‘ गाव तिथे कार्यकर्ता ’ अभियानाचा पहिला टप्पा पूर्ण
‘ गाव तिथे कार्यकर्ता ’ अभियानाचा पहिला टप्पा पूर्ण
मुंबई / रमेश औताडे
गाव तिथे कार्यकर्ता हे नागपूरातून सुरू झालेले प्रतीकात्मक अभियान आज महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचले असून, या उपक्रमाचा पहिला टप्पा यशस्वीरीत्या पूर्ण झाल्याची माहिती आंबेडकरी रिपब्लिकन मोर्चा, नागपूर शहराचे अध्यक्ष प्रा. रमेश दुपारे यांनी दिली.
“हा चमत्कार फक्त कार्यकर्त्यांच्या कष्ट आणि निष्ठेमुळे शक्य झाला. एक सामान्य कार्यकर्ताही चळवळ पुढे नेऊ शकतो, हे या अभियानातून स्पष्ट झाले आहे. फक्त जिद्द आणि जिगर यांच्यावर विश्वास ठेवून गावोगाव कार्यकर्ते उभे राहिले, आणि त्यामुळे अभियानाला व्यापक प्रतिसाद मिळाला,” असे दुपारे यांनी सांगितले.
‘गाव तिथे कार्यकर्ता’ या अभियानाचा पहिला टप्पा संपन्न झाला असून, लवकरच दुसऱ्या टप्प्याचे नियोजन जाहीर करण्यात येणार आहे. यासाठी आंबेडकरी रिपब्लिकन मोर्चा चे राष्ट्रीय अध्यक्ष नारायण बागडे यांचे राज्यव्यापी मार्गदर्शन अभियान सुरू होणार आहे.
Comments
Post a Comment