सुसंवाद जनतेच्या मनात......
सुसंवाद उपक्रमाअंतर्गत संदीप नाईक जनसेवेत
नवी मुंबई / रमेश औताडे
"सुसंवाद" उपक्रमाअंतर्गत बेलापूर येथील जनसंपर्क कार्यालयात नागरिकांसमवेत प्रथम आमदार संदीप नाईक यांनी थेट संवाद साधला. नागरिकांनी आपल्या परिसरातील समस्यांबाबत माहिती दिली, यावेळी त्यांच्या प्रत्येक समस्यांचा गांभीर्याने आढावा घेण्यात आला.
काही समस्यांवर तातडीने कार्यवाही करण्यात आली. तर काही समस्यांसंदर्भात संबंधित यंत्रणेशी समन्वय साधण्याचे आश्वासन नागरिकांना देण्यात आले.
"सुसंवाद" हा नागरिकांच्या विश्वासाचा सेतू आहे. जनतेच्या प्रश्नांना उत्तरे देणे, त्यांना आधार देणे आणि त्यांच्या अडचणी सोडविण्याचा खरा उद्देश्य या संवादातून पूर्णत्वाला जात आहे, अशी खात्री असल्याचे नाईक यांनी सांगितले.
Comments
Post a Comment