विरारमध्ये विरार रन २०२५ चे आयोजन




 
विरार :- यंग स्टार ट्रस्ट, अमेय क्लासिक क्लब, विराट फाऊंडेशन आयोजित विरार रन - २०२५, ९ फेब्रुवारी रविवार रोजी पार पडणार आहे. यात १८ वर्षांवरील सर्व वयोगटातील १० किमी दौड आयोजित करण्यात आली आहे. तसेच ६ ते १६ वयो गटातील मुलं व मुलींसाठी १.५ किमी दौड आयोजित करण्यात आली आहे. 

१.५ किमी दौडमध्ये भाग घेणाऱ्या सर्वांसाठी प्रवेश मोफत आहे. तसेच यावेळी फन रन दरवर्षीप्रमाणे आयोजित करण्यात येते. तर विरार रन मध्ये महिलांसाठी विशेष 'वॉकथॉन' आयोजित करण्यात आली आहे. वॉकथॉनमध्ये कमीत कमी ५ जास्तीत जास्त १० महिलांचा एक संघ बनवणे आवश्यक आहे. प्रत्येक संघाला ५ सामाजिक संदेश देणे आवश्यक असणार आहे. यातील ४ सामाजिक संदेश आम्ही दिलेले आहेत तर पाचवा संदेश हा संघांना बनवायचा आहे. जसे वसई विरार महानगरपालिका मॅरॅथॉनचे ब्रीद वाक्य 'स्त्री भ्रूण हत्या टाळा, निसर्गाचा समतोल पाळा', विरार रनचे ब्रीद वाक्य 'गो ग्रीन गो क्लीन', विरार पोलिसांचे ब्रीद वाक्य 'से नो टू ड्रग्स', विरार मेडिकल असोसएशनचे ब्रीद वाक्य 'से नो टू डिप्रेशन' हे चार संदेश असणार आहेत. तर पाचवा सामाजिक संदेश हा संघाने स्वतः बनवायचा आहे. तसेच हे संदेश स्वतः तयार करून फलक बनवून आणायचे आहेत. महिला संघाकडून बनवण्यात आलेला सामाजिक संदेश ज्वलंत सामाजिक मुद्द्यावर असणे गरजेचे आहे आणि तो लेखी स्वरूपात अमेय क्लासिक क्लब येथे प्राधिकृत व्यक्तीकडे जमा करण्यात यावा. रन झाल्यावर आपण बनवलेला संदेश समजावणे गरजेचे आहे. फन रनच्या फॉर्ममध्ये आपल्या संघाबाबत संपूर्ण माहिती सादर करणे गरजेचे आहे. सदर माहिती सोबत एक सरकारी ओळख पत्र जोडणे अनिवार्य आहे.

याच बरोबर रन संपल्यावर वॉकथॉनमध्ये भाग घेतलेल्या प्रत्येक महिलेने सेल्फी पॉइंटवर फोटो स्वतः काढावा यासाठी विरार रनचे स्वयंसेवक त्यांना सहकार्य करतील. हा फोटो महिलांनी स्वतःच्या इंस्टाग्रामवर अपलोड करून विरार रन इंस्टाग्राम अकाउंटला टॅग करणे व कोलॅब करणे गरजेचे आहे.

 स्व. सौ. भारतीताई देशमुख यांच्या कन्या सौ. गौरी देशमुख आणि उत्कर्ष विद्यालयाच्या उपमुख्यद्यापिका सौ. चित्रा सुनील ठाकूर यांच्याकडून स्पर्धेचे परीक्षण करण्यात येणार असून यातून ४ संघांना पारितोषिकाच्या स्वरूपात रोख बक्षिसे व मानचिन्ह देण्यात येणार आहे. स्पर्धेत भाग घेतलेल्या महिलांनी साडी नेसून पारंपरिक वेशभूषेत येणे गरजेचे आहे. वॉकथॉनमध्ये सहभाग घेण्यासाठी अमेय क्लासिक क्लब येथे फॉर्म भरून नोंदणी करणे आवश्यक आहे. व ही नोंदणी विनामूल्य आहे. 

सर्व महिलांना आवाहन करण्यात येते की, आपण जास्तीत जास्त संख्येने ह्या स्पर्धेचा लाभ घ्यावा. ही माहिती आयोजकांकडून देण्यात आली. यावेळी आयोजक मा. नगरसेवक हार्दिक राऊत, मा. नगरसेवक अजय संघवी, मा. नगरसेवक हनुमंत कावळे, आयोजक संदीप डूरे पाटील, जतीन पाटील, भूषण चुरी, रवी गायकवाड, हिमांशू कपाडिया, हित ठाकर, गोविंद कावळे, राज पाटील, साहील सोलंकी, सुश्रुत माळी, अमेय मोरे, स्वप्नील पारकर, चेतन जाधव, ओमकार सांगळे, विकास अंबो पाटील, विनीत परुळेकर, श्रद्धेश देशमुख, राम जटार, अशोक गोरे, सौ. अंजली कदम, सौ. मिताली साळुंखे, सौ. पूजा दळवी, सौ. स्मिता सावंत, सौ. अनिता कांबळे, सौ. समीक्षा गोरीवले, सौ. बिंदू उपाध्याय, सौ. माला साहा, सौ. लता पवार, सौ. प्रभा नाईक, प्रिया कुमारी, सौ. अंजू पाटील, सौ.संगीता जाधव, सौ. रेखा अग्रवाल, सौ. सुलक्षणा खोपकर, सौ. कविता धनगर, सौ. रजनी गुरव, सौ. प्राची मनोहत्रा, सौ. तेजश्री नाईक. हे सर्व आयोजक उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

आता सहनशीलता संपली...राज्यभर १ ऑक्टोबरला रास्ता रोको करणार....अंगणवाडी महिलांचा सरकारला इशारा

स्वराज पक्षाच्या रडारवर आता शिधावाटप दुकाने

आचारसंहिते पूर्वीची " उमेद"