दिवाकर शेजवळ यांना मूकनायक पुरस्कार

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या' मूकनायक' या पाक्षिकामागील सामाजिक जाणीव आणि बांधिलकी जपणाऱ्या पत्रकारितेचा वारसा जतन करण्यासाठी मराठवाड्यातील' शाक्य मूनी प्रतिष्ठानने यंदा राज्यस्तरीय ' मूकनायक पुरस्कार' सुरू केला आहे. पहिल्या वर्षातील या प्रतिष्ठेच्या पुरस्कारासाठी ज्येष्ठ पत्रकार दिवाकर शेजवळ यांची निवड करण्यात आली आहे.

ते गेली ३५ वर्षे पत्रकारितेत असून मुंबई मराठी पत्रकार संघाचे कार्यकारिणी सदस्य आहेत. या पुरस्काराचे स्वरूप २५ हजार रुपये रोख, मानपत्र आणि स्मृतिचिन्ह असे आहे.

त्याची घोषणा बीड येथे झालेल्या एका बैठकीनंतर' शाक्य मूनी प्रतिष्ठान' चे अध्यक्ष प्रा. शरद वंजारे आणि सचिव प्रा. डॉ. संजय कांबळे यांनी एका पत्रकाद्वारे केली आहे. या बैठकीला प्रा. दिपक जमधाडे, सारीका वाघमारे, किशोरी मस्के, उज्वल गायकवाड, सिध्दार्थ वाघमारे हे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

दिवाकर शेजवळ यांना' मूकनायक पुरस्कार' येत्या रविवारी १६ फेब्रुवारी २०२५ रोजी सकाळी ११ वाजता अशोका हॉल पी.ई.एस अभियांत्रिकी महाविद्यालय, छत्रपती संभाजीनगर येथे आयोजित समारंभात देण्यात येणार आहे. प्रा. शरद वंजारे यांच्या अध्यक्षतेखालील या समारंभाला अॅड. जयमंगल धनराज, प्राचार्य अभिजित वाडेकर, प्रकल्प संचालक अशोक सिरसे, ज्येष्ठ पत्रकार विजय बहादुरे आदी मान्यवर प्रमुख अतिथी आहेत.

पी आर न्यूज नेटवर्क 
#  सहसंपादक 
@ रमेश औताडे 

7021777291

.

Comments

Popular posts from this blog

आता सहनशीलता संपली...राज्यभर १ ऑक्टोबरला रास्ता रोको करणार....अंगणवाडी महिलांचा सरकारला इशारा

स्वराज पक्षाच्या रडारवर आता शिधावाटप दुकाने

आचारसंहिते पूर्वीची " उमेद"