साथरोग कायद्यात सुधारणा करत आरोग्य विभागातील रिक्त पदे भरणार - आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर



साथीचे रोग नियंत्रणात राहावे यासाठी साथरोग कायद्याची कठोर अंमलबजावणी करावी. तसेच साथरोग कायद्यात  सुधारणा करण्याच्या सूचना देत रिक्त पदांचा व प्रतीक्षा यादिवरील जागा तात्काळ भरण्याच्या सूचना सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर सोमवारी मंत्रालयात झालेल्या बैठकीत सांगितले.

यावेळी आरोग्य मंत्री म्हणाले, वैदयकीय अधिकायांच्या s २० मधील प्रतिक्षा यादीतील ४०० जागा १५ दिवसांच्या आत भरल्या जाणार आहेत. तसेच   वैदयकीय अधिकाऱ्यांच्या रिक्त पदांचा तात्काळ आढावा घेऊन (साधारण२००० पदे ) पदभरती प्रक्रिया राबविण्याच्या सूचनाही आरोग्य मंत्र्यांनी दिल्या.

जिल्हा शल्य चिकित्सक व जिल्हा आरोग्य अधिकारी तज्ञ वैद्यकिय अधिकारी s २३ पदे एमपीएससी कक्षेबाहेर काढून सर्व पदे विभागीय पदोन्नतीद्वारे भरण्याची तात्काळ कार्यवाही करावी अशा सूचना त्यांनी यावेळी दिल्या.

माणसाच्या जीवनात सर्वात महत्वाचा असणारा आरोग्याचा प्रश्न गंभीर होऊ नये व त्यासाठी काय काय उपाययोजना केल्या पाहिजेत याबाबत त्यांनी उपाययोजना करण्यास सांगितले.

नगरविकास व ग्रामविकास विभागाने पाणी , अन्न , स्वच्छ्ता या बाबीवर विशेष लक्ष द्यावे. आरोग्य विभागाने यासाठी या दोन्ही विभागावर लक्ष केंद्रित करावे असे निर्देश आरोग्य मंत्र्यांनी यावेळी दिले.

साथीचे आजार नियंत्रण करण्यासाठी कठोर पावले उचलावी. आजार होऊ नये यासाठी पूर्व खबरदारी घेण्यासाठी काय उपाय योजना करता येतील यासाठी संबंधित विभागाने गांभीर्याने काम करावे.

गेल्या काही वर्षात आपण असे चित्र पाहिले आहे की अन्न पाणी व स्वच्छता या बाबीवर गांभीर्याने लक्ष दिले नसल्याने अनेक आजारांनी जनता त्रस्त झाली. कोविड च्या काळातही आपण अन्न पाणी स्वच्छता हवा यासारख्या बाबीवर गांभीर्याने लक्ष दिले नाही त्यामुळे ही साथ पसरत गेली.

अशुद्ध पाणी पुरवठा होत असल्याने अनेक आजार होतात.GBS सारखा आजार हा अशुद्ध पाण्यामुळे होत आहे. डेंग्यू, झिका,मलेरिया इतर आजार दूषित पाण्यामुळे होत आहेत त्यामुळे या सर्व बाबीवर गांभीर्याने लक्ष द्यावे असे निर्देश आरोग्य मंत्र्यांनी यावेळी दिले.

साथरोग नियंत्रणात राहावे यासाठी साथरोग कायद्याची कठोर अंमलबजावणी करावी. तसेच साथरोग कायद्यात  सुधारणा करण्याच्या सूचनाही आरोग्य मंत्र्यांनी दिल्या.

Comments

Popular posts from this blog

आता सहनशीलता संपली...राज्यभर १ ऑक्टोबरला रास्ता रोको करणार....अंगणवाडी महिलांचा सरकारला इशारा

स्वराज पक्षाच्या रडारवर आता शिधावाटप दुकाने

आचारसंहिते पूर्वीची " उमेद"