विश्वसाहित्यिक पद्मश्री नामदेवराव ढसाळ स्मृती साहित्य संमेलन मुंबईत होणार
विश्वसाहित्यिक पद्मश्री नामदेवराव ढसाळ स्मृती साहित्य संमेलन मुंबईत यशवंतराव चव्हाण सेंटर येथे १२ फेब्रुवारी रोजी कुलस्वामिनी साहित्य परिषदेच्या वतीने होत असल्याची माहिती संमेलनाचे स्वागताध्यक्ष लेखक व सामाजिक कार्यकर्ते कवी अशोकराव टाव्हरे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
संमेलनाचे उद्घाटन डॉ. श्रीपालजी सबनीस हे करणार असून संमेलनाध्यक्ष ज्येष्ठ साहित्यिक म.भा.चव्हाण आहेत. संमेलनाचे स्वागताध्यक्ष लेखक व सामाजिक कार्यकर्ते कवी अशोकराव टाव्हरे तर निमंत्रक राजुशेठ खंडीझोड हे आहेत.
१५ फेब्रुवारी २०२४ रोजी पहिले स्मृती साहित्य संमेलन कनेरसर येथे पार पडले होते. आता दुसरे साहित्य संमेलन स्वर्गीय नामदेवराव ढसाळ यांच्या कर्मभुमीत होत आहे. संमेलन स्थळास भारतीय कामगार चळवळीचे जनक रावबहाद्दुर नारायण मेघाजी लोखंडे साहित्य नगरी असे नाव देण्यात येणार आहे.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या कार्यावरील लेखक अशोकराव टाव्हरे यांचे " विकासाचा राजमार्ग " या पुस्तकाची तिसरी आवृत्ती व " हायवे ऑफ डेव्हलपमेंट " या पुस्तकाची दुसऱ्या आवृत्तीचे प्रकाशन होणार आहे.
यावेळी खेड तालुका पत्रकार संघाचे नुतन अध्यक्ष संजय शेटे,उपाध्यक्ष रामंचद्र सोनवणे,सचिव किरण खुडे,सहसचिव रोहिदास होले यांचा म.भा.चव्हाण यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. कुलस्वामिनी साहित्य परिषदेच्या संयोजिका सुरेखा टाव्हरे यांनी सांगितले.
संमेलनाध्यक्ष म.भा.चव्हाण,स्वागताध्यक्ष अशोकराव टाव्हरे, कनेरसरच्या सरपंच सुनीता केदारी,संयोजक दिलीपराव माशेरे कुलस्वामिनी साहित्य परिषदेच्या सुरेखा टाव्हरे, संतोष लोहोकरे, सतिश प्रघणे,विजय कानवडे,दत्तात्रय केदारी,अर्चना प्रघणे,तुकाराम दौडकर पत्रकार परिषदेस उपस्थित होते.
पी आर न्यूज मीडिया नेटवर्क
Comments
Post a Comment