अजून किती दिवस शेतकऱ्यांनी सरकारच्या आश्वासनवर जगायचे ?


" जय जवान ,  जय किसान " असा नारा देत आम्ही शेतकऱ्यांचे कैवारी आहोत असे सांगणाऱ्या सरकारच्या विरोधात शेतकरी पुन्हा आक्रमक झाले आहेत. अजून किती दिवस आम्ही सरकारच्या आश्वासनवर जगायचे ? असा सवाल या शेतकऱ्यांनी केला आहे.

मुरबाड तालुक्यातील सन २०२० - २१ मधील ५०० शेतकरी ३१ मार्च पर्यंत भात देऊनही सरकारचे सर्वर डाऊन आसल्याने शेतकरी आपल्या हक्काच्या  पैशापासून वंचीत राहीले आहेत. लोकमित्र रमेश हिंदुराव यांच्या नेतृत्वाखाली २०२१ पासुन पत्रव्यवहार व आझाद मैदानात आंदोलने करण्यात केली. मात्र आश्वासन देऊनही अद्याप हक्काचे पैसे  मिळाली नाहीत.

याबाबत अन्न नागरी पुरवठा विभागाने कॅबीनेट मंजुरीसाठी प्रस्ताव सादर केला आहे. त्याला मंजुरी मिळावी म्हणून आमदार  किसन कथोरे यांनी मंत्री धनंजय मुंढे यांना पत्रही दिली आहे. आता मंत्रिमंडळ मंजुरी मिळून शासनाने आदेश काढावे यासाठी मुरबाडचे शेतकरी पुन्हा १० फेब्रुवारी पासून आझाद मैदान येथे उपोषणास बसण्याचे पत्र दिले आहे .

उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री छागन भुजबळ आदी सर्वांना निवेदन दिली आहेत. मंत्री महोदयांनी आखासने दिली आहेत. रमेश यशवंत हिंदुराव यांनी मंत्री धनंजय मुंढे यांची भेट घेऊन निवेदन दिले आहे.

Comments

Popular posts from this blog

आता सहनशीलता संपली...राज्यभर १ ऑक्टोबरला रास्ता रोको करणार....अंगणवाडी महिलांचा सरकारला इशारा

आचारसंहिते पूर्वीची " उमेद"

स्वराज पक्षाच्या रडारवर आता शिधावाटप दुकाने