न्या. चंद्रचूड यांचे नेमके वक्तव्य काय ?


भारताचे माजी सरन्यायाधीश डाॅ.धनंजय चंद्रचूड यांनी आपल्या वक्तव्यावर  ठाम राहिले तर जनता गोंधळात पडणार नाही. न्या. चंद्रचूड यांचे नेमके वक्तव्य काय ? याबाबत त्यांनीच खुलासा करावा अशी मागणी कवी लेखक समाजसेवक अशोकराव टाव्हरे यांनी मंगळवारी मुंबई मराठी पत्रकार संघ येथे पत्रकार परिषदेत केली.

सर्वोच्च न्यायालयाने अयोध्या राम मंदिर खटल्याबाबतचा निकाल सन २०१९ मध्ये दिला होता. त्यावेळी पाच न्यायमुर्तींच्या खंडपीठात न्या. डाॅ. धनंजय चंद्रचूड यांचाही समावेश होता. त्यानंतर पाच वर्षांनी पुणे येथील कनेरसर या गावात  जाहीर सभेत त्यांनी  " अयोध्या निकालापुर्वी आम्हाला काही मार्ग सुचला नाही, त्यामुळे देवापुढे बसलो होतो "  असे  वक्तव्य केले होते. तर आता काही दिवसापूर्वी जागतिक पातळीवरील एका न्यूज चॅनेल वर दिलेल्या मुलाखतीत ते म्हणाले " राममंदिर निकालापुर्वी देवाला प्रार्थना केली नाही " असे सांगितले. अशी दोन वक्तव्य त्यांनी केली.

या सर्व प्रकरणी  निर्माण झालेला संभ्रम दुर करावा अशी मागणी टाव्हरे यांनी पत्रकार परिषदेत केली.

Comments

Popular posts from this blog

आता सहनशीलता संपली...राज्यभर १ ऑक्टोबरला रास्ता रोको करणार....अंगणवाडी महिलांचा सरकारला इशारा

स्वराज पक्षाच्या रडारवर आता शिधावाटप दुकाने

आचारसंहिते पूर्वीची " उमेद"