महाराष्ट्र राज्यस्तरीय सांस्कृतिक कलावंत मेळावा
महाराष्ट्र राज्यस्तरीय सांस्कृतिक कलावंत मेळावा
मुंबई / रमेश औताडे
महाराष्ट्राची परंपरा आणि लोककला जपणे, कलावंतांना व्यासपीठ उपलब्ध करून देणे आणि नव्या पिढीला सांस्कृतिक वारसा समजावून सांगण्यासाठी मुंबईत राज्यस्तरीय सांस्कृतिक कलावंत मेळावा होत असल्याची माहिती शरदचंद्र प्रतिभाशाली सांस्कृतिक प्रतिष्ठान चे अध्यक्ष राजाराम बुवा शेलार यांनी दिली.
मुंबईत रविवार २१ सप्टेंबर रोजी रविंद्र नाट्य मंदिर, प्रभादेवी येथे हा मेळावा आयोजित करण्यात आला आहे. महाराष्ट्रातून विविध कलाक्षेत्रातील नामवंत व नवोदित कलावंत, संगीतज्ञ, नर्तक, कलाकार, शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रातील मान्यवर एकत्र येणार आहेत.
कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून माननीय शरद पवार त्यांच्या पत्नी प्रतिभा पवार, सुप्रिया सुळे , आदित्य ठाकरे, डॉ अमोल कोल्हे, सुषमा अंधारे, अभिनेते किरण माने व सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत. नामवंत कलावंतांचे सादरीकरण, भजन, गोंधळ, दशावतार, पोवाडे, लावणी, वाघ्या मुरळी, आदिवासी नृत्य, कोळीनृत्य यांसारखे रंगतदार कार्यक्रम सकाळी ९ ते रात्री ९ पर्यंत होणार आहेत.
Comments
Post a Comment