माफी मागत नाही तोपर्यंत आंदोलन
माफी मागत नाही तोपर्यंत आंदोलन
मुंबई / रमेश औताडे
राष्ट्रवादीचे आमदार जयंत पाटील यांच्या बाबत अपशब्द वापरणारे भाजपाचे आमदार गोपीचंद पडळकर जोपर्यंत माफी मागत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच राहणार असा इशारा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष सचिनभाऊ लोंढे यांनी दिला आहे.
मुंबई विभागीय राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने उत्तर पश्चिम जिल्हा जोगेश्वरी तालुका वार्ड क्रमांक ७९ या ठिकाणी पडळकर यांचा पुतळा जाळण्याचा प्रयत्न केला व त्याच्या प्रतिमेस जोडे मारो आंदोलन केले.
यावेळी मुंबई अध्यक्ष युवक अमोल मातले, मुंबई प्रतिनिधी प्लेस डिसोजा, इमरान तडवी, शंकर राक्षे, गोसुदीन शेख, स्वप्नील पाटील, कमलेश दांडगे, शैलेश वाघेला, फिरोज शेख, नितीन लोंढे, हर्षद लोंढे, तांबे ताई व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Comments
Post a Comment