*थॅलेसेमिया मुक्त कार्यशाळेत रुग्ण मित्रांचा सहभाग*
*थॅलेसेमिया मुक्त कार्यशाळेत रुग्ण मित्रांचा सहभाग*
मुंबई / रमेश औताडे
रा.स्व.संघ जनकल्याण समिती, वामनराव ओक रक्त केंद्र, ठाणे आयोजित थलेसेमिया मुक्त महाराष्ट्र प्रकल्प अंतर्गत विभागीय कार्यशाळेचे आयोजन हितवर्धिनी सभा ब्राह्मण सोसायटी नौपाडा ठाणे येथे करण्यात आले होते
कार्यशाळेचे उद्घाटन डॉ.कैलास पवार जिल्हा शल्यचिकित्सक,ठाणे यांच्या हस्ते करण्यात आले.डॉ.अजित मराठे अध्यक्ष राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जनकल्याण समिती महाराष्ट्र थॅलेसमिया रुग्णांसाठी योजनांची माहिती डॉ.महेंद्र केंद्रे पॅथॉलॉजिस्ट बीटीओ सिविल हॉस्पिटल ठाणे, डॉ.आशुतोष काळे यांनी दृकश्राव्यद्वारे माहिती दिली.
थॅलेसेमिया चाचणी यंत्राचे सादरीकरण डॉ. प्रशांत खडके,थॅलेसेमिया काळजी आणि उपचार चर्चासत्रात डॉ.स्मिता महाले से.नि.संचालक आयसीएमआर, डॉ. शैलेश पांडे वरिष्ठ वैद्यकीय अनुवंशशास्त्र व अनुवंशिक सल्लागार आयसीएमआर,डॉ.राजेश पाटील जुपिटर हॉस्पिटल यांचेही मार्गदर्शन लाभले. थॅलेसेमिया रुग्ण पालक व स्वयंसेवी संस्था यांनी अनुभव कथन केले. थॅलेसेमिया नियंत्रण पद्धती,माहिती आणि विश्लेषण Care- काळजी,Cure-बरा,Curb-अंकुश किंवा नियंत्रण डॉ. रत्ना शर्मा कन्सल्टंट पेडियाट्रिक हेमॅटोलॉजिस्ट, अन्कॉलॉजिस्ट ज्युपिटर हॉस्पिटल,विनय शेट्टी संस्थापक लाईव्ह ब्लड कौन्सिल डॉ.अजित गोरक्षकर वरिष्ठ उपसंचालक आयसीएमआर एनआय एच यांनी केले.
इंजि. लक्ष्मीकांत पिंपळगावकर यांनी सत्र समन्वयक म्हणून काम पाहिले. अतुल कर्पे यांनी कार्यशाळा समन्वय म्हणून काम पाहिले. विद्याधर गांगुर्डे प्रकल्प समन्वयक वामनराव रक्त केंद्र होते.किरण वैद्य अध्यक्ष कै.वामनराव ओक रक्त केंद्र, ठाणे यांनी आभार प्रदर्शन केले. आरती नेमाणे (सेवा सहयोग) यांनी आभार प्रदर्शन केले.सिद्धेश इंदोरे जिल्हा समन्वयक थॅलेसेमिया व रक्तकेंद्राच्या कर्मचारी.यांचा उत्तम नियोजनातून स़ंघटन मंत्र व कल्याण मंत्र पठणाने कार्यशाळा यशस्वीपणे संपन्न झाली.
डाॅ.उल्हास वैद्य,डॉ.गौरांगी करमरकर (रोटरी क्लब,ठाणे),डॉ. पूर्वा राणे गजानन नार्वेकर,आयुष गवळे,मनीष पगार,विराज घरत,डॉ.बिना जोशी, सुर्यकांत पारधी,यांचा विशेष सहभाग लाभला रुग्ण मित्रांचे प्रतिनिधी विनोद साडविलकर यांनी रुग्ण मित्राच्या कार्याची माहिती दिली तसेच रुग्णमित्र संस्था बेट चर्चा थेट हे माहिती पुस्तक रक्त केंद्राचे अध्यक्ष किरण वैद्य यांना दिले थॅलेसेमिया मुक्त कार्यशाळा मुंबई आयोजित करण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचे रुग्णमित्रांतर्फे आश्वासित करण्यात आले.
Comments
Post a Comment