महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर काश्मीर ते कन्याकुमारी निर्भय महिलांचा प्रवास
भारतासह जागतिक स्तरावर महिलांना रोमांचकारी रस्ते प्रवास अनुभवता यावा तसेच सुरक्षित रस्ते प्रवासाला चालना मिळावी, यासाठी जागतिक महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर ८ मार्च रोजी काश्मीर ते कन्याकुमारी अशी धाडसी महिला रस्ते प्रवास मोहीम सुरू करण्यात आली असून या मोहित ५० हून अधिक निर्भय महिला ३,७०० किमी अंतराचा थरारक प्रवास करणार आहेत. अशी माहिती मुंबईत पत्रकार परिषदेत आमदार प्रसाद लाड यांनी दिली.
यावेळी एम्बार्क च्या संचालिका नीता लाड, मेधा जोसेफ आणि सुजल पटवर्धन आदी एम्बार्क चे पदाधिकारी उपस्थित होते.
प्रसाद लाड म्हणाले, "हे महिलांच्या सक्षमीकरणासाठी एक आगळेवेगळे पाऊल आहे. या ऐतिहासिक मोहीमेला भारताचे केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या रस्ते सुरक्षा अभियान २०२५ अंतर्गत पाठबळ मिळाले आहे.
राष्ट्रीय स्तरावरील सुरक्षित रस्त्यांच्या दृष्टीने ही मोहीम केवळ एक प्रवास नसून महिलांसाठी सशक्ततेचा ठोस संदेश आहे. रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाच्या सहकार्याने हा उपक्रम महिलांना आपल्या स्वप्नांचा मार्ग स्वतः निवडण्यास प्रोत्साहन देणारा ठरेल अशी प्रतिक्रिया रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी आपल्या संदेशात दिली आहे. यावेळी पीटर जानेबा या संकल्पनेविषयी बोलताना म्हणाल्या, "नवीन आणि उत्कृष्ट गोष्टी शोधणे हे या मोहिमेचे वैशिष्ट्य आहे.
Comments
Post a Comment