धम्मचक्र परिवर्तन दिनी आरक्षण अंमलबजावणी मेळावा
धम्मचक्र परिवर्तन दिनी आरक्षण अंमलबजावणी मेळावा
मुंबई / रमेश औताडे
धम्मचक्र परिवर्तन दिनाच्या पूर्वसंध्येला आंबेडकरी रिपब्लिकन मोर्चा च्या वतीने आरक्षण अंमल मेळाव्याचे आयोजन करण्यात आल्याची माहिती आंबेडकरी रिपब्लिकन मोर्चा चे राष्ट्रीय अध्यक्ष नारायण बागडे दिली.
टिळक पत्रकार भवन धंतोली नागपूर येथील सभागृहात १ ऑक्टोबर रोजी दुपारी २ वाजता मेळाव्याचे आयोजन केले आहे.
मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रीय अध्यक्ष नारायण बागडे, उद्घाटक चंद्रकांत सोनवणे, प्रमुख पाहुणे कृष्णा बेडसे, उद्धव तायडे, दशरथ कांबळे, विकास काटे, प्रा. संध्या रायठक, मंगला बिहारे, डॉ. आशा पारधे, नामदेवराव निकोसे, प्रा. सुधा जनबंधू, राधाबाई पाटील, धर्माजी बागडे, देवेंद्र बागडे हे उपस्थित राहतील.
मेळाव्याचे आयोजक प्रा. रमेश दुपारे सुखदेवराव मेश्राम, राजू पांजरे, प्रकाश कांबळे, जयदेव चिवंडे, बबलू कडवे, शालिक बांगर हे राहणार आहे. मेळाव्यात राज्यातील आंबेडकरी रिपब्लिकन मोर्चाच्या प्रणित महिला मोर्चा, युवा मोर्चा, विद्यार्थी मोर्चा, कामगार मोर्चाचे जिल्हाध्यक्ष पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी राहणार असल्याची माहिती बागडे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
Comments
Post a Comment