Posts

Showing posts from September, 2025

देवस्थान शेतजमिनी मॅपिंग – जिल्हानिहाय यादी होणार :

Image
देवस्थान शेतजमिनी मॅपिंग – जिल्हानिहाय यादी होणार :  राज्यमंत्री ॲड. आशिष जयस्वाल यांचे निर्देश मुंबई / रमेश औताडे  राज्यामध्ये देवस्थानच्या शेतजमिनी आहेत. या जमिनी हडपण्याच्या बऱ्याच तक्रारी येत आहे. अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी देवस्थानच्या जमीन शेतजमिनींचे मॅपिंग करून त्याच्या जिल्हा निहाय याद्या तयार कराव्यात असे निर्देश विधि व न्याय राज्यमंत्री ॲड आशिष जयस्वाल यांनी मंत्रालयात आयोजित बैठकीत दिले. बैठकीस विधि व न्याय विभागाच्या अवर सचिव मनीषा कदम, महाराष्ट्र मंदिर महासंघाचे पदाधिकारी उपस्थित होते. जयस्वाल म्हणाले, देवस्थानच्या शेतजमिनी बाबत संगणकीय प्रणालीच्या माध्यमातून पोर्टलवर माहिती घेण्यात यावी जिल्हाधिकारी कार्यालयात या विषयासाठी उपजिल्हाधिकारी दर्जाच्या अधिकाऱ्याची नियुक्ती करावी. अतिक्रमित तसेच हडपलेल्या देवस्थानच्या शेतजमिनी मोकळ्या करण्यात याव्यात. देवस्थानच्या शेत जमिनींबाबत झालेल्या व्यवहाराची धर्मादाय आयुक्तांच्या माध्यमातून चौकशी करण्यात यावी. देवस्थान जमिनीच्या ७/१२ वर चुकीच्या नोंदणी करण्यात आल्या असल्याच्या तक्रारींच्या अनुषंगाने धर्मदाय आयुक...

राज्यातील सुरक्षा रक्षक मंडळे सक्षम करावीत - - कामगार मंत्री ॲड.आकाश फुंडकर यांचे निर्देश

Image
राज्यातील सुरक्षा रक्षक मंडळे सक्षम करावीत -  कामगार मंत्री ॲड.आकाश फुंडकर यांचे निर्देश मुंबई / रमेश औताडे  राज्यातील कामगार विभागांतर्गत येणारी सर्व सुरक्षा रक्षक मंडळे सक्षम आणि कार्यक्षम होण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना कामगार विभागाने  तत्काळ राबवाव्यात, असे निर्देश कामगार मंत्री ॲड.आकाश फुंडकर यांनी दिले. राज्यातील सुरक्षा रक्षक मंडळांचा सविस्तर आढावा कामगार मंत्री ॲड.फुंडकर यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी मंत्रालयात घेण्यात आला. या बैठकीस कामगार आयुक्त एच.पी.तुम्मोड, उपसचिव स्वप्नील कापडणीस, अवर सचिव दिलीप वनिरे तसेच कामगार विभागाचे अधिकारी उपस्थित होते. या बैठकीत राज्यातील एकूण १६ सुरक्षा रक्षक मंडळांचा सर्वसाधारण आढावा घेण्यात आला. यावेळी प्रत्येक मंडळासमोरील अडचणी, त्यांच्या कार्यातील अडथळे तसेच त्यावर उपाययोजना करण्याबाबत चर्चा करण्यात आली. कामगार मंत्री ॲड .फुंडकर यांनी या मंडळांच्या कार्यक्षमतेत वाढ करण्यासाठी आवश्यक त्या सूचना दिल्या. यावेळी, विविध आस्थापना आणि जिल्ह्यांतील आरोग्य विभाग तसेच रुग्णालयांमध्ये सुरक्षा रक्षकांची आवश्यकता तपासून त्यानु...

साहित्य संमेलनात सुनिता तुपसौंदर्य यांचा सन्मान

Image
साहित्य संमेलनात सुनिता तुपसौंदर्य यांचा सन्मान मुंबई / रमेश औताडे महाराष्ट्र शासनाच्या बार्टी (बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था) आयोजित लोकशाहीर आण्णाभाऊ साठे साहित्य संमेलन २०२५ मध्ये मुंबईतर्फ  समाजसेविका सुनिता तुपसौंदर्य यांना जनजागृती आणि विविध सामाजिक उपक्रम प्रभावीपणे राबवल्याबद्दल सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. सुनिता तुपसौंदर्य या गेल्या अनेक वर्षांपासून वंचित आणि दुर्बल घटकांसाठी आरोग्य शिबिरे, महिलांसाठी स्वावलंबन उपक्रम, तसेच विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन वर्गांच्या माध्यमातून सतत कार्यरत आहेत. त्यांच्या पुढाकारातून अनेक गरजू कुटुंबांना जीवनावश्यक मदत मिळाली असून परिसरात सामाजिक एकजूट निर्माण करण्यासाठी त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. या प्रसंगी उपस्थित असलेल्या सुप्रसिद्ध लोकशाहीर सुनील साठे यांनी सुनीता तुपसौंदर्य यांच्या कामाचा गौरव करताना म्हटले की, “समाजकार्यात सातत्य आणि प्रामाणिकता ठेवणारी व्यक्ती म्हणजेच खरी जनसेवक. सुनिता तुपसौंदर्य यांनी आपल्या कार्यातून समाजासमोर प्रेरणादायी उदाहरण ठेवले आहे.” साहित्य संमेलनात विविध जिल्ह्यांत...

साहित्य संमेलनात ‘स्वच्छता दूत फाऊंडेशन’ चा सन्मान

Image
साहित्य संमेलनात ‘स्वच्छता दूत फाऊंडेशन’ चा सन्मान मुंबई / रमेश औताडे  महाराष्ट्र शासन बार्टी आयोजित लोकशाहीर आण्णाभाऊ साठे साहित्य संमेलन २०२५ मध्ये मुंबईतर्फे कार्यरत असलेल्या स्वच्छता दूत फाऊंडेशनला महाराष्ट्रभर स्वच्छतेचे काम, जनजागृती आणि सामाजिक उपक्रम राबवल्याबद्दल सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. फाऊंडेशनचे प्रमुख मुकेश पाखरे यांचा गौरव करण्यात आला. या प्रसंगी सुप्रसिद्ध लोकशाहीर सुनील साठे यांनी स्वच्छता दूत फाऊंडेशनच्या कार्याचे कौतुक करत समाजापुढे प्रेरणादायी उदाहरण ठेवल्याचे सांगितले. तसेच मातंग समाजाचे युवा नेते सुरेश साळवे यांनीही फाऊंडेशनद्वारे चालविण्यात येणाऱ्या स्वच्छता कामगार प्रशिक्षण केंद्राविषयी माहिती देत सांगितले की, या केंद्रांतून मिळणाऱ्या प्रशिक्षणामुळे अनेक मुलांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. 

सामाजिक, राजकीय आंदोलनाच्या ७७ खटल्यांना दिलासा

Image
सामाजिक, राजकीय आंदोलनाच्या ७७ खटल्यांना दिलासा मुंबई / रमेश औताडे  राज्यातील धार्मिक, राजकीय आणि सामाजिक आंदोलनांदरम्यान पोलिसांकडे दाखल करण्यात आलेल्या २०१ अर्जदारापैकी ७७ अर्जदारांवरील खटले मागे घेण्याबाबत शासनाने नेमलेल्या मंत्रिमंडळ उपसमितीने शिफारस केली आहे, अशी माहिती सांस्कृतिक कार्य, माहिती तंत्रज्ञान मंत्री ॲड.आशिष शेलार यांनी दिली. राज्यातील राजकीय आणि सामाजिक आंदोलनांदरम्यान दाखल करण्यात आलेले खटले मागे घेण्याबाबत शासनाने नेमलेल्या मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक सह्याद्री अतिथीगृहात पार पडली. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी मंत्री ॲड.शेलार होते. या बैठकीस विधि व न्याय विभागाचे प्रधान सचिव उदय शुक्ला, अभियोग संचालनालयाचे संचालक अशोक भिल्लारे, गृह विभागाचे उपसचिव चेतन निकम तसेच राज्यातील वरिष्ठ पोलीस अधिकारी उपस्थित होते. स्त्रीविषयक गुन्हे, गंभीर स्वरूपाचे खटले, वैयक्तिक व दिवाणी प्रकरणे ही शासनाच्या धोरणांतर्गत माफ केली जाऊ शकत नाहीत. त्यामुळे अशा प्रकरणावरील खटले मागे घेण्यास स्पष्ट नकार देण्यात आला असल्याचे मंत्री ॲड. शेलार यांनी सांगितले. तसेच, आमदार, माजी आमदार, ख...

सुसंवाद जनतेच्या मनात......

Image
सुसंवाद उपक्रमाअंतर्गत संदीप नाईक जनसेवेत  नवी मुंबई / रमेश औताडे  "सुसंवाद" उपक्रमाअंतर्गत  बेलापूर येथील जनसंपर्क कार्यालयात नागरिकांसमवेत प्रथम आमदार संदीप नाईक यांनी थेट संवाद साधला. नागरिकांनी आपल्या परिसरातील समस्यांबाबत माहिती दिली, यावेळी त्यांच्या प्रत्येक समस्यांचा गांभीर्याने आढावा घेण्यात आला. काही समस्यांवर तातडीने कार्यवाही करण्यात आली. तर काही समस्यांसंदर्भात संबंधित यंत्रणेशी समन्वय साधण्याचे आश्वासन नागरिकांना देण्यात आले. "सुसंवाद" हा नागरिकांच्या विश्वासाचा सेतू आहे. जनतेच्या प्रश्नांना उत्तरे देणे, त्यांना आधार देणे आणि त्यांच्या अडचणी सोडविण्याचा खरा उद्देश्य या संवादातून पूर्णत्वाला जात आहे, अशी खात्री असल्याचे नाईक यांनी सांगितले.

कुटुंब धर्म समानता दुसरे अधिवेशन संपन्न

Image
कुटुंब धर्म समानता दुसरे अधिवेशन संपन्न मुंबई / रमेश औताडे  सर्व धर्मांतील लिंग समानता, जातभेद, पर्यावरणीय संकट, स्त्री प्रश्न, सांप्रदायिक हिंसा आणि कुटुंबव्यवस्थेवरील धर्माच्या भूमिकेवर आधारित संसद ऑफ रिलिजन्सचे दुसरे अधिवेशन २७ सप्टेंबर रोजी मरीन लाईन्स येथील बहाई सेंटरमध्ये पार पडले.  इंटर-रिलीजीअस सॉलिडॅरिटी कौन्सिल, सेंटर फॉर द स्टडी ऑफ सोसायटी अँड सेक्युलरिझम आणि बहाई सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने हे अधिवेशन होते. प्रभू केशव चंद्र दास यांनी धर्म हा संघर्ष नव्हे तर शांतता आणि करुणेचा मार्ग असल्याचे सांगितले. रजनी बक्षी यांनी कृतीविना भावना व्यर्थ असल्याचे अधोरेखित केले, तर डॉ. सुरिंदर कौर यांनी मणिपूरमधील महिलांच्या संघर्षाचा उल्लेख केला. प्रभू गोविंद दास यांनी पर्यावरण आणि दानधर्म यातील संबंध मांडले, तर ताहिरीह महिजा यांनी आध्यात्मिक नूतनीकरणातून एकतेचा संदेश दिला.झिया इशराघि, जया पुत्रन, रणजीत सिंह आणि बहाई सोसायटीच्या सेक्रेटरी नर्गिस गौर उपस्थित होते. राधिका सूद नायक यांच्या गीतांनी वातावरण भारावून गेले. रोशनी शेनाझ यांनी चांगले विचार, शब्द आणि कृतींचे ...

कामगारमंत्री सुरक्षा रक्षकांच्या दारी –

Image
कामगारमंत्री सुरक्षा रक्षकांच्या दारी –  न्याय मिळणार की पुन्हा आश्वासानांचा खेळ ! मुंबई / रमेश औताडे  राज्यातील सुरक्षा रक्षकांच्या प्रलंबित मागण्यांकडे सरकारने शेवटी लक्ष देण्यास सुरुवात केली असून याची पहिली पायरी म्हणून कामगार मंत्री आकाश फुंडकर यांनी सानपाडा येथील महाराष्ट्र सुरक्षा रक्षक मंडळाच्या कार्यालयाला भेट दिली. या भेटीदरम्यान विविध संघटनांचे कामगार नेते आणि अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. खाजगी सुरक्षा रक्षकांची ड्युटी बारा तास आहे. त्यांना योग्य मोबदला मिळत नाही. अनेक ठिकाणी महिना अखेरीस पगार वेळेवर मिळत नाही, तर काही ठिकाणी दोन ते तीन महिन्यांची थकबाकी देखील असते. या सर्व खाजगी रक्षकांना मंडळात घेतले तर त्यांना कायद्याचे कवच मिळेल. आठ तास ड्युटी होईल व इतर भत्ते मिळतील. २७ मार्च २०२५ च्या शासन निर्णयमध्ये शासन बदल घडून आणणार का ठेकेदाराकडे काम करणाऱ्या सुरक्षारक्षकांना न्याय देणार आहे का ?  पसारा ऍक्ट मध्ये एक न्याय आणि शासन आदेश ठेकेदाराकडील सुरक्षारक्षकांना गुलामगिरीत लोटणारा असाच दिसून येत आहे तो शासन बदली करणार का ? असा प्रश्न यावेळी क...

घणसोलीत रासायनिक सांडपाण्याने नागरिक त्रस्त;

घणसोलीत रासायनिक सांडपाण्याने नागरिक त्रस्त;  पर्यावरण रक्षक समितीची चेतावणी –  “कारवाई झाली नाही तर रस्त्यावर उतरणार” नवी मुंबई / रमेश औताडे  घणसोली MIDC परिसरातील औद्योगिक कंपन्यांकडून नियमबाह्यरित्या सोडले जाणारे रासायनिक सांडपाणी आता नागरिकांच्या आरोग्य आणि पर्यावरणासाठी गंभीर संकट बनले आहे. रात्री उशिरा या कंपन्या उपचार न केलेले केमिकलयुक्त पाणी थेट नाल्यात सोडतात, ज्यामुळे परिसरात उग्र दुर्गंधीचा विळखा तयार होतो. घणसोली, कोपरखैराणे गाव परिसर, तसेच अनेक गृहनिर्माण संकुलांत श्वसनाचा त्रास, डोळ्यांत जळजळ आणि त्वचारोगाच्या तक्रारी वाढल्याचे नागरिकांनी सांगितले. या वाढत्या प्रदूषणाविरोधात स्थानिक रहिवासी, महिला गट, युवक आणि ज्येष्ठ नागरिकांनी एकत्र येत “पर्यावरण रक्षक समिती” स्थापन केली आहे. समितीने स्पष्टपणे सांगितले की, “कागदोपत्री कारवाई नाही; आम्हाला प्रत्यक्ष परिणाम हवा.” प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि MIDC हे फक्त नोटीस टाकून आपली जबाबदारी संपली असे समजतात. पण प्रदूषण थांबवण्यासाठी प्रत्यक्ष सीलबंदी आणि दंडात्मक कारवाई होणे गरजेचे आहे. समितीने दिलेल्या माहितीप्रमाणे, घण...

जुलमी थकीत बिल म्हाडाकडून अखेर मागे

Image
जुलमी थकीत बिल म्हाडाकडून अखेर मागे मुंबई / रमेश औताडे  गोरेगावच्या मोतीलाल नगरवासियांना म्हाडाचे थकीत बिलाच्या नावाखाली ३५ हजार रूपयांचं बिल पाठवलं होतं. हा निर्णय म्हाडाने आता रद्द केला आहे. या जुलमी निर्णयाविरूद्ध मोतीलाल नगर विकास समितीचे अध्यक्ष युवराज मोहिते यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने म्हाडा उपाध्यक्षांना निवेदन देवून इशारा देण्यात आला होता.  मोतीलाल नगरच्या पुनर्वसनाच्या मुद्द्यावर रहिवाशांचा संघर्ष राज्य सरकार सोबत सुरू आहे. हे सुरू असताना जुलै महिन्यापासून ३५ हजारांपासून रूपयांपासून ४५ हजारांपर्यंत रुपयांचं अनाकलनीय बिल प्रत्येक रहिवाशांना पाठवून त्रासात भर टाकली.  रहिवाशांच्या या पिळवणुकी विरुद्ध युवराज मोहिते यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने म्हाडा उपाध्यक्षांना निवेदन देऊन ही बिललाढ त्वरित रद्द करावी, अन्यथा उग्र आंदोलन करण्याचा इशारा दिला. म्हाडा उपाध्यक्ष संजीव जैस्वाल यांनी याबाबत निर्णय घेण्याच्या सूचना मुंबई सीईओ यांना दिली. यानंतर ३५ हजारांचं हे बिल रद्द करून केवळ ९ हजार रूपये आकारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. रहिवाशांच्या एकजुटीने ह...

ज्येष्ठ नागरिक प्रभात मित्र मंडळाच्या सचिवपदी वरिष्ठ पत्रकार नासिकेत पानसरे

Image
ज्येष्ठ नागरिक प्रभात मित्र मंडळाच्या अध्यक्षपदी विवेक गायकवाड, तर सचिवपदी पत्रकार नासिकेत पानसरे मुंबई / रमेश औताडे  विक्रोळी कन्नमवार नगर येथील ज्येष्ठ नागरिक प्रभात मित्र मंडळ (रजि.) यांच्या २०२५  ते   २०२८ त्रैवार्षिक कार्यकारिणी निवडणूकीत अध्यक्षपदी विवेक विठोबा गायकवाड तर सचिवपदी, समाजभूषण ज्येष्ठ पत्रकार नासिकेत कृष्णकांत पानसरे यांची निवड झाली आहे. दिपक देशनेहरे आणि  विनोद वणीकर यांनी निवडणूक अधिकारी म्हणून काम पाहिले. उपाध्यक्ष : निवृत्ती शिदू मस्के उपसचिव :श्रद्धानंद रावबा निकम,खजिनदार : गौतम निवृत्ती डांगळे कार्यकारिणी सदस्य : सुरेश भिकाजी सरनोबत, भुमैय्या रामलू सोमा, राजाराम शंकर क्षीरसागर, बबन बापू माने, दत्तात्रय रामचंद्र धनवडे, सुनिल नारायण गायकवाड यांची निवड झाली. नवनिर्वाचित अध्यक्ष विवेक गायकवाड आणि सचिव  पत्रकार नासिकेत पानसरे यांनी सांगितले आम्ही सभासदांचा विश्वास सार्थ ठरवू आणि प्रभात मित्र मंडळाच्या गौरवशाली परंपरेला पुढे नेऊ. मंडळाचे आगामी उपक्रम हे ज्येष्ठ नागरिकांचे आरोग्य, मनोरंजन आणि सामाजिक सहभाग यावर केलेले असतील.

आयटी क्षेत्रातील तरुणांमध्ये हृदयविकाराचा धोका वाढला

Image
आयटी क्षेत्रातील तरुणांमध्ये हृदयविकाराचा धोका वाढला मुंबई / रमेश औताडे  ताणतणावपूर्ण कामाचे वातावरण, संगणकासमोर दीर्घकाळ बसून काम, अपुरी झोप आणि असंतुलित आहार यांचा आयटी क्षेत्रातील तरुण कर्मचाऱ्यांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होत असून हृदयविकाराचे प्रमाण झपाट्याने वाढत आहे. मागील काही वर्षांतील विविध अहवालानुसार, देशभरातील आयटी कर्मचाऱ्यांमध्ये हृदयविकाराचे रुग्ण वाढल्याचे स्पष्ट झाले आहे.  विशेषतः महाराष्ट्र आणि कर्नाटकातील आयटी हब असलेल्या पुणे व बंगळुरू येथे तरुण वयोगटात हृदयविकाराच्या तक्रारींमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. २०१८ मध्ये आयटी कर्मचाऱ्यांमधील हृदयविकाराचे प्रमाण ७ टक्के होते, ते २०२२ मध्ये ९० टक्क्यांपेक्षा जास्त झाले. गेल्या पाच वर्षांत आयटी क्षेत्राशी संबंधित हृदयविकार रुग्णांची संख्या ६० टक्क्यांनी वाढली आहे. ३० ते ४५ वयोगटातील तरुण कर्मचाऱ्यांच्या आकस्मिक रुग्णप्रवेशाचे प्रमाण ४० टक्क्यांनी वाढले आहे. हृदयरोग तज्ज्ञांच्या मते, सतत १०  ते १२ तास संगणकासमोर बसून काम करणे, फास्ट फूडचे अतिसेवन, व्यायामाचा अभाव आणि अपुरी झोप यामुळे उच्च रक्तदाब, म...

महाराष्ट्राचा माणूस पंतप्रधान होऊ नये म्हणून बदनामी

Image
महाराष्ट्राचा माणूस पंतप्रधान होऊ नये म्हणून बदनामी  लेखक अशोकराव टाव्हरे यांचा आरोप मुंबई / रमेश औताडे  केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्यावर बारा वर्षांनंतर पुन्हा विविध आरोप करून हेतुपुरस्सर बदनामी करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप त्यांच्या कार्यावर पुस्तके लिहिणारे लेखक अशोकराव टाव्हरे यांनी केला आहे. भविष्यात गडकरी यांना पंतप्रधानपदाची संधी मिळू नये यासाठी हा खटाटोप होत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. मुंबई–पुणे द्रुतगती महामार्गामुळे आज प्रवास सुखकर झाला आहे. परंतु त्यामागे तत्कालीन सार्वजनिक बांधकाम मंत्री नितीन गडकरी यांनी मांडलेली द्रुतगती मार्गाची संकल्पना होती. शासन एवढा खर्च करू शकत नसल्याने गडकरींनी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाची स्थापना केली. १५८५ कोटी रुपयांचे बाँड उभारून अवघ्या १६०० कोटी रुपयांत द्रुतगती महामार्ग उभारण्यात आला.  २०१३ मध्ये गडकरी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष असताना दुसरी टर्म मिळू नये म्हणून त्यांच्यावर आरोप झाले होते. त्या काळी काँग्रेसचे सरकार राज्यात आणि केंद्रात सत्तेत होते. अनेक चौकशीनंतर गडकरी...

चंदनाच्या खोडापासून साकारलेली अद्वितीय मूर्ती

Image
चंदनाच्या खोडापासून साकारलेली अद्वितीय मूर्ती मुंबई / रमेश औताडे उमरखाडीच्या नवरात्र उत्सवातील आकर्षण ठरणारी आईची मूर्ती ही तिच्या वैशिष्ट्यपूर्ण घडणीमुळे भक्तांना मंत्रमुग्ध करते. ह्या देवीचा चेहरा संपूर्णपणे चंदनाच्या खोडापासून साकारलेला असून चेहऱ्यावर उमटलेले सात्विक भाव भक्तांच्या मनाला भुरळ घालतात. या मूर्तीचे वैशिष्ट्य म्हणजे संपूर्ण मूर्ती – सिंहासह – चंदनाच्या लाकडातून तयार करण्यात आलेली आहे. वसई येथील ख्रिश्चन समाजातील सिक्वेरा बंधूंनी सन १९७० मध्ये ही अप्रतिम मूर्ती साकारली. विशेष म्हणजे देवीचे व सिंहाचे डोळे हे परदेशातून (ऑस्ट्रेलियामधून) आयात केलेल्या लेन्सचे असून मूर्तीला वेगळेच आकर्षण प्राप्त झाले आहे. ही मूर्ती फोल्डिंग स्वरूपाची असून तिची घडण दोन पद्धतींनी करण्यात आली आहे. त्यामुळे एक वर्ष देवी उभी दिसते तर दुसऱ्या वर्षी बसलेल्या अवस्थेत दर्शन देते. या अनोख्या परंपरेमुळे उमरखाडीच्या नवरात्रोत्सवाला विशेष महत्त्व लाभले आहे. आजतागायत अवघ्या मुंबापुरीतूनच नव्हे तर दूरदूरहून भक्तगण नवरात्रात देवीचे दर्शन घेण्यासाठी उमरखाडीत दाखल होत असतात. 

वाशीतील फादर अग्नल स्कूल वॅन अपघात – दोन विद्यार्थी गंभीर जखमी :

Image
नवी मुंबई / ॲड मनोज टेकाडे  वाशीतील फादर अग्नल स्कूल वॅन अपघात –  दोन विद्यार्थी गंभीर जखमी :  दोषींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची ॲड मनोज टेकाडे यांची मागणी... वाशी येथील फादर अग्नल स्कूल वॅन भीषण अपघातात दोन विद्यार्थी गंभीर जखमी झाले ही अत्यंत दुर्दैवी घटना आहे. या अपघाताला थेटपणे शाळा प्रशासन, व्हॅन कंत्राटदार व RTO विभाग जबाबदार आहेत. विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळणाऱ्या या निष्काळजीपणाविरोधात प्रहार विद्यार्थी संघटना तीव्र आवाज उठवत आहे. असे आज प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात प्रहार जनशक्ती पक्ष राज्य प्रवक्ता ॲड मनोज टेकाडे यांनी म्हटले आहे .. संघटनेच्या ठाम मागण्या पुढीलप्रमाणे आहेत : स्कूल व्हॅन ड्रायव्हर व कंत्राटदारावर तातडीने सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा. संबंधित व्हॅन कंत्राट तत्काळ रद्द करावे. निष्काळजी ड्रायव्हरचे लायसन्स कायमचे रद्द करावे. RTO विभाग व शाळा प्रशासनावर कडक कारवाई करून जबाबदारी निश्चित करावी. RTO विभागाने स्कूल वॅन कंत्राटदाराचा परवाना कायमचा रद्द करावा.. त्याच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा. विद्यार्थ्यांच्या सुरक्ष...

धम्मचक्र परिवर्तन दिनी आरक्षण अंमलबजावणी मेळावा

Image
धम्मचक्र परिवर्तन दिनी आरक्षण अंमलबजावणी मेळावा मुंबई / रमेश औताडे  धम्मचक्र परिवर्तन दिनाच्या पूर्वसंध्येला आंबेडकरी रिपब्लिकन मोर्चा च्या वतीने आरक्षण अंमल मेळाव्याचे आयोजन करण्यात आल्याची माहिती आंबेडकरी रिपब्लिकन मोर्चा चे राष्ट्रीय अध्यक्ष नारायण बागडे दिली. टिळक पत्रकार भवन धंतोली नागपूर येथील सभागृहात १ ऑक्टोबर रोजी दुपारी २ वाजता मेळाव्याचे आयोजन केले आहे.  मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रीय अध्यक्ष नारायण बागडे, उद्घाटक चंद्रकांत सोनवणे, प्रमुख पाहुणे कृष्णा बेडसे, उद्धव तायडे, दशरथ कांबळे, विकास काटे, प्रा. संध्या रायठक, मंगला बिहारे, डॉ. आशा पारधे, नामदेवराव निकोसे, प्रा. सुधा जनबंधू, राधाबाई पाटील, धर्माजी बागडे, देवेंद्र बागडे हे उपस्थित राहतील.  मेळाव्याचे आयोजक प्रा. रमेश दुपारे सुखदेवराव मेश्राम, राजू पांजरे, प्रकाश कांबळे, जयदेव चिवंडे, बबलू कडवे, शालिक बांगर हे राहणार आहे. मेळाव्यात राज्यातील आंबेडकरी रिपब्लिकन मोर्चाच्या प्रणित महिला मोर्चा, युवा मोर्चा, विद्यार्थी मोर्चा, कामगार मोर्चाचे जिल्हाध्यक्ष पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी राहणा...

*थॅलेसेमिया मुक्त कार्यशाळेत रुग्ण मित्रांचा सहभाग*

Image
*थॅलेसेमिया मुक्त कार्यशाळेत रुग्ण मित्रांचा सहभाग* मुंबई / रमेश औताडे  रा.स्व.संघ जनकल्याण समिती, वामनराव ओक रक्त केंद्र, ठाणे आयोजित थलेसेमिया मुक्त महाराष्ट्र प्रकल्प अंतर्गत विभागीय कार्यशाळेचे आयोजन हितवर्धिनी सभा ब्राह्मण सोसायटी नौपाडा ठाणे येथे करण्यात आले होते  कार्यशाळेचे उद्घाटन डॉ.कैलास पवार जिल्हा शल्यचिकित्सक,ठाणे यांच्या हस्ते करण्यात आले.डॉ.अजित मराठे अध्यक्ष राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जनकल्याण समिती महाराष्ट्र थॅलेसमिया रुग्णांसाठी योजनांची माहिती डॉ.महेंद्र केंद्रे पॅथॉलॉजिस्ट बीटीओ सिविल हॉस्पिटल ठाणे, डॉ.आशुतोष काळे यांनी दृकश्राव्यद्वारे माहिती दिली.  थॅलेसेमिया चाचणी यंत्राचे सादरीकरण डॉ. प्रशांत खडके,थॅलेसेमिया काळजी आणि उपचार चर्चासत्रात डॉ.स्मिता महाले से.नि.संचालक आयसीएमआर, डॉ. शैलेश पांडे वरिष्ठ वैद्यकीय अनुवंशशास्त्र व अनुवंशिक सल्लागार आयसीएमआर,डॉ.राजेश पाटील जुपिटर हॉस्पिटल यांचेही मार्गदर्शन लाभले. थॅलेसेमिया रुग्ण पालक व स्वयंसेवी संस्था यांनी अनुभव कथन केले. थॅलेसेमिया नियंत्रण पद्धती,माहिती आणि विश्लेषण Care- काळजी,Cure-बरा,Curb-...

मुख्यमंत्री धोबी समाजाच्या आरक्षणावर लक्ष देतील का....?

Image
मुख्यमंत्री धोबी समाजाच्या आरक्षणावर लक्ष देतील का....?  मुंबई /रमेश औताडे  राज्यातील धोबी समाजाच्या आरक्षणासाठी मुख्यमंत्री देवेद्र फडणवीस हे सन 2005 मध्ये विरोधी पक्षनेता असताना धोबी समाजाच्या आंदोलन सभेला संबोधित करताना ते स्वतः सांगत होते. मि विधान सभेत मध्ये असताना तत्कालीन सामाजिक न्याय मंत्री चंद्रकांत हंडोरे यांना प्रश्न केला होता की, राज्य शासनाकडे डॉ. भांडे समितीचा रिपोर्ट आपल्यकडे असताना आपण बार्टी चा रिपोर्ट का मागता? याचा अर्थ असा आहे की, आपल्या सरकारला धोबी समाजाला आरक्षण द्यायचे नाही.  व नुसते झुलवत ठेवायचे आहे. असे म्हणणारे तात्कालीन विरोधी पक्षनेता होते मात्र आज सत्तेत असून राज्याचे मुख्यमंत्री आहेत. आणि आता सुद्धा ते बार्टीचा अहवाल मागत आहेत. मग हे समाजाला झुलवत ठेवायचे नाही काय? मुख्यमंत्री यांनी आपली चूक दुरुस्त करून त्यांना खरच धोबी समाजाला आरक्षण द्यायचे असेल तर त्यांनी आता बार्टीचा अहवाल न मागवता सरळ सरळ डॉ भांडे समितीचा अहवाल आणि त्यातील तरतुदी ह्या केंद्र सरकारला पाठवावा. तसेच डॉ भांडे समितीचा अहवाल राज्य शासनाने तेंव्हाच स्वीकारला आहे...

१० वा राष्ट्रीय आयुर्वेद दिन २०२५ उत्साहात साजरा

१० वा राष्ट्रीय आयुर्वेद दिन २०२५ उत्साहात साजरा  रमेश औताडे  आरआरएपी कॅरी (RRAP CARI), सीसीआरएएस (CCRAS) द्वारे २३ सप्टेंबर २०२५ रोजी १० वा राष्ट्रीय आयुर्वेद दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.  या निमित्ताने विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते, ज्यात नॉन-फ्लेम कुकिंग, वादविवाद, रांगोळी, चित्रकला आणि निबंध लेखन यांचा समावेश होता.  या कार्यक्रमात विजेत्यांना सन्मानित करण्यासाठी पारितोषिके आणि प्रमाणपत्रे प्रदान करण्यात आली. यावेळी अनेक मान्यवर उपस्थित होते, ज्यात मुंबईचे जीएसटी आयुक्त (अर्थ मंत्रालय, भारत सरकार) माननीय राजेश धाबरे, कोल इंडिया लिमिटेडचे ​​कार्यकारी संचालक श्री. के.एस. सिंह आणि बीएमएस (BMS) व एपेक्स जेसीसी (Apex JCC) सदस्य, सीआयएल (CIL) चे कोल सेक्टर इन्चार्ज श्री. के. लक्ष्मा रेड्डी यांचा समावेश होता.

अनुवंशिक आजार जनजागृती परिषद

Image
अनुवंशिक आजार जनजागृती परिषद मुंबई / रमेश औताडे  वारस हक्काने संपत्ती मिळते तसे अनुवंशिक आजारही आपल्या शरीरात पूर्वजांकडून येतात. या अनुवंशिक आजाराची माहिती आपल्याला अगोदरच मिळाली तर आपल्याला होणारे संभाव्य आजार ओळखून त्याबाबत उपाययोजना केल्या जाऊ शकतात. या पार्श्वभूमीवर मुंबईत अनुवंशिक आजार परिषद मुंबईत नुकतीच पार पडली. अनुवंशिक आजार समजल्यामुळे रुग्णांना आजारांची शक्यता आधीच समजते, योग्य वेळी निदान होते आणि प्रत्येकासाठी वेगळे उपचार ठरवता येतात. त्यामुळे कुटुंबांना भविष्यातील आरोग्यधोक्या विषयी आधीच माहिती मिळते. असे अपोलो रुग्णालयांच्या उपाध्यक्षा डॉ. प्रीता रेड्डी यांनी सांगितले. अपोलो रुग्णालयाने  देशभरातील त्यांच्या केंद्रांमध्ये आतापर्यंत अकरा हजार रुग्णांची अनुवंशिक आजार आरोग्य तपासणी व सल्ला  मार्गदर्शन केले असून हि जनजागृती अजून सुरूच राहणार आहे. मुंबई, दिल्ली, चेन्नई, बंगळुरू, हैदराबाद, अहमदाबाद, कोलकाता यांसह १२ शहरांत हि जनजागृती सुरू राहणार आहे. यावेळी अनुपम सिब्बल, सोहा अली खान, अरुणेश पुनेथा, डॉ. क्षितिजा, डॉ धवेंद्र कुमार उपस्थित होते.

सरकारकडून मत्स्यशेतकऱ्यांच्या मागण्यांना हिरवा कंदील

Image
सरकारकडून मत्स्यशेतकऱ्यांच्या मागण्यांना हिरवा कंदील मुंबई / रमेश औताडे  राज्यातील मत्स्यशेतकऱ्यांच्या समस्या आणि त्यांचे सक्षमीकरण यासाठी मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी मंत्रालयात विस्तृत चर्चासत्र घेतले होते त्यावेळी त्यांनी मत्स्यशेतकऱ्यांच्या मागण्यांबाबत सरकार सकारात्मक असून लवकरच त्यांच्या मागण्यांबाबत योग्य तो निर्णय घेऊ असे सांगितले. मत्स्यव्यवसाय क्षेत्राला अधिक चालना मिळावी म्हणून राज्य शासनाने बजेट वाढवण्याची गरज आहे. मत्स्यव्यवसाय हा किनारपट्टीवरील हजारो कुटुंबांचा प्रमुख उदरनिर्वाह आहे. त्यामुळे या क्षेत्रातील मूलभूत सुविधा, बाजारपेठ आणि प्रक्रिया उद्योग वाढवण्यासाठी सरकारकडून अधिक निधी आवश्यक आहे. आम्ही मुख्यमंत्र्यांकडे बजेट वाढवून देण्याची विनंती केली आहे. मुख्यमंत्री जलसंपदा योजना जानेवारी २०२६ पासून राज्यात राबवण्यात येणार असून मत्स्यव्यवसायाशी निगडित पायाभूत सुविधा उभारणे, मत्स्य बंदरांचा दर्जा उंचावणे आणि जलसंपदांचे शाश्वत व्यवस्थापन हे या योजनेचे प्रमुख उद्दिष्ट असेल. तसेच एकूण २६ नवीन योजना पुढील आर्थिक वर्षात अंमलात येणार असल्याची म...

मंत्रालयाच्या हाकेच्या अंतरावर जनता त्रस्त : भर पावसात मुंबई पालिकेचे नळ कोरडे

Image
मंत्रालयाच्या हाकेच्या अंतरावर जनता त्रस्त  :  भर पावसात मुंबई पालिकेचे नळ कोरडे  लाच न मिळाल्याने अभियंते देईनात लक्ष मुंबई / रमेश औताडे  भविष्यात पुढील २५ वर्षात मुंबईला किती पाणी लागेल, किती कोटी लिटरची गरज भासेल याचे आराखडे आखले जात आहेत. ते महत्त्वाचेच आहे. पण, आज आत्ता मुंबईतील मानखुर्द परिसरातील पी एम जी पी वसाहतीमधील काही इमारतीमधील नागरिक घरातील पालिकेच्या नळाला पाणी नाही म्हणून त्रस्त आहेत. महिला पाण्यासाठी भटकत असून काही पुरुष अंघोळ न करता नोकरीवर जाऊन कामाच्या ठिकाणी अंघोळ करत आहेत. मंत्रालयाच्या हाकेच्या अंतरावर असणाऱ्या या भागातील वास्तव पाहिल्यास यासारखी दुर्दैवी घटना दुसरी कोणती नसेल असा सवाल या भागातील त्रस्त लाडक्या बहिणी करत आहे. मुंबई महानगर पालिका ही जगप्रसिद्ध पालिका. एका राज्याच्या अर्थसंकल्पाएवढा प्रचंड महसूल हाताळणारी. मात्र या पालिकेतील करदाताच, पाणी नसल्याने स्वतःच्या घरात अंघोळ न करता, कामाच्या ठिकाणी जाऊन अंघोळ करतो ही वस्तुस्थिती केवळ लाजिरवाणी आहे.  अशा वेळी मनसे, दोन्ही शिवसेना, दोन्ही राष्ट्रवादी, भाजप आणि काँग्रेस हे...

माफी मागत नाही तोपर्यंत आंदोलन

Image
माफी मागत नाही तोपर्यंत आंदोलन  मुंबई / रमेश औताडे  राष्ट्रवादीचे आमदार जयंत पाटील यांच्या बाबत अपशब्द वापरणारे भाजपाचे आमदार गोपीचंद पडळकर जोपर्यंत माफी मागत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच राहणार असा इशारा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे  जिल्हाध्यक्ष सचिनभाऊ लोंढे यांनी दिला आहे. मुंबई विभागीय राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने उत्तर पश्चिम जिल्हा जोगेश्वरी तालुका वार्ड क्रमांक ७९ या ठिकाणी पडळकर यांचा पुतळा जाळण्याचा प्रयत्न केला व त्याच्या प्रतिमेस जोडे मारो आंदोलन केले.  यावेळी मुंबई अध्यक्ष युवक अमोल मातले, मुंबई प्रतिनिधी प्लेस डिसोजा, इमरान तडवी, शंकर राक्षे, गोसुदीन शेख, स्वप्नील पाटील, कमलेश दांडगे, शैलेश वाघेला, फिरोज शेख, नितीन लोंढे, हर्षद लोंढे, तांबे ताई व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

स्वच्छता दूत फाउंडेशनचा स्वच्छता उपक्रम

Image
स्वच्छता दूत फाउंडेशनचा स्वच्छता उपक्रम मुंबई / रमेश औताडे  महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त १७ सप्टेंबर २०२५ ते २ ऑक्टोबर २०२५ दरम्यान संपूर्ण देशभरात राबविण्यात येणाऱ्या स्वच्छतो महोत्सवात स्वच्छता दूत फाउंडेशन सक्रियपणे सहभागी झाले आहे. या उपक्रमाचा भाग म्हणून मुंबई हार्बर लाईनवरील गोवंडी रेल्वे स्थानक येथे दिनांक १८ सप्टेंबर २०२५ रोजी स्वच्छता अभियान राबविण्यात आले. गोवंडी रेल्वे स्थानक प्रमुखांच्या उपस्थितीत स्थानक परिसराची स्वच्छता करण्यात आली. "स्वच्छता मनाची, स्वच्छता घराची, स्वच्छता परिसराची आणि स्वच्छता देशाची" या घोषणांनी वातावरण भारावून गेले होते. फाउंडेशनचे अध्यक्ष मुकेश पाखरे, समन्वयक जितेंद्र साळी, रिबेका पाखरे, समिंदर बाई आठवले, माया साबळे, वायदा कुरेशी, अनिल पाटोळे व नौशात कुरेशी आदींनी विशेष प्रयत्न केले.

पत्नीपीडित पुरुषांचा राज्यस्तरीय मेळावा

Image
पत्नीपीडित पुरुषांचा राज्यस्तरीय मेळावा मुंबई / रमेश औताडे आयुष्याचा आधारवड मानलेल्या संसारातच अन्यायाचा सामना करताना अनेक पुरुष मानसिक, सामाजिक आणि कायदेशीर आघातांना तोंड देत आहेत. या वेदनेला आवाज देण्यासाठी  पत्नीपीडित पुरुषांचा राज्यस्तरीय मेळावा नुकताच पार पडला. या मेळाव्यात मोठ्या संख्येने उपस्थित राहिलेल्या पुरुषांनी आपले संघर्षमय अनुभव मांडले. काही पुरुषांचे डोळे त्यांच्या अन्यायाची कहाणी सांगत  होते, तर काहींच्या आवाजात दडपलेली आर्त वेदना स्पष्ट जाणवत होती. संसार वाचवण्यासाठी प्रयत्न करतानाही खोट्या गुन्ह्यांचे खापर फोडले गेले, पोटगीच्या जाचक अटींनी उराशी घाव बसले, मानसिक छळाचा कहर झाला आहे. अशी जिव्हारी लागणारी कहाणी अनेक पुरुषांनी यावेळी  मांडली. या वेळी पत्नीपीडित पुरुष हक्क संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी कायदेशीर मार्गदर्शनासह मानसिक आधार दिला आणि “न्याय मिळेपर्यंत एकजुटीने लढा देऊया” अशी भावनिक हाक दिली. मेळाव्यात पोटगीच्या अन्यायकारक अटी, खोटे गुन्हे दाखल करणे, महिलांसाठी असलेल्या कायद्यांचा गैरवापर याविरोधात ठाम आवाज उठला. या समस्या सोडवण्यासाठी...

‘ गाव तिथे कार्यकर्ता ’ अभियानाचा पहिला टप्पा पूर्ण

Image
 ‘ गाव तिथे कार्यकर्ता ’ अभियानाचा पहिला टप्पा पूर्ण मुंबई / रमेश औताडे  गाव तिथे कार्यकर्ता हे नागपूरातून सुरू झालेले प्रतीकात्मक अभियान आज महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचले असून, या उपक्रमाचा पहिला टप्पा यशस्वीरीत्या पूर्ण झाल्याची माहिती आंबेडकरी रिपब्लिकन मोर्चा, नागपूर शहराचे अध्यक्ष प्रा. रमेश दुपारे यांनी दिली. “हा चमत्कार फक्त कार्यकर्त्यांच्या कष्ट आणि निष्ठेमुळे शक्य झाला. एक सामान्य कार्यकर्ताही चळवळ पुढे नेऊ शकतो, हे या अभियानातून स्पष्ट झाले आहे. फक्त जिद्द आणि जिगर यांच्यावर विश्वास ठेवून गावोगाव कार्यकर्ते उभे राहिले, आणि त्यामुळे अभियानाला व्यापक प्रतिसाद मिळाला,” असे दुपारे यांनी सांगितले. ‘गाव तिथे कार्यकर्ता’ या अभियानाचा पहिला टप्पा संपन्न झाला असून, लवकरच दुसऱ्या टप्प्याचे नियोजन जाहीर करण्यात येणार आहे. यासाठी आंबेडकरी रिपब्लिकन मोर्चा चे राष्ट्रीय अध्यक्ष नारायण बागडे यांचे राज्यव्यापी मार्गदर्शन अभियान सुरू होणार आहे.

महाराष्ट्र राज्यस्तरीय सांस्कृतिक कलावंत मेळावा

Image
महाराष्ट्र राज्यस्तरीय सांस्कृतिक कलावंत मेळावा  मुंबई / रमेश औताडे  महाराष्ट्राची परंपरा आणि लोककला जपणे, कलावंतांना व्यासपीठ उपलब्ध करून देणे आणि नव्या पिढीला सांस्कृतिक वारसा समजावून सांगण्यासाठी मुंबईत राज्यस्तरीय सांस्कृतिक कलावंत मेळावा होत असल्याची माहिती शरदचंद्र प्रतिभाशाली सांस्कृतिक प्रतिष्ठान चे अध्यक्ष राजाराम बुवा शेलार  यांनी दिली. मुंबईत रविवार २१ सप्टेंबर रोजी रविंद्र नाट्य मंदिर, प्रभादेवी येथे हा मेळावा आयोजित करण्यात आला आहे. महाराष्ट्रातून विविध कलाक्षेत्रातील नामवंत व नवोदित कलावंत, संगीतज्ञ, नर्तक, कलाकार, शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रातील मान्यवर एकत्र येणार आहेत.  कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे  म्हणून माननीय शरद पवार त्यांच्या पत्नी प्रतिभा पवार, सुप्रिया सुळे , आदित्य ठाकरे, डॉ अमोल कोल्हे, सुषमा अंधारे, अभिनेते किरण माने व सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत. नामवंत कलावंतांचे सादरीकरण, भजन, गोंधळ, दशावतार, पोवाडे, लावणी, वाघ्या मुरळी, आदिवासी नृत्य, कोळीनृत्य यांसारखे रंगतदार कार्यक्रम सकाळी ९ ते रात्री ९ पर्यंत ह...

पितृपक्षात कावळे कमी असल्याने पितरांच्या नैवेद्यासाठी तारांबळ

Image
पितृपक्षात कावळे कमी असल्याने पितरांच्या नैवेद्यासाठी तारांबळ पक्ष्यांचे महत्त्व कळण्यासाठी शहरात जनजागृतीची आवश्यकता गेल्या काही वर्षांपासून गावखेड्यापासून शहरापर्यंत सगळीकडे  शहरीकरण वाढल्याने पक्षांची संख्या कमी झाली आहे. त्यात कावळ्यांचीही संख्या कमी होत चालली आहे. वृक्ष तोडून विकासाच्या नावाखाली बिल्डर सिमेंट काँक्रिट चे जंगल वाढवत इमारती बांधत आहे. त्यामुळे पितृपक्षात कावळ्यासाठी नैवेद्य अर्पण करणे कठीण झाले आहे. त्यामुळे पक्ष्यांचे महत्त्व कळण्यासाठी शहरात जनजागृतीची आवश्यकता आहे. दरवर्षी पितृपक्षात कावळ्याला श्राद्धाचे अन्न भरवण्याची प्रथा आहे. पूर्वजांच्या आत्म्याला शांती मिळावी यासाठी कावळ्याला भोजन दिले जाते. मात्र, अलीकडच्या काही वर्षांत वाढत्या शहरीकरणामुळे झाडे तोडली जात आहेत आणि पक्ष्यांचे अधिवास नष्ट होत चालले आहेत, त्यामुळे कावळ्यांची संख्या लक्षणीयरीत्या कमी झाली आहे.  कावळ्यांची संख्या कमी होणे ही पर्यावरणाबाबतची गंभीर समस्या आहे. यामुळे पक्ष्यांचे महत्त्व आणि पर्यावरणाचे संवर्धन किती महत्त्वाचे आहे, हे पुन्हा एकदा समोर आले आहे. या प्रथेमुळे लोका...

रुग्णालयातील उंदीरमामाने प्रशासनाला लावले कामाला

Image
रुग्णालयातील उंदीरमामाने प्रशासनाला लावले कामाला मुंबई  / रमेश औताडे  मुंबईतील कूपर रुग्णालयातील उंदरांचा वाढता त्रास अद्याप पूर्णपणे थांबलेला नाही. वॉर्डमध्ये, बेडखाली आणि पॅन्ट्री परिसरात उंदरांचे दर्शन होत असल्याने रुग्ण व नातेवाईकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. स्वच्छतेच्या उपाययोजना करूनही परिस्थितीत सुधारणा न झाल्यामुळे आता रुग्ण मित्र संघटनेने प्रशासनाला इशारा दिला आहे की, तातडीने ठोस उपाय न केल्यास आम्ही आक्रमक पवित्र घेऊ. या सर्व पार्श्वभूमीवर रुग्णालयातील उंदरांनी प्रशासनाला लावले कामाला लावले अशी चर्चा सुरू आहे. नातेवाईकांचे म्हणणे आहे की, उपचारासाठी आलेल्या रुग्णांना सुरक्षित वातावरण मिळाले पाहिजे. “दवाखान्यात उपचारापेक्षा उंदरांची भीती जास्त वाटते. दररोज उंदीर पकडले जात आहेत म्हणजे समस्या गंभीर आहेच. जर प्रशासनाने खरेच जबाबदारी घेतली असती, तर एवढा मोठा त्रास निर्माण झाला नसता. जर लगेच बदल झाला नाही, तर आम्हाला रुग्णांच्या हक्कासाठी आम्ही आक्रमक झालो तर ? असे नातेवाईकांनी स्पष्ट केले. रुग्णालय प्रशासनाने स्वच्छतेची उपाययोजना सुरू असल्याचा दावा केला ...

मराठा व ओबीसी समाजातील विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड संताप

Image
मराठा व ओबीसी समाजातील विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड संताप  मुंबई / रमेश औताडे  मराठा आणि ओबीसी समाजातील विद्यार्थ्यांसाठी शिक्षण व कौशल्य विकासाच्या संधी वाढविण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या  योजना संथगतीने सुरू असून सारथी संस्थेची फेलोशिप योजना थांबली आहे. तसेच महाज्योती च्या माध्यमातून मिळणाऱ्या विद्यावेतनाच्या पार्श्वभूमीवर गोंधळ आहे. या सर्व पार्श्वभूमीवर पालक व विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड संताप पसरला आहे. विद्यार्थ्यांनी शिक्षणात प्रगती करावी, त्यांना शैक्षणिक व संशोधन क्षेत्रात संधी मिळावी यासाठी राज्य सरकारतर्फे या योजना राबविण्यात येतात. मात्र, निधीअभावी आणि प्रशासकीय अडथळ्यांमुळे योजनांची अंमलबजावणी थांबली आहे. परिणामी, स्पर्धा परीक्षा, उच्चशिक्षण, संशोधन आदी क्षेत्रात जातीय आरक्षणावर अवलंबून असलेल्या विद्यार्थ्यांपुढे मोठे संकट उभे राहिले आहे. विद्यार्थ्यांना वेळेवर मदत न मिळाल्याने अनेकांचे शिक्षण अधांतरी राहिले आहे. महाज्योतीकडून प्रतिसाद न मिळाल्याने असंख्य विद्यार्थ्यांनी तक्रारी केल्या असून, सरकारकडून स्पष्ट धोरण जाहीर करण्याची मागणी वाढू लागली आहे. नि...

अपात्र लाडक्या बहिणींनी काळजी करू नका !

Image
अपात्र लाडक्या बहिणींनी काळजी करू नका ! लाडक्या तिन्ही भावाकडून अजून अंतिम निर्णय नाही  मुंबई / रमेश औताडे  राज्य सरकारच्या महत्त्वाकांक्षी ‘लाडकी बहीण’ योजनेत तब्बल २६ लाख अपात्र लाभार्थी लाभ घेत असल्याचे प्राथमिक माहिती तपासणीत उघड झाली आहे. माहिती व तंत्रज्ञान विभागाने ही माहिती उपलब्ध करून दिली असून, हे लाभार्थी राज्यातील सर्व जिल्ह्यांतील असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. त्यामुळे आता या अपात्र लाडक्या बहिणी लाडक्या भावावर नाराज होणार यात शंका नाही. मात्र लाडक्या बहिणींनी अजून तरी घाबरण्याचे कारण नाही कारण लाडक्या भावांनी या प्रकरणी अजून अंतिम निर्णय घेतला नाही. अर्जांची छाननी प्रक्रियेत ही बाब समोर आली असून, संबंधित लाभार्थ्यांची कागदपत्रे तपासण्याचे काम सध्या अंतिम टप्प्यात आहे. या पार्श्वभूमीवर अपात्रांना देण्यात आलेला लाभ थांबवून पुढील कार्यवाही केली जाणार आहे. मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या निर्देशानुसारच पुढील निर्णय घेतला जाईल. अशी माहिती समोर आली आहे. ‘लाडकी बहीण’ ही योजना राज्यातील महिलांना थेट आर्थिक मदत मिळावी यासाठी सुरू करण्यात आ...

गणपती बाप्पांना जल्लोषात मुख्यमंत्र्यांचा निरोप

Image
गणपती बाप्पांना जल्लोषात मुख्यमंत्र्यांचा निरोप मुंबई / रमेश औताडे  महाराष्ट्र शासनाने गणेशोत्सवाला राज्य महोत्सवाचा दर्जा दिला आहे, त्या उत्सवाचा जल्लोष आज गिरगाव चौपाटीवर उच्चांक गाठताना दिसला. या सोहळ्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः उपस्थित राहून गणरायाला निरोप दिला. राज्य महोत्सवाच्या या उत्साहात गीरगाव चौपाटीवर विधान परिषद सभापती प्रा.राम शिंदे, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मंत्री मंगलप्रभात लोढा, केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले, राज्यमंत्री योगेश कदम, आमदार अमित साटम, मुंबई महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणी, अतिरिक्त आयुक्त अमितकुमार सैनी तसेच हजारो भाविक यांची उपस्थिती होती. ढोल-ताशांच्या गजरात आणि “गणपती बाप्पा मोरया”च्या गजरात वातावरण भारावून गेले होते. बृहन्मुंबई महानगरपालिकेमार्फत मुंबईतील गिरगाव चौपाटी येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सभापती प्रा.राम शिंदे, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह अनेक मान्यवरांनी गणेश मूर्तींवर पुष्पवृष्टी करून गणरायांना निरोप दिला. राज्यात दहा दिवसांचा गणेशोत्सव उत्साहात आणि शांततेत पार पडल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र ...

महाराष्ट्रातील दिव्यांगांच्या मागण्यांबाबत सरकार सकारात्मक

Image
महाराष्ट्रातील दिव्यांगांच्या मागण्यांबाबत सरकार सकारात्मक मुंबई  / रमेश औताडे  राज्य प्रशासनात कणखर आणि स्पष्टवक्ते अधिकारी म्हणून ओळखले जाणारे आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे यांनी महाराष्ट्रातील दिव्यांगांच्या हक्कांवर सविस्तर संवाद साधला. या चर्चासत्रासाठी महाराष्ट्रातील निवडक पाच दिव्यांग बांधवांना आमंत्रित करण्यात आले होते. त्यामध्ये सांगली जिल्ह्याचे ज्ञानदेव कदम आणि डॉ. सतीश लड्डा यांनी लक्षणीय ठसा उमटवला. दोघांनी मांडलेले प्रेझेंटेशन पाहून मुंढे यांनी आपल्या स्टाफसमोरच कौतुक व्यक्त करत “असं प्रेझेंटेशन माझा स्टाफ सुद्धा करत नाही” अशी प्रतिक्रिया दिली. त्यामुळे उपस्थितांचा आत्मविश्वास अधिक वाढला. बैठकीत दिव्यांगांच्या आरक्षणाचा मुद्दा, शिक्षणातील अडथळे, रोजगाराच्या संधी, आरोग्य सुविधा तसेच शासकीय योजनांची प्रभावी अंमलबजावणी या विषयांवर चर्चा झाली. मुंढे यांनी धोरणात्मक स्तरावर कोणते बदल शक्य आहेत यावरही मार्गदर्शन केले. सांगली जिल्ह्यातील प्रतिनिधींची निवड हा केवळ सन्मान नसून दिव्यांग चळवळीच्या नेतृत्वात जिल्हा आघाडीवर असल्याचे पुन्हा एकदा अधोरेखित झाल्याचे मत ...

आदर्शवत पर्यावरणपूरक गणेश उत्सव

Image
आदर्शवत पर्यावरणपूरक गणेश उत्सव मुंबई / रमेश औताडे  विरकर परिवाराने यंदा शाडूमातीची गणेशमूर्ती बसवून पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा केला. आकांक्षा शंकर विरकर यांच्या संकल्पनेतून विरकर निवासमध्ये विधिवत प्रतिष्ठापना करण्यात आली होती. या उपक्रमाचे अनेक मान्यवरांनी कौतुक केले. सालाबादप्रमाणे पाचव्या दिवशी पारंपरिक पद्धतीने सजवलेल्या विसर्जन कुंडात बाप्पाचे विसर्जन करण्यात आले. वितळून मिळालेली माती बागेतील झाडांसाठी वापरण्यात आली. संतांचा पर्यावरण-जतनाचा संदेश कृतीत उतरवत विरकर परिवाराने समाजापुढे आदर्श ठेवला आहे.