Posts

आयुक्तांच्या आश्वासनानंतर आंदोलन स्थगित

Image
बहुजन मुक्ती पार्टी यांच्या मार्गदर्शनाखाली दि ३० जानेवारी रोजी आझाद मैदान मुंबई येथे आंदोलन नियोजिले होते, तसेच राष्ट्रीय मूलनिवासी बहुजन कर्मचारी संघ यांच्या अथक परिश्रमाने मा श्री वामन मेश्राम राष्ट्रीय अध्यक्ष यांच्या आधिपत्याखाली हे आंदोलन यशस्वी रित्या पार पडले.  प्रशासनाचे वरिष्ठ अधिकारी वर्गाने आंदोलनाचे गांभीर्य न घेता शुल्लक कारणे देत जनिपूर्वक अन्याय करण्याचा कट रचला होता असे दिसून आले. परंतु आयुक्त वैद्यकीय शिक्षण व संशोधन मुंबई यांनी सादर आंदोलनाची दखल घेत संघटनेला वेळ दिला व आंदोलन दरम्यान संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी समयसूचकतेने आयुक्त यांच्याकडे धाव घेतली व चर्चे माध्यमातून सदर मागन्यांचा मुद्दा निकाली काढला व तत्काळ नमूद मागण्या बाबत प्रशासकीय अधिकारी यांना प्रस्ताव पाठऊन मान्यता घेउन अशे आश्वासन आयुक्तांनी दिले. DMER सरळसेवा भरती २०२३ अंतर्गत पद वाढ व कमी करण्याचा अधिकार शासनाने राखून ठेवला आहे ज्यामुळे आम्ही ९०० परीसेविका यांची पदोन्नतीमुळे रिक्त झालेल्या या जागांचा प्रस्ताव शासनास तत्काळ पाठून मान्यता घेऊ. -आयुक्त (वैद्यकीय शिक्षण व संशोधन मुम्बई) सदर झ...

पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या अध्यक्षपदी केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांची अधिकृत निवड

Image
31 /01 /2025 भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केलेल्या पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या अध्यक्षपदी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांची अधिकृत निवड झाली आहे. धर्मादाय आयुक्त कार्यालयाने आणि राज्य शासनाने त्यांना अधिकृत मान्यता दिली आहे. अशी माहिती संस्थेचे राष्ट्रीय सचिव ऍड बी के बर्वे यांनी रिपाई(आठवले) पक्ष कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत दिली. या पत्रकार परिषदेला संस्थेचे सचिव डॉ. वामन आचार्य,सहसचिव डॉ.यु एम. मस्के,कार्यकारी समिती सदस्य चंद्रशेखर कांबळे,विश्वस्त अरविंद, मुंबई युवक अध्यक्ष सचिन मोहिते, सोनटक्के, विशाल गायकवाड उपस्थित होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी ८ जुलै १९४५ रोजी दलित, शोषित, पीडित विद्यार्थ्यांसाठी पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली होती. या संस्थेअंतर्गत मुंबई, नवी मुंबई, पुणे, कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगर, नांदेड, बैंगलोर, बिहार येथील ४३ शाळा, महाविद्यालये आणि वसतीगृहे कार्यरत आहेत. पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या अध्यक्षपदावरून निर्माण झालेल्या वादाला पूर्णविराम मिळाला असून, मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार आनंदराज आ...

आश्वासनानंतर उपोषण स्थगित केले

Image
महानगरपालिका प्रशासनचे माननीय उपायुक्त श्री कैलास गावडे साहेब यांच्या हस्ते आंदोलन करते श्री राजेश कोंडीराम साळुंके यांना नारळ देऊन त्यांचं उपोषण सोडवण्यात आले. आम्हाला अपंग स्टाँल धारकांचे परवाना देण्याचे आश्वासन आणि आमच्या स्टॉलवर कोणत्याही प्रकारची कारवाई होणार नाही असे लेखी स्वरूपात पत्र देऊन आज आम्ही उपोषण मोडीत काढले आहे सर्व पक्षाचे गट नेत्यांचे संघटने ने आम्हाला पाठिंबा देण्यात आलेल्यांचे सर्व सहकारी मित्र परिवारांचे मी श्री गजेंद्र के आहिरे रुद्र अपंग सामाजिक सेवा संस्था चे संस्थापक अध्यक्ष च्या वतीने सर्वांचे  आभार व्यक्त करण्यात आले. पी आर न्यूज नेटवर्क  रमेश औताडे 

पगार नसल्याने गिरणी कामगारांची निदर्शने

Image
मुंबईतील एनटीसीच्या चार बंद‌ गिरण्यातील कामगा रांच्या थकीत पगारावर राष्ट्रीय मिल मजदूर संघांच्या वतीने बेलार्ड पिअर येथील प्रधान कार्यालयावर संतप्त कामगारांनी‌ निदर्शने केली. संघटनेचे‌ अध्यक्ष आमदार सचिनभाऊ अहिर आणि सरचिटणीस गोविंदराव मोहिते यांच्या आदेशानुसार  हे निदर्शनाचे पाऊल उचलण्यात आले. गेल्याच महिन्यात २४ डिसेंबर रोजी गिरणी कामगा रांनी तीन‌ महिन्या पेक्षा अधिक काळाच्या थकीत पगारासाठी एनटीसी व्यवस्थापनाला घेराव घालून,आपला संतप्त राग व्यक्त केला होता.त्यावेळी एनटिसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी चांकुमगुणा यांनी दिल्ली होर्डींग्ज कंपनीशी बोलणी करुन हा प्रश्न मार्गी लावण्याचे कामगारांना आश्वासन दिले होते. पण या प्रश्नावर संघटनेने‌ सातत्याने पाठपुरावा करूनही व्यवस्थापनाने अकारण कालापव्यय लावला.त्यामुळे राष्ट्रीय मिल मजदूर संघाच्या वतीने उपासमारीने त्रस्त कामगारांच्या प्रश्नावर हे निदर्शनाचे पाऊल उचलले. खजिनदार‌ निवृत्ती देसाई,उपाध्यक्ष रघुनाथ आण्णा शिर्सेकर,बजरंग चव्हाण, सुनिल बोरकर सेक्रेटरी शिवाजी काळे यांच्या नेतृत्वाखाली कामगारांनी एनटीसीच्या बेलार्ड पियर येथील प्रध...

महाराष्ट्र राज्य लॉटरी मधुन महाराष्ट्र सरकारला ७०० कोटी पेक्षा जास्त महसुल व मोठ्या प्रमाणात रोजगार मिळू शकतो -

Image
महाराष्ट्र राज्य लॉटरी मधुन २०२३-२४ मध्ये २ कोटी नफा आणि १८ कोटी जी.एस.टी. हा फक्त ४ ड्रॉ मध्ये मिळालेला आहे. उरलेले २० ड्रॉ ऑनलाईन आणि पेपर लॉटरी माध्यमातुन वर्षाला ७०० कोटीपेक्षा जास्त सरकारला महसूल भेटू शकतो. त्या उत्पन्नातून  सरकार अनेक लोककल्याण कार्य करु शकते. तसेच मोठ्या प्रमाणात रोजगाराची संधी मिळणार आहे.अशी माहिती  लॉटरी ट्रेड एजंट असोसिएशन  या व्यापारी ट्रेड युनियन चे अध्यक्ष व  श्री इंटरप्राईजेस दादर चे मालक वितरक तसेच " लॉटरी रोजगार निर्माण महाकृती समिती " चे वरिष्ठ पदाधिकारी स्नेहल कुमार शहा यांनी दिली आहे वेस्ट बंगाल सरकारला ४००० ते ५००० कोटी आणि केरळ सरकारला ३००० ते ३५०० कोटी लॉटरी उद्योगातून भेटत आहे. अरुणाचल, मिलोरम, नागालँड, मणिपूर, सिक्कीम, गोवा, या सारख्या राज्यामध्ये त्यांचे जे वार्षिक उत्पन्न आहे. त्यात लॉटरीचे खुप मोठे योगदान आहे. महराष्ट्र लोकसंख्येच्या बाबतीत या सर्वाच्या पुढे आहे तर आपण पहील्या वर्षी ७०० कोटी आणी पुढे या पेक्षा जास्ती महसुल व रोजगार देऊ शकतो असे स्नेहल कुमार शहा म्हणाले. या बाबतीत चर्चा करण्यासाठी सरकारने आम्...

संपत्ती व वारसा कर लागू करा

Image
                         गेल्या काही वर्षांत देशातील मुठभर उद्योगपतींच्या संपत्तीत प्रचंड वाढ झाली असून देशातील अब्जाधीशांची संख्याही १८७ च्या पुढे गेली आहे. या पार्श्वभूमीवर शिक्षण, आरोग्य आदी क्षेत्रावरील खर्च वाढविण्याबरोबरच संपत्तीचे केंद्रीकरण रोखण्यासाठी देशातील श्रीमंतांवर संपत्ती कर व वारसा कर पुन्हा लागू करण्यात यावा, अशी मागणी जनता दल (से) महाराष्ट्र पक्ष व कोकण जनविकास समिती यांच्यावतीने केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्याकडे करण्यात आली आहे.        गेल्या काही वर्षांत देशात मोठ्या प्रमाणावर संपत्तीचे केन्द्रीकरण झाले आहे. २०२३मध्ये देशातील सर्वाधिक श्रीमंत असलेल्या २१ जणांकडे तळाच्या ७० कोटी लोकांपेक्षा अधिक संपत्ती केंद्रित झालेली होती. किंबहुना दहा टक्के श्रीमंतांच्या हातात देशातील तब्बल ७७ टक्के संपत्ती केंद्रीत झाली आहे. दुसरीकडे निधी नसल्याच्या कारणाखाली शिक्षण, आरोग्य अशा सामाजिक क्षेत्रावरील सरकारी खर्चात मोठ्या प्रमाणावर कपात करण्यात येत आहे. 2018 पासून आरोग्यावर...

नाही तर आरोग्य यंत्रणा आजारी पडेल

Image
राज्यातील सरकारी आरोग्य विभागात महत्वाची भूमिका बजावणारी स्टाफ नर्स व स्टाफ ब्रदर आझाद मैदानात आंदोलन करत आहेत. सरकारने जर आमच्या मागण्यांचा विचार गांभीर्याने केला नाही तर आरोग्य यंत्रणा आजारी पडेल असा इशारा यावेळी देण्यात आला. आरोग्य विभागात ९०० जागा रिक्त असताना जर आम्हाला आंदोलन करत नोकरी मागावी लागत असेल तर यासारखे दुर्दैव नसावे. असे यावेळी राष्ट्रीय मूलनिवासी बहुजन कर्मचारी संघाचे अध्यक्ष प्रेमराज बोबडे यांनी सांगितले. यावेळी बोलताना अभिलाष टेकाडे यांनी सांगितले की, वयोमर्यादा संपून गेल्यावर जर आम्हाला नोकरी मिळत असेल किंव्हा मयत झाल्यावर नोकरी मिळणार असेल तर त्या नोकरीचा काय फायदा. सरकारने जर आता आमच्या मागण्याचा गांभीर्याने विचार करणार नसेल तर राज्याची आरोग्य यंत्रणा बंद पडू शकते असा इशारा यावेळी या आंदोलनकर्त्या उमेदवारांनी दिला आहे.