साहित्य संमेलनात ‘स्वच्छता दूत फाऊंडेशन’ चा सन्मान

साहित्य संमेलनात ‘स्वच्छता दूत फाऊंडेशन’ चा सन्मान
मुंबई / रमेश औताडे 

महाराष्ट्र शासन बार्टी आयोजित लोकशाहीर आण्णाभाऊ साठे साहित्य संमेलन २०२५ मध्ये मुंबईतर्फे कार्यरत असलेल्या स्वच्छता दूत फाऊंडेशनला महाराष्ट्रभर स्वच्छतेचे काम, जनजागृती आणि सामाजिक उपक्रम राबवल्याबद्दल सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. फाऊंडेशनचे प्रमुख मुकेश पाखरे यांचा गौरव करण्यात आला.

या प्रसंगी सुप्रसिद्ध लोकशाहीर सुनील साठे यांनी स्वच्छता दूत फाऊंडेशनच्या कार्याचे कौतुक करत समाजापुढे प्रेरणादायी उदाहरण ठेवल्याचे सांगितले. तसेच मातंग समाजाचे युवा नेते सुरेश साळवे यांनीही फाऊंडेशनद्वारे चालविण्यात येणाऱ्या स्वच्छता कामगार प्रशिक्षण केंद्राविषयी माहिती देत सांगितले की, या केंद्रांतून मिळणाऱ्या प्रशिक्षणामुळे अनेक मुलांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. 

Comments

Popular posts from this blog

विधेयक मागे न घेतल्यास देशव्यापी संपाचा इशारा!

राज्यातील आरोग्य विभागातील चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांबाबत सरकारने गंभीर व्हावे -- आमदार सचिन अहिर

मेघमल्हार संकुल अन् पुढील दिशा