मराठा आरक्षण पीपीटी सादरीकरण मुख्यमंत्री पहाणार
रवींद्र काळे पाटील
मराठा आरक्षण क्रांती मोर्चा व ठोक मोर्चा यांच्या वतीने मराठा आरक्षण चिंतन आंदोलन समितीच्या मागण्या शासनाने स्वीकारल्या असल्याची माहिती एका भव्य पत्रकार परिषदेत शासनाचे वरिष्ठ प्रतिनिधी जलसंधारण मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जलसंधारण मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे मार्फत सविस्तर मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले होते.छत्रपती संभाजीनगर येथे दिनांक २३ फेब्रुवारी २०२५ पासुन मराठा आरक्षण व इतर मागण्यांना मंजुरी मिळावी म्हणून समन्वयक रमेश केरे पाटील यांनी आमरण उपोषण सुरू केलेले होते.
मराठा समाजाच्या वतीने सविस्तर मागण्या करण्यात आल्या होत्या त्याचे वाचन मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि मंत्री अतुल सावे यांचे समक्ष मराठा क्रांती मोर्चाचे मुख्य समन्वयक रविंद्र काळे पाटील यांनी सविस्तर रित्या केले.
मराठा आरक्षणा बाबत सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेल्या क्युरेटिव्ह पीटिशन साठी जेष्ठ अभ्यासक डॉ.राजेंद्र दाते पाटील यांनी अत्यंत अभ्यासु व उपयुक्त असे न्याय निवाडे घटना पीठाचे निर्णय यांचे पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन तयार केले असुन त्याचे लाईव्ह सादरी करण मुख्यमंत्री आणि शासनाच्या लिगल टीम समक्ष सादर करण्याची तारीख स्थळ व वेळ तात्काळ निश्चीत करावी
आणि राज्य सरकारने या सुचविलेल्या प्रमाणे तात्काळ सर्वसमावेशक कृती कार्यक्रम हाती घ्यावा, मराठा आरक्षणा बाबत सर्वोच्च न्यायालया मध्ये क्युरेटिव्ह पिटीशनची सुनावणी खुल्या न्यायालयात व दैनंदिन सुनावणी घेण्यासाठी राज्य सरकारने तात्काळ त्यांचे कडे उपलब्ध केस लॉ च्या सहाय्याने पुढाकार घ्यावा, मराठवाड्या तील मराठा समाजाला पूर्वीच प्रदान केलेल्या आरक्षणाची तात्काळ आंमलबजावणी करून जात प्रमाणपत्र त्वरीत देण्याचे शासनादेश निर्गमित करावेत
,सारथी संस्थेच्या वतीने विविध कृतिशील कार्यक्रमाचे नियोजन करून महाराष्ट्र शासनाने किमान १००० कोटीच्या विशेष निधीची तात्काळ तरतुद करावी आणि सारथीचे संशोधक विद्यार्थी वर्गास नोंदणी दिनांका पासुन फेलोशीप मंजूर करावी आणि महिन्यातून एकदा ती फेलोशीप अदा करावी,स्व.आण्णा साहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या बाबत " *मागेल त्याला कर्ज "* या संकल्पनेतून कर्जाची मंजुरी व पतपुरवठा थेट स्व.अण्णासाहेब पाटील महामंडळास " *फायनांशीयल इन्स्टिट्युट* " म्हणून दर्जा द्यावा
आणि तसा शासनादेश तात्काळ निर्गमित करावा,मराठा आरक्षण व विविध प्रलंबित मागण्यां साठी आंदोलना मध्ये सहभागी झालेल्या आंदोलकांवरील राज्य भारातील सर्वच गुन्हे तत्काळ मागे घेण्यात यावेत,मराठा विद्यार्थ्यां च्या जिल्हा निहाय वसतीगृह प्रकल्प निर्माण करण्याची प्रक्रिया मंदावली असून ती थांबलेली प्रक्रिया तत्काळ सुरू करावी,तो पर्यंत डॉ. पंजाबराव देशमुख वस्तीगृह निर्वाह भत्ता योजनेची प्रलंबित रक्कम विद्यार्थ्यांना तत्काळ अदा करावी
,सरपंच स्वः संतोष देशमुख यांच्या निर्घुण हत्या प्रकरणात प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरीत्या सहभागी असणाऱ्या सर्वच मारेकऱ्यांवर नव्याने करण्यात आलेल्या बी एन एस व इतर कायद्या तील तरतुदी नुसार गुन्हे दाखल करून त्यांना फाशीची शिक्षा होण्यासाठी पुरावे दाखल करावे,परभणी येथील सोमनाथ सूर्यवंशी यांचे हत्येस कारणीभूत असणाऱ्या सर्वच प्रशासकीय अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करून त्यांना फाशीची शिक्षा होण्याचे पुरावे दाखल करावे,
नियोजीत मराठा क्रांतीसुर्य स्व. अण्णासाहेब जावळे पाटील यांच्या नावाने स्थापन झालेले मराठवाडा आर्थिक विकास महामंडळास तात्काळ ५०० कोटीची भरीव आर्थिक निधीची तरतुद खास बाब म्हणुन तात्काळ मंजुर करून महामंडळ मराठवाड्यासाठी पुर्ण-क्षमतेने कार्यान्वित करावे,विवीध विभागांमध्ये आज तगायात मराठा पात्रउमेदवारांना अद्यापही नियुक्ती पत्र देण्यात आलेले नाही ते तात्काळ देण्यात यावेत
,सारथी आय बी पी एस, नाबार्ड बँकिंग प्रोग्राम २०२४- २०२५ ही प्रक्रिया तात्काळ पूर्ण करून कोचिंग क्लास उपलब्ध करुन मिळावा आणि स्टायफंड प्रति महिना किमान रु.१०,०००/- करावा आणि मराठा समाजा च्या सर्वच प्रलंबीत मागण्या तात्काळ मंजुर कराव्यात अशी मागणी असलेले निवेदन शासनास दिले होते.
सहा दिवस अत्यंत यातना सहन करत मराठा आरक्षण चिंतन आंदोलनाचा शासनाच्या सकारात्मक पुढाकारा मुळे महत्त्वाचे पाऊल पुढे पडले असुन कायदेशीर व घटनात्मक मार्गाचा अवलंबच मराठा समाजाला न्याय मिळवुन देईल हेच सुत्र नव्याने पुढे आले आहे.
सदरचे आंदोलन यशस्वी होण्या साठी रविंद्र काळे पाटील,निलेश डव्हले, शैलेश भिसे,संतोष काळे,लक्ष्मण शिरसाठ,राहुल पाटील,विलास मालुसरे,हेमंत कर्डीले,मोती वाघ,गणेश थोरात,शैलेश चौहान,महेश मोरे, अनिल कुटे,संकेत शेटे,पुंडलीक पाटेकर,अमोल गायकवाड,राजु कुकलारे,रावसाहेब आळंदकर पांडुरंग भुसारे,विकास बनसोडे, सुशील पायाळ, आप्पासाहेब जाधव,मनिष जोगदंडे,राजेश लांडगे,अनिल केरे, विद्यार्थी योगेश बहादुरे,नाथराव खंदारे, सुरज सोळुंके,नामदेव बागल, उध्दव सोळंके,डॉ.परमेश्वर माने गोपाल घेगडे,राहुल शिंदे,नागेश शिंदे, शुभम केरे, प्रताप पवार,एकनाथ कदम, उमेश अंडिल,अमोल धांडरे आदी मान्यवरां सह विजया मराठे,पुजा वाघ, निर्मला वाघ, सुमन सुर्यवंशी, भारती पवार,मंदा गायकवाड लता काळे,रेखा गाडेकर या सह अनेक मान्यवर यांनी परिश्रम घेतले.
Comments
Post a Comment