पद्मश्री नामदेव ढसाळ स्मृती साहित्य संमेलन मुंबईत मोठ्या उत्साहात संपन्न झाले


भारतीय कामगार चळवळीचे जनक नारायण मेघाजी लोखंडे साहित्यनगरी मुंबई येथे आयोजित केलेल्या साहित्य संमेलनामध्ये नामदेव ढसाळ यांच्या अलौकिक साहित्याचा गौरव करत विविध क्षेत्रातील ज्येष्ठ श्रेष्ठ मान्यवरांच्या उपस्थितीत मंत्रालयासमोर यशवंतराव चव्हाण सेंटर मुंबई येथील सभागृहात स्वागताध्यक्ष अशोकराव टाव्हरे यांच्या उपस्थितीत संपन्न झाले.
८९व्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डाॅ.श्रीपाल सबनीस यांनी यावेळी बोलताना ओघवत्या शैलीत नामदेव ढसाळांचे साहित्य, दलित पँथरचे कार्य विशद केले. गोलपिठापासून सुरू झालेला साहित्यप्रवास विश्वसाहित्यिक म्हणून अलौकिक असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. 

संमेलनाध्यक्ष व गझलकार म.भा.चव्हाण यांनी नामदेव ढसाळांच्या कर्मभुमीत अशोकराव टाव्हरे यांनी परिश्रम घेऊन आयोजित केलेले साहित्य संमेलन वाचनसंस्कृती वृध्दींगत होण्यासाठी मोलाचे ठरणार असल्याचे  सांगितले.

स्वागताध्यक्ष अशोकराव टाव्हरे  प्रास्ताविक करताना म्हणाले,  पद्मश्री नामदेवराव ढसाळ स्मृती साहित्य संमेलनाचे दुसरे वर्ष आहे. यानिमित्त कवीसंमेलन, परिसंवाद याद्वारे नवोदितांना व्यासपीठ उपलब्ध झाले असल्याने आनंद होत आहे.

पद्मश्री नामदेवराव ढसाळ यांच्या कार्यावर पीएच.डी करणारे साहित्यिक डाॅ.विलास तायडे यांचा विशेष सत्कार करण्यात आला. कुलस्वामिनी स्मरणिका, अशोकराव टाव्हरे यांच्या आठवणीतील कोरोना या कवितासंग्रहाचे तसेच केंद्रीय मंत्री गडकरी यांच्या कार्यावरील विकासाचा राजमार्ग व हायवे ऑफ डेव्हलपमेंट या पुस्तकांच्या आवृत्तीचे प्रकाशन झाले.

ज्येष्ठ साहित्यिक कांताराम सोनवणे, ललिता सबनीस, प्रकाश शितोळे, अनंत धनसरे, विजय कानवडे, निशिगंधा साकोरे, संजना मगर, अक्षता गोसावी तसेच उद्योजक राजेश मुलचंदानी, दशरथ पानमंद, नारायण मेघाजी लोखंडे यांचे वंशज गोपीनाथ लोखंडे
प्राचार्य सुनील टाव्हरे, चंद्रकांत सोनवणे
श्री अंबिका देवस्थानचे अध्यक्ष एकनाथ साबळे, कनेरसरच्या सरपंच सुनीता केदारी, दिलीपराव माशेरे, संतोष शेटे, अक्षय गायकवाड, कल्याणी पवार आदी मान्यवर उपस्थित होते.

संयोजन राजु खंडीझोड यांनी केले. सुत्रसंचालन सतीश प्रघणे यांनी तर सुरेखा टाव्हरे यांनी आभार मानले.

Comments

Popular posts from this blog

आता सहनशीलता संपली...राज्यभर १ ऑक्टोबरला रास्ता रोको करणार....अंगणवाडी महिलांचा सरकारला इशारा

आचारसंहिते पूर्वीची " उमेद"

स्वराज पक्षाच्या रडारवर आता शिधावाटप दुकाने