वंध्यत्वाच्या समस्येवर मातृत्व चळवळ हि अभिमानाची गोष्ट -- पोलिस उपआयुक्त रश्मी नांदेडकर यांचे मत




प्रदूषण, शहरीकरण, मानसिक ताण तणाव, रासायनिक घटकांचे हवेतील वाढते प्रमाण, खाण्या-पिण्याच्या सवयी इतर गोष्टींमुळे हार्मोन्स बदल होत आहेत. यामुळे निर्माण होणाऱ्या वंध्यत्वाच्या समस्या वाढत आहेत. विज्ञान व श्रद्धा यांचा संगम पुरातन काळापासून आहे. आजच्या युगात मदरहुड हॉस्पिटलने मोठी जनजागृती व व्यापक मातृत्व चळवळीचा शुभारंभ केला आहे हि मोठी अभिमानाची गोष्ट आहे असे मत पोलिस उप आयुक्त रश्मी नांदेडकर यांनी व्यक्त केले.

नवी मुंबईत खरखर येथे  मदरहुड फर्टिलिटी आणि आयव्हीएफ च्या वतीने " नेक्स्ट जनरेशन फर्टिलिटी ट्रीटमेंट सेंटर "  शुभारंभ सोहळ्या प्रसंगी त्या बोलत होत्या. यावेळी मुख्य संचालक सर्वानन आर, वरिष्ठ आयव्हीएफ मार्गदर्शन डॉ रिटा मोदी, सेवा संचालक डॉ रुपाली कदम,  आदी डॉक्टर यावेळी उपस्थित होते.

हे केंद्र प्रजनन उपचारांच्या शोधात असणाऱ्या जोडप्यांना क्लिनिकल तज्ज्ञ, भूणशास्त्रातील आधुनिक तंत्रज्ञान, अत्याधुनिक आयव्हीएफ लॅब आणि सकारात्मक गर्भधारणा साध्य करण्यासाठी जोडप्यांच्या प्रवासाला पाठिंबा देण्यासाठी एक अनुभव टीम उपलब्ध करुन देत आहे.

या शुभारंभ प्रसंगी बोलताना, मदरहूड हॉस्पिटल्सचे सीईओ श्री. विजयरत्न वेंकटरमन सांगतात की, अनेक जोडप्यांसाठी वंध्यत्व ही एक गंभीर समस्या ठरत आहे आणि अशा जोडप्यांना उच्च दर्जाच्या प्रजनन उपचारांची आवश्यकता भासत आहे. मदरहूड फर्टिलिटी आणि आयव्हीएफमध्ये, आम्ही जागतिक दर्जाचे प्रजनन उपचार मिळवून देणार आहोत. अनुभवी तज्ञांच्या टीम, अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि रुग्णांना प्राधान्य देणारा दृष्टिकोन यासह नवी मुंबई आणि जवळपसाच्या जोडप्यांना यशस्वी प्रजनन उपचार देण्याचे आमचे मुख्य उद्दिष्ट्य आहे.

गरजूंसाठी परवडणाऱ्या, उच्च दर्जाच्या प्रजनन उपचारांची उपलब्धता वाढवण्याची गरज आहे. वैज्ञानिक प्रगतीमुळे, आता जोडप्यांना त्यांचे स्वप्न साकार करण्यास मदत करणे शक्य झाले आहे. आम्ही हे सर्व उपचार एक चळवळ म्हणून करत असतो. कारण आई व बाबा होणे यासारखा आनंद जोडप्यांच्या चेहऱ्यावर पाहताना या चळवळीचे सार्थक झाल्याचे समाधान आम्हाला खूप आनंद देत असते. असे डॉ रुपाली कदम यांनी यावेळी सांगितले.


Comments

Popular posts from this blog

आता सहनशीलता संपली...राज्यभर १ ऑक्टोबरला रास्ता रोको करणार....अंगणवाडी महिलांचा सरकारला इशारा

स्वराज पक्षाच्या रडारवर आता शिधावाटप दुकाने

आचारसंहिते पूर्वीची " उमेद"