चंदनाच्या खोडापासून साकारलेली अद्वितीय मूर्ती
चंदनाच्या खोडापासून साकारलेली अद्वितीय मूर्ती
मुंबई / रमेश औताडे
उमरखाडीच्या नवरात्र उत्सवातील आकर्षण ठरणारी आईची मूर्ती ही तिच्या वैशिष्ट्यपूर्ण घडणीमुळे भक्तांना मंत्रमुग्ध करते. ह्या देवीचा चेहरा संपूर्णपणे चंदनाच्या खोडापासून साकारलेला असून चेहऱ्यावर उमटलेले सात्विक भाव भक्तांच्या मनाला भुरळ घालतात.
या मूर्तीचे वैशिष्ट्य म्हणजे संपूर्ण मूर्ती – सिंहासह – चंदनाच्या लाकडातून तयार करण्यात आलेली आहे. वसई येथील ख्रिश्चन समाजातील सिक्वेरा बंधूंनी सन १९७० मध्ये ही अप्रतिम मूर्ती साकारली. विशेष म्हणजे देवीचे व सिंहाचे डोळे हे परदेशातून (ऑस्ट्रेलियामधून) आयात केलेल्या लेन्सचे असून मूर्तीला वेगळेच आकर्षण प्राप्त झाले आहे.
ही मूर्ती फोल्डिंग स्वरूपाची असून तिची घडण दोन पद्धतींनी करण्यात आली आहे. त्यामुळे एक वर्ष देवी उभी दिसते तर दुसऱ्या वर्षी बसलेल्या अवस्थेत दर्शन देते. या अनोख्या परंपरेमुळे उमरखाडीच्या नवरात्रोत्सवाला विशेष महत्त्व लाभले आहे.
आजतागायत अवघ्या मुंबापुरीतूनच नव्हे तर दूरदूरहून भक्तगण नवरात्रात देवीचे दर्शन घेण्यासाठी उमरखाडीत दाखल होत असतात.
Comments
Post a Comment