मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ताज बँडस्टॅन्ड प्रकल्पाचे भूमिपूजन
भारतातील आघाडीची हॉस्पिटॅलिटी कंपनी, इंडियन हॉटेल्स कंपनीने " ताज बँडस्टॅन्ड प्रोजेक्ट " ची घोषणा केली आहे. ताज बँडस्टॅन्ड मुंबईच्या स्कायलाईनची नवी व्याख्या रचण्यासाठी सज्ज करत नवीन लॅन्डमार्क होणार आहे.
जगभरात नाव असलेले ताजमहल हॉटेल हे नाव कुणाला माहिती नसेल असे नाही. सोमवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि टाटा सन्सचे अध्यक्ष एन चंद्रशेखरन यांच्या उपस्थितीत " ताज बँडस्टॅन्ड प्रकल्प " ची घोषणा करत भूमिपूजन केले.
पहिले ताजमहल हॉटेल मुंबईत १९०३ साली सुरु केले गेले आणि तेव्हापासून आजतागायत, एक शतकभराहून अधिक काळापासून ताज ब्रँड या शहराच्या संस्कृतीचा अविभाज्य भाग बनून राहिला आहे. ताजच्या महान वारशाचे एक प्रमुख उदाहरण ताज बँडस्टॅन्ड पुढील शतकभर प्रतिष्ठित ब्रँड ताजचे नेतृत्व करत राहील.असे मत ताज चे मुख्य कार्यकारी अधिकारी पुनीत छटवाल यांनी सांगितले.
दोन एकर जागेमध्ये पसरलेल्या ताज बँडस्टँडमध्ये ३३० खोल्या आणि ८५ अपार्टमेंट्स असतील.जागतिक दर्जाच्या सुविधांनी हे सुसज्ज असेल. या प्रकल्पामध्ये शहराच्या वैविध्यपूर्ण आणि समृद्ध सांस्कृतिक वारशाचे प्रतिबिंब असलेले लँडस्केप गार्डन, क्रीडा आणि मनोरंजनाच्या सुविधा तसेच आसपासच्या परिसराचा विकास आणि देखभाल देखील यांचा समावेश असेल.
Comments
Post a Comment