कुटुंब धर्म समानता दुसरे अधिवेशन संपन्न
कुटुंब धर्म समानता दुसरे अधिवेशन संपन्न
मुंबई / रमेश औताडे
सर्व धर्मांतील लिंग समानता, जातभेद, पर्यावरणीय संकट, स्त्री प्रश्न, सांप्रदायिक हिंसा आणि कुटुंबव्यवस्थेवरील धर्माच्या भूमिकेवर आधारित संसद ऑफ रिलिजन्सचे दुसरे अधिवेशन २७ सप्टेंबर रोजी मरीन लाईन्स येथील बहाई सेंटरमध्ये पार पडले.
इंटर-रिलीजीअस सॉलिडॅरिटी कौन्सिल, सेंटर फॉर द स्टडी ऑफ सोसायटी अँड सेक्युलरिझम आणि बहाई सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने हे अधिवेशन होते. प्रभू केशव चंद्र दास यांनी धर्म हा संघर्ष नव्हे तर शांतता आणि करुणेचा मार्ग असल्याचे सांगितले. रजनी बक्षी यांनी कृतीविना भावना व्यर्थ असल्याचे अधोरेखित केले, तर डॉ. सुरिंदर कौर यांनी मणिपूरमधील महिलांच्या संघर्षाचा उल्लेख केला. प्रभू गोविंद दास यांनी पर्यावरण आणि दानधर्म यातील संबंध मांडले, तर ताहिरीह महिजा यांनी आध्यात्मिक नूतनीकरणातून एकतेचा संदेश दिला.झिया इशराघि, जया पुत्रन, रणजीत सिंह आणि बहाई सोसायटीच्या सेक्रेटरी नर्गिस गौर उपस्थित होते.
राधिका सूद नायक यांच्या गीतांनी वातावरण भारावून गेले. रोशनी शेनाझ यांनी चांगले विचार, शब्द आणि कृतींचे महत्त्व सांगितले. फादर गिल्बर्ट डी’लिमा यांनी धर्म हे एकतेचे साधन ठरावे असे मत व्यक्त केले, तर मुफ्ती यह्या आणि स्वामी दयादीपनंद यांनी कुटुंब, नातेसंबंध आणि दैवी शक्तीची जाणीव यावर भाष्य केले.
Comments
Post a Comment