जुलमी थकीत बिल म्हाडाकडून अखेर मागे


जुलमी थकीत बिल म्हाडाकडून अखेर मागे
मुंबई / रमेश औताडे 

गोरेगावच्या मोतीलाल नगरवासियांना म्हाडाचे थकीत बिलाच्या नावाखाली ३५ हजार रूपयांचं बिल पाठवलं होतं. हा निर्णय म्हाडाने आता रद्द केला आहे. या जुलमी निर्णयाविरूद्ध मोतीलाल नगर विकास समितीचे अध्यक्ष युवराज मोहिते यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने म्हाडा उपाध्यक्षांना निवेदन देवून इशारा देण्यात आला होता. 

मोतीलाल नगरच्या पुनर्वसनाच्या मुद्द्यावर रहिवाशांचा संघर्ष राज्य सरकार सोबत सुरू आहे. हे सुरू असताना जुलै महिन्यापासून ३५ हजारांपासून रूपयांपासून ४५ हजारांपर्यंत रुपयांचं अनाकलनीय बिल प्रत्येक रहिवाशांना पाठवून त्रासात भर टाकली. 

रहिवाशांच्या या पिळवणुकी विरुद्ध युवराज मोहिते यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने म्हाडा उपाध्यक्षांना निवेदन देऊन ही बिललाढ त्वरित रद्द करावी, अन्यथा उग्र आंदोलन करण्याचा इशारा दिला. म्हाडा उपाध्यक्ष संजीव जैस्वाल यांनी याबाबत निर्णय घेण्याच्या सूचना मुंबई सीईओ यांना दिली. यानंतर ३५ हजारांचं हे बिल रद्द करून केवळ ९ हजार रूपये आकारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. रहिवाशांच्या एकजुटीने हे शक्य झालं आहे. असे तरसेम सिंग सोहल, गौतम कांबळे , अलीमभाई खान यांनी सांगितले.

Comments

Popular posts from this blog

स्वराज पक्षाच्या रडारवर आता शिधावाटप दुकाने

विधेयक मागे न घेतल्यास देशव्यापी संपाचा इशारा!

शिक्षणमंत्रांच्या खोट्या आश्वासना विरोधात शिक्षकांचे आझाद मैदानात आंदोलन