कोराना काळात जीवाची बाजी लावणाऱ्या डॉक्टरांना न्याय द्यावा






      डॉ अरुण कोळी यांची  सरकारकडे गांभीर्यपूर्वक मागणी


कोराना काळात उत्तम कामगीरी करणाऱ्या स्वतःच्या जिवाची पर्वा न करता कर्तव्य बजावणाऱ्या शासकीय वैद्यकिय अधिकाऱ्यांना सरकारने न्याय द्यावा अशी मागणी महाराष्ट्र राज्य  राजपत्रित वैद्यकिय अधिकारी महासंघाचे राज्य अध्यक्ष डॉ अरुण कोळी यांनी केली आहे.

वैद्यकिय अधिकारी गट- ब यांचा अंतीम टप्प्यात असलेला पदोन्नतीचा प्रस्ताव विभागीय पदोन्नती समिती समोर मांडुन या वैद्यकिय अधिकाऱ्यांना तात्काळ पदोन्नती आदेश मिळावेत यासाठी वेळोवेळी पत्रव्यवहार झाला आहे तरीही सरकार गंभीर नाही.

मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या १०० दिवसाच्या कार्यक्रमात शासकिय अधिकारी तथा कर्मचारी यांचे पदोन्नतीचे प्रस्ताव मार्गी लावन्याचे चे धोरण निश्चित केलेले आहे. त्याचप्रमाणे आदेश देत आम्हाला न्याय द्यावा व मुळ राज्य आरोग्य सेवा गट-ब वैद्यकिय अधिकारी संवर्गातील २१९ पदोन्नतीस प्रतीक्षेत आहेत त्यांनाही न्याय द्यावा अशी मागणी डॉ कोळी यांनी केली .

सार्वजनिक आरोग्य विभागातील आरोग्य सेवा आयुक्तालया अंतर्गत महाराष्ट्र वैद्यकिय अधिकारी  गट ब यांची अंतीम सेवा जेष्ठता यादीचा शासन निर्णय प्रसिध्द करण्यात आला आहे. शासनाने आयुक्तालयास आजपर्यंत १३ स्मरणपत्र देवुन गट ब वैद्यकिय अधिकारी यांच्या पदोन्नतीचा प्रस्ताव सादर करण्याठी  सुचित कलेले आहे. आरोग्य सेवा आयुक्तलयाने पदोन्नतीचा अंतीम परीपुर्ण प्रस्ताव सन २०२४ साली शासनास सादर कलेला आहे. तरीही आम्हाला न्याय मिळत नाही असे कोळी यांनी सांगितले.

उमेदवारांना नियुक्ती आदेश  निर्गमीत कलेले आहेत. त्यामुळे पदोन्नतीच्या प्रतीक्षेत असलेल्या सेवाजेष्ठ अनुभवी पदोन्नतीस पात्र गट-ब वैद्यकिय अधिकारी यांच्यावर एकप्रकारे अन्याय झालेला आहे असे अरुण कोळी यांनी सांगितले.

२४ वर्ष पदोन्रती नाही अनेकाचे सेवानिवृती झाली. पदोन्रतीची वाट पाहुन आरोग्य विभागात गट ब वैद्यकीय आधिकारी असे ऐकच पद आहे. यांना फक्त गट अ म्हणुन पदोन्रती मिळते, दुसरी कोणतीही संधी नाही. हे  सर्व वैद्यकीय आधिकारी आदिवासी दुर्गम भागात काम करत आहेत. जर यांची पदोन्रती झाली तर आदिवासी भागातील  सर्व पदे भरली जातील व  राज्यातील आदिवासी दुर्गम गरीब जनतेला सेवा मिळेल व पदोन्रतीमुळे २१९ जणाना आरोग्य सेवेत संधी मिळेल असे कोळी यांनी स्पष्ट केले.

Comments

Popular posts from this blog

आता सहनशीलता संपली...राज्यभर १ ऑक्टोबरला रास्ता रोको करणार....अंगणवाडी महिलांचा सरकारला इशारा

आचारसंहिते पूर्वीची " उमेद"

स्वराज पक्षाच्या रडारवर आता शिधावाटप दुकाने