिती टाव्हरे यांनी आझाद मैदानात गुरुवारी दिली.
कनेरसर जि.पुणे येथे २० ऑक्टोबर २०२४ रोजी भारताचे तत्कालीन सरन्यायाधीश डाॅ.धनंजय चंद्रचूड एका जाहीर कार्यक्रमासाठी आले होते. त्यावेळी गुन्हेगारीचा दावा प्रलंबित असलेला जवाहर दौंडकर हा डॉ. चंद्रचूड व्यासपीठावर उपस्थित होता, त्याच्यावर स्री विनयभंग व मारहाणीचा गुन्हा प्रलंबित आहे. हा सर्व प्रकार पाहणारी आयोजक कमिटी व संबधित पोलिस अधिकारी यांच्यावर कारवाई का नको ? असा सवाल करत टाव्हरे यांनी आंदोलन सुरू केले होते.
आरोपी जवाहर दौंडकर मला जीवे मारणार असल्याचे गावात बोलत आहे असे सांगत टाव्हरे म्हणाले, मला खोट्या गुन्हयात अडकविण्याचा खटाटोप काहीजण करीत आहेत. डाॅ.धनंजय चंद्रचूड यांनी कनेरसर येथे सभेत बोलताना अयोध्या राम मंदिर खटल्याविषयी मार्ग सुचत नव्हता, देवापुढे बसलो, मार्ग सुचव असे वक्तव्य केले होते. नंतर चार महिन्यानी बीबीसी वृत्त वहिनीला मुलाखत देताना घुमजाव केले आहे. त्यांचे वक्तव्य सर्वधर्मसमभावाला तडा देणारे व अंधश्रध्देला वाव व शिक्षण, न्यायव्यवस्थेवर दुरगामी परिणाम करणारे आहे याबाबत न्याय मिळावा अशी टाव्हरे यांची मागणी होती. त्या पार्श्वभूमीवर विधी व न्याय विभागाचे अवर सचिव राजेश वडनेरकर यांनी आंदोलनाची दाखल घेतली आहे.
Comments
Post a Comment