आदर्शवत पर्यावरणपूरक गणेश उत्सव
आदर्शवत पर्यावरणपूरक गणेश उत्सव
मुंबई / रमेश औताडे
विरकर परिवाराने यंदा शाडूमातीची गणेशमूर्ती बसवून पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा केला. आकांक्षा शंकर विरकर यांच्या संकल्पनेतून विरकर निवासमध्ये विधिवत प्रतिष्ठापना करण्यात आली होती. या उपक्रमाचे अनेक मान्यवरांनी कौतुक केले.
सालाबादप्रमाणे पाचव्या दिवशी पारंपरिक पद्धतीने सजवलेल्या विसर्जन कुंडात बाप्पाचे विसर्जन करण्यात आले. वितळून मिळालेली माती बागेतील झाडांसाठी वापरण्यात आली. संतांचा पर्यावरण-जतनाचा संदेश कृतीत उतरवत विरकर परिवाराने समाजापुढे आदर्श ठेवला आहे.
Comments
Post a Comment