साहित्य संमेलनात सुनिता तुपसौंदर्य यांचा सन्मान
साहित्य संमेलनात सुनिता तुपसौंदर्य यांचा सन्मान
मुंबई / रमेश औताडे
महाराष्ट्र शासनाच्या बार्टी (बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था) आयोजित लोकशाहीर आण्णाभाऊ साठे साहित्य संमेलन २०२५ मध्ये मुंबईतर्फ समाजसेविका सुनिता तुपसौंदर्य यांना जनजागृती आणि विविध सामाजिक उपक्रम प्रभावीपणे राबवल्याबद्दल सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.
सुनिता तुपसौंदर्य या गेल्या अनेक वर्षांपासून वंचित आणि दुर्बल घटकांसाठी आरोग्य शिबिरे, महिलांसाठी स्वावलंबन उपक्रम, तसेच विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन वर्गांच्या माध्यमातून सतत कार्यरत आहेत. त्यांच्या पुढाकारातून अनेक गरजू कुटुंबांना जीवनावश्यक मदत मिळाली असून परिसरात सामाजिक एकजूट निर्माण करण्यासाठी त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे.
या प्रसंगी उपस्थित असलेल्या सुप्रसिद्ध लोकशाहीर सुनील साठे यांनी सुनीता तुपसौंदर्य यांच्या कामाचा गौरव करताना म्हटले की, “समाजकार्यात सातत्य आणि प्रामाणिकता ठेवणारी व्यक्ती म्हणजेच खरी जनसेवक. सुनिता तुपसौंदर्य यांनी आपल्या कार्यातून समाजासमोर प्रेरणादायी उदाहरण ठेवले आहे.”
साहित्य संमेलनात विविध जिल्ह्यांतून आलेल्या साहित्यिक, कलाकार आणि समाजप्रबोधनाकरांनी या सन्मानाचे स्वागत करत त्यांच्या कार्याला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
Comments
Post a Comment