वाशीतील फादर अग्नल स्कूल वॅन अपघात – दोन विद्यार्थी गंभीर जखमी :
नवी मुंबई / ॲड मनोज टेकाडे
वाशीतील फादर अग्नल स्कूल वॅन अपघात –
दोन विद्यार्थी गंभीर जखमी :
दोषींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची ॲड मनोज टेकाडे यांची मागणी...
वाशी येथील फादर अग्नल स्कूल वॅन भीषण अपघातात दोन विद्यार्थी गंभीर जखमी झाले ही अत्यंत दुर्दैवी घटना आहे. या अपघाताला थेटपणे शाळा प्रशासन, व्हॅन कंत्राटदार व RTO विभाग जबाबदार आहेत. विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळणाऱ्या या निष्काळजीपणाविरोधात प्रहार विद्यार्थी संघटना तीव्र आवाज उठवत आहे. असे आज प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात प्रहार जनशक्ती पक्ष राज्य प्रवक्ता ॲड मनोज टेकाडे यांनी म्हटले आहे ..
संघटनेच्या ठाम मागण्या पुढीलप्रमाणे आहेत :
स्कूल व्हॅन ड्रायव्हर व कंत्राटदारावर तातडीने सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा.
संबंधित व्हॅन कंत्राट तत्काळ रद्द करावे.
निष्काळजी ड्रायव्हरचे लायसन्स कायमचे रद्द करावे.
RTO विभाग व शाळा प्रशासनावर कडक कारवाई करून जबाबदारी निश्चित करावी.
RTO विभागाने स्कूल वॅन कंत्राटदाराचा परवाना कायमचा रद्द करावा.. त्याच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा.
विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेकडे होणाऱ्या गंभीर दुर्लक्षाविरोधात जर तातडीने कारवाई झाली नाही, तर प्रहार जनशक्ती पक्ष संघटना रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन उभारेल, असा ठाम इशारा संघटनेचे अध्यक्ष ॲड. मनोज टेकाडे यांनी दिला आहे.
*ॲड मनोज टेकाडे
राज्य प्रवक्ता प्रहार जनशक्ती पक्ष*
9224073066
Comments
Post a Comment