Posts

Showing posts from July, 2025

शेतकऱ्यांच्या जीवनात आर्थिक भरभराट आणावी - मुख्यमंत्री

Image
शेतकऱ्यांच्या जीवनात आर्थिक भरभराट आणावी - मुख्यमंत्री  मुंबई / रमेश औताडे  शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी शासन विविध योजना आणि उपक्रमांची अंमलबजावणी करीत आहे. शेतीला सिंचनासाठी पाणी उपलब्ध करून देण्यासाठी सिंचन प्रकल्पांची कामे सुरू आहेत. जलसंपदा विभागाने रखडलेले प्रकल्प पूर्ण करीत शेतीला कायमस्वरूपी सिंचन उपलब्ध करून देत शेतकऱ्यांच्या जीवनात आर्थिक भरभराट आणावी, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.  राज्यातील जलसंपदा विभागांतर्गत सुरू प्रकल्पांच्या भूसंपादनाचा आढावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सह्याद्री अतिथिगृह येथे आयोजित बैठकीत घेतला. या बैठकीस जलसंपदा (गोदावरी व कृष्णा खोरे विकास महामंडळ) मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, जलसंपदा ( विदर्भ, कोकण व  तापी खोरे विकास महामंडळ ) मंत्री गिरिश महाजन, मुख्य सचिव राजेश कुमार उपस्थित होते.  मुख्यमंत्री म्हणाले, ठाणे जिल्ह्यातील काळू नदी प्रकल्प हा महानगरांच्या पाणीपुरवठा योजनांसाठी महत्त्वाचा आहे. या प्रकल्पाचे काम गतीने पूर्ण करावे. भूसंपादन सुरू असलेल्या जिल्ह्यांमध्ये जिल्हाधिकाऱ्यां...

सस्नेह भेट.....

Image
जीवनविद्या मिशनचे आजीव विश्वस्त श्री प्रल्हाददादा पै यांच्या अमृतमहोत्सवी वाढदिवसानिमित्त बोरीवली येथील कलामहर्षी ॲड आर्ट्सचे श्री. उदय पै यांच्या संकल्पनेतून साकारलेली तसबीर जीवनविद्या मिशन च्या कार्यालयात श्री. प्रल्हाददादा पै यांना  सस्नेह भेट देऊन अभीष्टचिंतन करुन आशीर्वाद घेतांना ज्येष्ठ पत्रकार श्री योगेश वसंत त्रिवेदी आणि सौ. माया योगेश त्रिवेदी.

संध्या शिंदे यांना बेस्ट ब्युटीशियन अवॉर्ड 2025 सन्मान

Image
संध्या शिंदे यांना बेस्ट ब्युटीशियन अवॉर्ड 2025 सन्मान मुंबई | प्रतिनिधी P R न्यूज  ‘DSR’ कंपनीतर्फे दिला जाणारा ‘बेस्ट ब्युटीशियन अवॉर्ड 2025’ यंदा संध्या शिंदे यांना प्रदान केला जाणार आहे. हा भव्य पुरस्कार सोहळा 30 जुलै 2025 रोजी ताज महाल पॅलेस, कोलाबा, मुंबई येथे पार पडणार असून, कार्यक्रमाचा कालावधी सकाळी 9 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत असेल. संध्या शिंदे या DSR ब्रँडच्या अ‍ॅम्बेसेडर म्हणून कार्यरत आहेत. सौंदर्य सेवांच्या क्षेत्रात त्यांचे योगदान उल्लेखनीय असून, अनेक महिलांसाठी त्या प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व ठरल्या आहेत. या कार्यक्रमासाठी नामवंत पाहुण्यांची उपस्थिती अपेक्षित असून, सौंदर्य व्यवसायातील व्यावसायिकांसाठी ही एक मोठी व्यासपीठ ठरणार आहे. 

मुंबईतील ग्राहकांना एक विश्वासार्ह आणि दर्जेदार पर्याय

Image
मुंबईतील ग्राहकांना एक विश्वासार्ह आणि दर्जेदार पर्याय मुंबई / रमेश औताडे  भारतातील आघाडीची दागिन्यांची कंपनी कल्याण ज्वेलर्सने मुंबईतील फिनिक्स मार्केटसिटी येथे आपल्या नवीन शोरूमचे उद्घाटन बॉलिवूड अभिनेत्री तब्बू यांच्या हस्ते केले. या नव्या शोरूममुळे मुंबईतील ग्राहकांना एक विश्वासार्ह आणि दर्जेदार पर्याय उपलब्ध झाला आहे. उद्घाटनप्रसंगी तब्बू म्हणाल्या, “कल्याण ज्वेलर्सच्या ब्रँडमधील पारदर्शकता, विश्वास आणि ग्राहकाभिमुख सेवा ही नेहमीच प्रशंसनीय आहे. अशा प्रतिष्ठित ब्रँडसोबत जोडले जाणे याचा मला आनंद आहे.” शोरूमचे प्रमुख  रमेश कल्याणरमण यांनी सांगितले की, “मुंबईत ग्राहकांच्या वाढत्या गरजांनुसार आम्ही आमच्या सेवा आणखी विस्तारित करत आहोत. दर्जा, पारदर्शकता आणि ग्राहकांचा विश्वास ही आमची ओळख आहे.” ऑफर अंतर्गत, ग्राहकांना २५ टक्के पर्यंत सूट तसेच दोन लाख रुपयांपर्यंतच्या खरेदीवर आकर्षक भेटवस्तू दिल्या जाणार आहेत. याशिवाय सर्व दागिन्यांसोबत ‘केडब्ल्यू अश्युअर सर्टिफिकेट’ देण्यात येणार असून, पारदर्शकतेची हमी दिली जाते.

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडून कवी लेखक अशोकराव टाव्हरे यांना विशेष मान्यता

Image
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडून कवी लेखक अशोकराव टाव्हरे यांना विशेष मान्यता मुंबई / रमेश औताडे सामान्य घरात जन्म घेऊनही मोठं स्वप्न पाहणं आणि ते प्रत्यक्षात उतरवणं ही कला ज्यांच्याकडे आहे, असे व्यक्तिमत्त्व म्हणजे कवी, लेखक व समाजसेवक अशोकराव टाव्हरे. लहानपणापासून समाजसेवेची ओढ मनात बाळगणारे टाव्हरे आज दिल्लीसारख्या राष्ट्रीय पातळीवर आपल्या कर्तृत्वाची ठसठशीत छाप सोडत आहेत. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना नुकताच ‘लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार’ जाहीर झाला. त्याबद्दल त्यांचे दिल्लीला भेट घेऊन अशोकराव टाव्हरे यांनी स्वतः अभिनंदन केले. त्यांनी त्यांना मानपत्र व पुष्पगुच्छ देऊन सन्मानित केले. ही भेट केवळ औपचारिक नव्हती, तर समाजातील सकारात्मक उर्जेचा एक सुंदर संगम होती. अशोकराव टाव्हरे हे गेल्या काही वर्षांत गुन्हेगारी, भ्रष्टाचार, प्रशासनातील मनमानी यांविरोधात आपल्या लेखणीच्या माध्यमातून सातत्याने आवाज उठवत आहेत. त्यांनी स्थानिक ते केंद्रस्तरापर्यंत अनेक संवेदनशील विषय समाजापुढे आणले आहेत. या पारदर्शक आणि निस्वार्थ कार्याची दखल केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी वैय...

प्रायोगिक रंगभूमीसाठी मुंबई मराठी पत्रकार संघाचे काम कौतुकास्पद - जेष्ठ अभिनेते अरुण नलावडे

Image
प्रायोगिक रंगभूमीसाठी मुंबई मराठी पत्रकार संघाचे काम कौतुकास्पद - जेष्ठ अभिनेते अरुण नलावडे मुंबई / रमेश औताडे  मुंबई मराठी पत्रकार संघाच्या या ऐतिहासिक वास्तूत नाट्य शुक्रवार च्या निमित्ताने नाटकाची तिसरी घंटा वाजत आहे. प्रायोगिक रंगभूमीसाठी जे काम नाट्य संघटनांनी, नाट्य कलाकारांनी करायला हवे, ते काम मुंबई मराठी पत्रकार संघ करीत आहे. ही घटनाच अविश्वसनीय आहे. असे कौतुकाचे उद्गार ज्येष्ठ अभिनेते अरुण नलावडे यांनी काढले. यावेळी पत्रकार संघाचे अध्यक्ष संदीप चव्हाण, दिग्दर्शक-लेखक मिलिंद पेडणेकर, इंडियन ऑईलचे कॉर्पोरेट कम्युनिकेशनचे महाव्यवस्थापक डॉ. अभिषेक कुमार, विश्वस्त वैजयंती आपटे, राही भिडे, उपाध्यक्ष स्वाती घोसाळकर आणि नाट्य शुक्रवार समिती सदस्य रवींद्र देवधर व नयना रहाळकर उपस्थित होते. दर महिन्याच्या चौथ्या शुक्रवारी प्रायोगिक रंगभूमीवरील दर्जेदार नाट्यप्रयोगांचे मोफत सादरीकरण होणार आहे.  नाट्यप्रेमींना नि:शुल्क आनंद घेण्याची संधी यातून मिळणार आहे. सहभागी नाट्यसंस्थेला पत्रकार संघातर्फे मोफत सभागृह आणि दहा हजार रुपयांचे अनुदान दिले जाणार आहे, नाट्य शुक्रवार उपक...

मुंबई कॉन्ट्रॅक्टर असोसिएशन ची हर्षद पाटीलला श्रद्धांजली

Image
      मुंबई कॉन्ट्रॅक्टर असोसिएशन ची हर्षद पाटीलला श्रद्धांजली  मुंबई / रमेश औताडे  कैलासवासी हर्षद पाटील यांना मुंबई कॉन्ट्रॅक्टर असोसिएशनच्या वतीने बांधकाम भवन येथे चार विभागांतील कंत्राटदारांनी एकत्र येत भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. शासनाने यापुढे अशा घटना टाळाव्यात आणि सर्व ठेकेदारांची प्रलंबित बिले तातडीने अदा करावीत अशी मागणी करण्यात आली. अध्यक्ष दादासाहेब ईंगळे, मुकुंद काकड, विजय निकम, नागेश शर्मा, प्रशांत पासलकर, दशरथ बोर्डवेकर, सुभाष पाटील व  मुंबईतील ठेकेदार यावेळी उपस्थित होते. इलाखा शहर विभाग, मध्य मुंबई विभाग, एकात्मिक घटक विभाग, उतर मुंबई विभाग,या चार विभागातील कंत्राटदारांनी बांधकाम भवन मुंबई  येथे येऊन भावपूर्ण श्रद्धांजली अर्पित केली. ईश्वरचरणी हीच प्रार्थना हर्षद पाटील यास शांती लाभो व अशा प्रकारची वेळ कोणत्याही ठेकेदारांवर येऊ नये ही आमची शासनाला विनंती आहे. यापुढे शासनाने याची काळजी घ्यावी व सर्व कंत्राटदारांची  प्रलंबित बिले तातडीने द्यावी ही संघटनेच्या वतीने मागणी केली.

छत कोसळणे आता महत्वाचे नाही

Image

या अगोदर अजून तपास सुरू आहेत...न्याय कधी मिळणार ?

Image

सर्पमित्रांच्या मागण्याबाबत सरकार सकारात्मक — महसूलमंत्री

Image
 सर्पमित्रांच्या मागण्याबाबत सरकार सकारात्मक  — महसूलमंत्री  मुंबई / रमेश औताडे  सर्पमित्र हे ग्रामीण व शहरी भागात सापांपासून नागरिकांचे प्राण वाचविण्याचे काम करतात. या सर्पमित्रांना स्वतंत्र ओळख मिळावी, तसेच त्यांच्याबाबतीत काही दुर्घटना घडल्यास त्यांना अथवा कुटुंबियांना अपघाती विमासारखी आर्थिक भरपाई मिळावी यासाठी वन विभागाच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांकडे शिफारस केली जाईल, त्यांच्या मागण्यांबाबत सकारात्मक विचार करण्यात येईल, असे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले. सर्पमित्रांच्या विविध मागण्यांसंदर्भात महसूल मंत्री बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात बैठक झाली. यावेळी वन विभागाचे अपर मुख्य सचिव मिलिंद म्हैसकर, राज्य वन्यजीव संरक्षक एम श्रीनिवास राव यांच्यासह अखिल भारतीय सर्पमित्र व प्राणीमित्र संघटनेचे अध्यक्ष प्रा. डॉ. संभाजी पाटील आणि प्रतिनिधी उपस्थित होते. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, सर्पमित्रांना दुर्घटनेत मृत्यू आल्यास १० ते १५ लाखांपर्यंत विमा भरपाई मिळावी यासाठी वन विभागामार्फत मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून निर्णय घे...

स्वच्छता दूत फाउंडेशन केंद्राचे थाटात उद्घाटन

Image
           स्वच्छता दूत फाउंडेशन केंद्राचे थाटात उद्घाटन  मुंबई / रमेश औताडे  स्वच्छ भारतचे स्वप्न सत्यात उतरवण्याचा वसा घेऊन स्वच्छता दूत फाउंडेशन कार्य करीत आहे. या फाउंडेशनच्या सफाई कामगार प्रशिक्षण केंद्राचे समाज भूषण सुदाम आवाडे यांच्या हस्ते नुकतेच थाटात उद्घाटन करण्यात आले. मानखुर्द येथील साहित्य रत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठेनगर येथे झालेल्या उद्घाटन सोहळ्याला फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष मुकेश पाखरे यांच्यासह प्रमुख पाहुणे म्हणून श्रावण नाटकर, ज्ञानदेव साठे, रमेश पांडव, रामचंद्र गायकवाड, अंद्रेश गायकवाड यांची उपस्थिती होती. यावेळी समाज भूषण सुदाम आवाडे यांनी स्वच्छता दूत फाउंडेशनच्या वतीने २० वर्षांपासून राबविण्यात आलेल्या स्वच्छता कामगारांच्या विविध उपक्रमांचे कौतुक केले. तसेच स्वच्छता कामगार केंद्राच्या माध्यमातून कामगारांच्या सुरक्षेसाठी प्रशिक्षित करून अधिक जोमाने कार्य करण्याचे आवाहन केले. यावेळी फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष मुकेश पाखरे यांनी, कोरोनाच्या महामारीत फाउंडेशनने राज्यभर केलेल्या स्वच्छता सेवेची सिने अभिनेते महानाय...

"जम्मू-काश्मीरमध्ये उर्दूची सक्ती नको" — डोगरा समाजाचा मुंबईत निषेध

Image
"जम्मू-काश्मीरमध्ये उर्दूची सक्ती नको" — डोगरा समाजाचा मुंबईत निषेध मुंबई / रमेश औताडे  "जम्मू-काश्मीरमध्ये उर्दू भाषेची सक्ती बंद झाली पाहिजे. डोगरी, काश्मीरी, हिंदी आणि इंग्रजी या स्थानिक भाषांना डावलून उर्दू भाषा लादण्याचा प्रयत्न हा अन्यायकारक आहे," असा संतप्त सूर डोगरा समाजाने आज मुंबई प्रेस क्लब येथे आयोजित पत्रकार परिषदेत मांडला. या पत्रकार परिषदेला डोगरा समाज ट्रस्टचे अध्यक्ष कृष्णा पंडित, उपाध्यक्ष गगन महोत्रा, सल्लागार  निधी डोगरा यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. पत्रकारांशी संवाद साधताना निधी डोगरा यांनी सांगितले की, “जम्मू-काश्मीरमध्ये उर्दू भाषिकांची संख्या केवळ ४.५ टक्के आहे. मात्र, प्रशासन आणि सार्वजनिक क्षेत्रात उर्दू भाषेचं प्राबल्य सक्तीने लादलं जातंय, हे आम्ही कधीच मान्य करणार नाही." डोगरा समाजाने केंद्र सरकारच्या ३७० कलम रद्द करण्याच्या निर्णयाचे समर्थन करत, त्या निर्णयानंतरही न्याय न मिळाल्याचे त्यांनी नमूद केले. "आज आम्हाला प्रश्न विचारायचा आहे की, इंग्रजी आणि हिंदीसारख्या डिजिटल व सार्वत्रिक भाषांपेक्षा उर्दूच का लादल...

केंद्रीय मंत्री नितीन गडकरींच्या दूरदृष्टीला टिळक पुरस्काराची पावती - अशोकराव टाव्हरे

Image
    केंद्रीय मंत्री नितीन गडकरींच्या दूरदृष्टीला टिळक पुरस्काराची            पावती  - अशोकराव टाव्हरे       दिल्ली येथे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे अभिनंदन करताना          कवी लेखक अशोकराव टाव्हरे मुंबई / रमेश औताडे  केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना जाहीर झालेला लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार म्हणजे त्यांचा दूरदृष्टीपणा आणि लोकहितकारी कार्याला मिळालेली पावती आहे. असे वक्तव्य विकासाचा राजमार्ग व हायवे ऑफ डेव्हलपमेंट या दोन्ही मराठी इंग्रजी पुस्तकाचे लेखक अशोकराव टाव्हरे यांनी केले. रस्ते, महामार्ग, पायाभूत सुविधा यामधून फक्त प्रगतीच नव्हे, तर नव्या भारताचा आत्मविश्वासही गडकरी उभा करत आहेत. हा सन्मान त्यांच्यासारख्या दूरदृष्टी असलेल्या व्यक्तिमत्वाला मिळणं, हे  अत्यंत प्रेरणादायी आहे. मागील वर्षी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना हा पुरस्कार देण्यात आला होता. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक, नागपुर शहराध्यक्षापासून सुरू झालेला नितीनजी गडकरींचा प्रवास, २५ वर्षे विधानपरिष...

कचरा दुर्गंधी मुळे नागरिक त्रस्त

Image
रमेश औताडे प्रतिनिधी – नवी मुंबई घणसोली पामबीच मार्गावर मालकंस ते साईबाबा मंदिर दरम्यानच्या भागात अनेक दिवसांपासून साफसफाई होत नसल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. रस्त्याच्या कडेला असलेल्या स्ट्रीट कचरा कुंडीतून कचरा रस्त्यावर सांडत असून त्यातून प्रचंड दुर्गंधी पसरत आहे. या दुर्गंधीमुळे परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. डासांची संख्या वाढली असून सर्दी-खोकल्यासारखे त्रास वाढत असल्याचे नागरिकांनी सांगितले. यामुळे रहदारी करणाऱ्यांनाही त्रास सहन करावा लागत आहे. नवी मुंबई महानगरपालिकेला नुकताच स्वच्छता पुरस्कार मिळाल्याचे जाहीर करण्यात आले असले तरी, प्रत्यक्षात अशा प्रकारची स्थिती पाहता, हा पुरस्कार कितपत योग्य आहे, असा सवाल आता स्थानिक नागरिक विचारत आहेत. "कचऱ्याची वेळेवर उचल होत नाही, वारंवार तक्रार करूनही काहीच परिणाम होत नाही," अशी प्रतिक्रिया एका स्थानिक रहिवाशाने दिली. प्रशासनाने तत्काळ लक्ष देऊन नियमित साफसफाई करावी आणि आरोग्य धोक्यात येणार नाही याची काळजी घ्यावी, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.

मुंबई मराठी पत्रकार संघात आता नाटकाची तिसरी घंटा वाजणार

Image
मुंबई मराठी पत्रकार संघात आता नाटकाची तिसरी घंटा वाजणार ‘ नाट्य शुक्रवार ’ उपक्रमाची मुंबई मराठी पत्रकार संघात घोषणा प्रायोगिक रंगभूमीसाठी खुले व्यासपीठ प्रेक्षकांना मोफत प्रवेश नाट्यशुक्रवार उपक्रमाची घोषणा करताना मंचावर मुंबई मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष संदीप चव्हाण, सोबत विश्वस्त देवदास मटाले, अभिनेते रविंद्र देवधर, कार्यवाह शैलेंद्र शिर्के, उपाध्यक्ष स्वाती घोसाळकर, पत्रकार नयना रहाळकर उपस्थित होते. मुंबई / रमेश औताडे  मुंबई मराठी पत्रकार संघाच्या सभागृहात आता नाटकाची तिसरी घंटा वाजणार आहे. महाराष्ट्रातील प्रायोगिक रंगभूमीला प्रोत्साहन देण्यासाठी ‘नाट्य शुक्रवार’ या अभिनव उपक्रमाची घोषणा आज मुंबई मराठी पत्रकार संघा तर्फे करण्यात आली. या उपक्रमाअंतर्गत, मुंबई मराठी पत्रकार संघाच्या सभागृहात दर महिन्याच्या चौथ्या शुक्रवारी महाराष्ट्रातील दर्जेदार प्रायोगिक नाट्याचे मोफत सादरीकरण होणार आहे. नवोदित व प्रायोगिक रंगकर्मींसाठी हे व्यासपीठ खुले असणार असून, नाट्यप्रेमींना नाट्यप्रयोगांचा नि:शुल्क आनंद घेण्याची संधी यातून मिळणार आहे. लोकमान्य सभागृहात पार पडलेल्या पत्रकार पर...

देशात सर्वात पहिले एफसीआरए राज्य ठरले महाराष्ट्र

Image
       देशात सर्वात पहिले एफसीआरए राज्य ठरले महाराष्ट्र मुंबई / रमेश औताडे परदेशातील दानशूर व्यक्ती, संस्था, सीएसआर कंपन्यांकडून गरजू रुग्णांच्या उपचारासाठी एफसीआरए निधी प्रमाणपत्र मिळवणारे महाराष्ट्र देशातील पहिलेच राज्य ठरले आहे. या परदेशी निधी सोबत मुख्यमंत्री सहायता निधीचा वापर करत आता गरजू रुग्णांच्या आरोग्याची काळजी घेणारे राज्य म्हणून महाराष्ट्राची नोंद झाली आहे. राज्यातील गरजू आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल रुग्णांना महागड्या वैद्यकीय उपचारांचा लाभ देता यावा यासाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्ष, कार्पोरेट कंपनी, रूग्णालय आणि त्यासोबत काही प्रमाणात रूग्णांचेही योगदान घेत आता राज्यातील आर्थिक मागास रुग्णास उपचार मिळणार आहेत. ज्या रुग्णांच्या उपचाराचा खर्च १० लाखांपेक्षा अधिक असेल, असे दुर्धर व गंभीर आजाराचे रुग्ण पात्र ठरणार आहेत. रूग्णांना कक्षा तर्फे बनविण्यात आलेल्या स्वतंत्र पोर्टल मार्फत अर्ज सादर करावा लागणार आहे. धर्मादाय  रुग्णालयांना त्यांच्या एकूण खाटांपैकी १० टक्के खाटा वार्षिक उत्पन्न १.८० लाखांपर्यंत असलेल्या कुटुंबांसाठी मोफत राखी...

अजितदादा, मला भावलेला परखड आणि मुरब्बी राजकारणी!

Image
  अजितदादा, मला भावलेला परखड आणि मुरब्बी राजकारणी!                                                                           -योगेश वसंत त्रिवेदी, ९८९२९३५३२१ . महाभारताच्या काळापासून आपल्या मुलांना पुढे आणण्याची एक प्रथा, परंपरा सुरु झाली आहे जी आजही प्रकर्षाने पुढे रेटण्याचा प्रयत्न होत असल्याचे दिसून येते. प्रचलित राजकारणात अशी नांवे घेण्याची आवश्यकता आहे असे वाटत नाही. ती ओघानेच समोर येतांना दिसतात. परंतु अशामुळे कुटुंबातील कार्यक्षम व्यक्तीला फटका बसतो. लाल किल्ल्यावरुन घराणेशाहीबाबत कितीही उच्चरवाने बोलण्यात येत असले तरी ही घराणेशाही अनिवार्य (नसली तरी) असल्याचे दिसून येते. आपल्या मुलांना पुढे आणण्याचा फटका...

मुख्यमंत्र्यांच्या संपर्क अधिकारी वीणा गावडेंचा ७५ वा वाढदिवस

Image
  मुख्यमंत्र्यांच्या संपर्क अधिकारी वीणा गावडेंचा ७५ वा वाढदिवस  मुंबई / रमेश औताडे  तीन मुख्यमंत्री, अनेक मंत्री, राज्यमंत्री, मुख्य सचिव, अनेक विभागीय सचिव यांच्या संपर्क अधिकारी राहिलेल्या वीणाताई गावडे यांचा ७५ वा अमृत महोत्सवी वाढदिवस त्यांची, मुलं, सुना आणि मित्रमैत्रिणींनी मोठ्या आनंदात, हर्षोल्हासाने साजरा केला. एक उत्कृष्ट मेहनती अधिकारी म्हणून माहिती जनसंपर्क कार्यालयाकडूनही त्यांना पुरस्कृत करण्यात आले होते. एक तत्पर, विश्वासार्ह आणि पत्रकार क्षेत्रातील सर्वांशी आपुलकीने वागणाऱ्या आदर्श संपर्क अधिकारी म्हणून त्या पत्रकारांमध्येही लोकप्रिय होत्या.   वीणाताईंच्या या अमृतमहोत्सवी वाढदिवसाच्या कार्यक्रमाला त्यांच्या नेरूळ, नवीमुंबई येथील त्यांच्या हसरा योगा ग्रुपने अतिशय उत्साहात त्यांचे ७५ दिव्यांनी औक्षण केले तसेच ग्रुपमधल्या महिलांनी अनेक कार्यक्रम सादर केले. यावेळी त्यांचे सहकारी आणि माजी संचालक देवेन्द्र भुजबळ, नितीन शिंदे, ज्योती लायजावाला आणि अनेक मान्यवर उपस्थित होते.

बेकायदेशीर बांधकाम थांबविण्याची जेष्ठ नागरिकांची मागणी

Image
  बेकायदेशीर बांधकाम थांबविण्याची जेष्ठ नागरिकांची मागणी मुंबई / रमेश औताडे महत्वाची कागदपत्र नसताना तसेच सीसी नसतानाही विकासक  बांधकाम करत आहे. संदर्भात पोलिस स्टेशन आणि वॉर्ड ऑफिसमध्ये तक्रार देखील दाखल केली आहे. तरीही बेकायदेशीर काम थांबवण्यासाठी आजपर्यंत त्यांच्याकडून देखील कोणतीही कारवाई केलेली नाही. तरी कृपया वरील बेकायदेशीर काम तात्काळ थांबवा, कारण यामुळे आमच्यासारख्या ज्येष्ठ नागरिकांचे जीवन अत्यंत वेदनादायक बनले आहे आणि आमच्या गृहिणी आणि लहान मुले आजारी पडत असल्याचे सोसायटीचे अध्यक्ष अशोक गुप्ता गुप्ता यांनी सांगितले. श्री रामानुज को.ऑप.हौ.सोसायटी , गुरुकृपा, ६ दीक्षित रोड (प), विले पार्ले,मुंबई या सोसायटीचे अध्यक्ष अशोक गुप्ता यांनी मुंबई महानगरपालिका  इमारत प्रस्ताव फाइल पी- १०९०२/२०२२/१८५ / केई, विलेपार्ले (पूर्व) येथील एफपी १८५, टीपीएस II येथील बेकायदेशीर बांधकामाबाबत माहिती देण्यासाठी पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. यावेळी गुप्ता म्हणाले आम्ही आमची सोसायटी १९९४ मध्ये विकत घेतली होती.आमच्या त्या जागेत आम्ही मीनल,माधवकुंज आणि रामानुज या ...

शाळा कॉलेज हॉटेल मधील अग्नि सुरक्षा ऑडिट

Image
शाळा कॉलेज हॉटेल मधील अग्नि सुरक्षा ऑडिट  राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्या विधानसभेतून सूचना मुंबई / रमेश औताडे  उंच शाळा इमारती, हॉटेल्स, गर्दीच्या बाजारपेठा यामुळे अग्निसुरक्षेच्या उपाययोजना अत्यावश्यक आहेत. शाळा इमारतींसह सर्व आस्थापनांची फायर ऑडिट तपासणी करून आवश्यक उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या जातील, असे नगरविकास, परिवहन, सामाजिक न्याय, वैद्यकीय शिक्षण, अल्पसंख्याक व औकाफ राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी विधानसभेत सांगितले. या प्रकरणी विधानसभा सदस्य मंगेश कुडाळकर यांनी लक्षवेधी सूचना मांडली होती. या चर्चेत विधानसभा सदस्य योगेश सागर यांनीही सहभाग घेतला. सदोष वीज प्रणालीमुळे किंवा इतर कारणामुळे लागलेल्या आगी विझविताना जी उपकरणे वापरली जातात त्याचे ऑडिट काटेकोर करावे. अग्निशमन ना-हरकत प्रमाणपत्र किंवा अग्निरोधक साहित्य परवाना नसलेल्यांना नोटीस काढली असली तरी त्याची अंमलबजावणी त्वरीत करण्यात यावी.  अग्निसुरक्षा पालन कक्षामार्फत  तपासणी केली जाते. अग्निसुरक्षा प्रमाणपत्र नसलेल्या आस्थापनांचा इंधन साठा जप्त करणे तसेच इंधन पुरवठा खंडित करण्याची कार्यवाही...

शेतकऱ्यांना पीक विमा मिळालाच पाहिजे

Image
             शेतकऱ्यांना पीक विमा मिळालाच पाहिजे          विधानसभेत कृषी राज्यमंत्री जयस्वाल यांचे निर्देश    मुंबई / रमेश औताडे  पीक विमा संदर्भात शेतकऱ्यांच्या तक्रारींचे पुनरावलोकन करून  शेतकऱ्यांना पीक विमा मदतीसाठी पात्र ठरवण्याचे योग्य तो निर्णय घेण्यात यावा असे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात येतील, असे कृषी राज्यमंत्री ॲड.आशिष जयस्वाल यांनी आज विधानसभेत लक्षवेधी सूचनेच्या उत्तरात सांगितले. कृषी राज्यमंत्री ॲड. जयस्वाल यांनी सांगितले, ज्या शेतकऱ्यांनी प्रधानमंत्री पीक विमा योजनेमध्ये सहभाग घेतला असून ज्यांची नुकसानीच्या पूर्व सूचना दिलेल्या आहेत अशा सर्व शेतकऱ्यांचे नैसर्गिक आपत्ती अंतर्गत घेण्यात आलेले पंचनामे गृहीत धरून नुकसान भरपाई देण्याबाबत पडताळणी करावी.   विमा कंपनीसोबत बैठक घेऊन शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाईच्या दाव्यांबाबत नियमानुसार तपासणी करावी. नाशिक जिल्ह्यातील रब्बी हंगामातील कांदा पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून ज्या शेतकऱ्यांनी प्रधानमंत्री पीक विमा योजना ...

झेड पी शाळेत आता मास्तर उपलब्ध करून देणार

Image
              विधानसभेत शिक्षण मंत्री भुसे यांची माहिती            झेड पी शाळेत आता मास्तर उपलब्ध करून देणार मुंबई / रमेश औताडे  राज्यात जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या पटसंख्येनुसार शिक्षक उपलब्ध करून देण्यात येतील, असे शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी अर्धा तास चर्चेच्या उत्तरादरम्यान सांगितले. याबाबत सदस्य भीमराव तापकीर यांनी अर्धा तास चर्चा उपस्थित केली होती. या चर्चेमध्ये सदस्य सर्वश्री सिद्धार्थ शिरोळे, कैलास पाटील यांनी सहभाग घेतला. शालेय शिक्षण मंत्री भुसे म्हणाले, विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून प्रत्येक शाळेत व परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येत आहेत. हे कॅमेरे आधुनिक तंत्रज्ञानाने सज्ज असतील याची काळजी घेण्यात येईल. जिल्हा नियोजन समितीचा पाच टक्के निधी शिक्षण क्षेत्रासाठी राखीव असतो. या निधीतूनही शाळांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. पुणे महानगरपालिकेच्या 492 शाळा आहेत, त्यापैकी 393 शाळांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत...

सहकार परिषदेचे मुंबईत भव्य आयोजन

Image
               सहकार परिषदेचे मुंबईत भव्य आयोजन मुंबई / रमेश औताडे  देशात सहकारातून अनेक प्रकारचा विकास होत आहे. या क्षेत्रात अजून प्रगती कशी करता येईल. नवीन आव्हानाचा सामना करताना नवीन तंत्रज्ञान कसे आत्मसात करावे यासाठी एका भव्य दिव्य सहकार परिषदेचे आयोजन मुंबईत केले असल्याची माहिती सहकार परिषदेचे आयोजक आनंदराव अडसूळ यांनी एका पत्रकार परिषदेत दिली. आंतरराष्ट्रीय सहकार वर्षाचे औचित्य साधून सहकार सेना व को-ऑपरेटीव्ह बँक एम्प्लॉईज युनियन, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने सहकार परिषदेचे आयोजन १६ जुलै रोजी सकाळी १० ते सायं ५ या वेळेत यशवंतराव चव्हाण सेंटर-सभागृहात होणार आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शुभ हस्ते आणि माजी केंद्रीय अर्थ राज्यमंत्री आनंदराव अडसूळ यांच्या अध्यक्षतेखाली परिषद संपन्न होईल. केंद्रीय सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, विधानपरिषद उपसभापती नीलम गोऱ्हे,  खासदार श्रीकांत शिंदे, सहकार मंत्री बाबासाहेब पाटील, उद्योग मंत्री उदय सामंत, सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट, सहकार राज्यमंत्री पंकज भोयर, शिवसेना रा...

मासळी व्यवसायाच्या रक्षणासाठी जनआक्रोश मोर्चा

Image
मासळी व्यवसायाच्या रक्षणासाठी जनआक्रोश मोर्चा  मुंबई / रमेश औताडे  मुंबई महानगरपालिकेच्या भूमिगत मासळी मंडई प्रकल्पाच्या विरोधात आणि पारंपरिक मासळी व्यवसायाचे रक्षण करण्याच्या मागणीसाठी अखिल महाराष्ट्र मच्छिमार कृती समितीने २२ जुलै रोजी सकाळी ११ वाजता कोळी जनआक्रोश मोर्चा काढण्याची घोषणा केली आहे. हा मोर्चा क्रॉफर्ड मार्केट येथून महापालिका मुख्यालयापर्यंत निघणार आहे. आझाद मैदान येथील मुंबई मराठी पत्रकार संघात  झालेल्या पत्रकार परिषदेत समितीचे अध्यक्ष देवेंद्र तांडेल, सरचिटणीस संजय कोळी, महिला अध्यक्षा नयना पाटील यांच्यासह विविध संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते. तांडेल म्हणाले की, सन १९७१ पासून कार्यरत असलेल्या पलटण रोड येथील मासळी मंडईला महापालिकेच्या धोरणांमुळे संकट निर्माण झाले आहे. संपूर्ण राज्यातून दररोज १५ हजार पेक्षा जास्त मासळी विक्रेते, व्यापारी, महिला आणि वाहतूकदार या मंडईत व्यवसाय करतात. येथे ८७ घाऊक व्यापारी व १५७ कोळी महिला विक्रेते आणि अन्य घटक कार्यरत आहेत. पालिकेने या भूखंडाचे आरक्षण रद्द करून तो भूखंड अवा डेव्हलपर्स या खाजगी व्यावसायिकाला केवळ ...

सुरक्षा रक्षक मंडळात कंत्राटदारांची मनमानी

Image
        सुरक्षा रक्षक मंडळात कंत्राटदारांची मनमानी मुंबई / रमेश औताडे  सुरक्षा रक्षक अधिनियम १९८१ च्या कायदाचा व नियमावलीचा सरकारला विसर पडल्यामुळे सुरक्षा रक्षक मंडळातील कारभार कंत्राटदाराच्या खिशात गेला आहे. अनेक सुरक्षा रक्षक दयनीय अवस्थेत जगात आहेत. सुरक्षा रक्षक मंडळाचे अधिकारी , शाखा प्रबंधक हे खाजगी सुरक्षा एजन्सी कंत्राटदारावर गांभीर्याने कारवाई करत नसल्याने खाजगी सुरक्षा एजन्सी कंत्राटदार कायदा खिश्यात घालून मनमानी करत आहेत. सुरक्षा रक्षक मंडळाचे अधिकारी व अध्यक्ष सचिव यांनी मंडळाच्या आनंदित आस्थापना ठेकेदारांकडून हस्तांतरित करुन मंडळाकडे घ्याव्यात , सुरक्षा रक्षक मंडळ यांच्या नोंदीत आस्थापना वरील खाजगी सुरक्षा एजन्सी चे कारखाने, कंपन्यांतील नियमबाह्य सुरक्षा रक्षक पुरविण्याचे वाढते अतिक्रमण रोखण्यात यावे अशी मागणी होत आहे. मात्र अध्यक्ष व सचिव यांचे मंडळावर लक्ष नसल्याने त्यांच्याखालील अधिकारी निरीक्षक क्लार्क मनमानी करत आहेत. पीएफ सरकारी नियमाप्रमाणे जमा केला जात नाही. खाजगी कंत्राटदार किती आहेत याची माहिती मंडळाकडे उपलब्ध नाही. खाजगी कंत्...

व्यस्त दिनक्रमातही पत्रकार आरोग्यासाठी जागरूक

Image
  व्यस्त दिनक्रमातही पत्रकारांनी आरोग्य तपासणीला दिले प्राधान्य मुंबई / रमेश औताडे  अखिल महाराष्ट्र राष्ट्रवादी जनरल कामगार युनियन आणि रोटरी क्लब ऑफ बॉम्बे नॉर्थ यांच्या संयुक्त विद्यमाने गुरुवारी मुंबई मराठी पत्रकार संघ, आझाद मैदान येथे आयोजित करण्यात आलेल्या मोफत आरोग्य तपासणी शिबिराला पत्रकार आणि त्यांच्या कुटुंबीयांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या उपक्रमात सुमारे २०० पेक्षा अधिक पत्रकार व त्यांच्या कुटुंबीयांनी घेतला. या शिबिराचे उदघाटन रोटरी क्लब ऑफ बॉम्बे नॉर्थचे अध्यक्ष कमल चोक्सी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी क्लबचे सचिव गिरीश वालावलकर, उपाध्यक्ष अशोक जोशी, माजी अध्यक्षा नफीसा खोराकीवाला, फिरोज कच्छवाला, सदस्या रसिदा अनिस, माधवी तन्ना, नर्गिस गौर, तसेच वोक्हार्ट फाउंडेशनच्या डायरेक्टर समिना खोराकीवाला, व्यवस्थापक जितेश रांभिया आणि अखिल महाराष्ट्र राष्ट्रवादी जनरल कामगार युनियनचे महाराष्ट्र अध्यक्ष सुभाष देसाई, तसेच मुंबई पदाधिकारी रमेश औताडे, नंदू घोलप,शिरीष वानखेडे, सुबोध शाक्यरत्न, सुरेश गायकवाड, सुरेश ढेरे,अल्पेश म्हात्रे हे पदाधिकारी उपस्थित होते...

कृषी क्षेत्रात ए आय तंत्रज्ञान आणि शेतकरी हिताचे निर्णय

Image
      कृषी क्षेत्रात ए आय तंत्रज्ञान आणि शेतकरी हिताचे निर्णय  महाॲग्री धोरण २०२५ - २०२९ अंतर्गत कृत्रिम बुद्धिमत्ता व आधुनिक तंत्रज्ञान वापरून शेती क्षेत्रात शाश्वत वाढ सुनिश्चित करत या धोरणासाठी ५०० कोटी रुपये तरतूद करण्यात आली आहे. अशी माहिती कृषी मंत्री ॲड. माणिकराव कोकाटे यांनी सांगितले. हवामान, मृदा, बाजारभाव, पिकांची स्थिती आदी डेटा एकत्र करून 'डिजिटल पायाभूत सुविधा उभारली जाणार आहे. फार्मर आयडी प्रणाली अंतर्गत १ कोटी ६ लाखाहून अधिक शेतकऱ्यांची नोंदणी पूर्ण झाली आहे. पीएम किसानसह सर्व योजनांसाठी फार्मर आयडी अनिवार्य करण्यात आले आहे.  राज्यात बोगस खते व बियाण्यांवरील कारवाईसाठी ६२  भरारी पथके कार्यरत आहेत. २०५ अप्रमाणित खत नमुने जप्त करण्यात आले असून, १८३लाखांचा १०४०  टन साठा जप्त करण्यात आला आहे. एकूण ७१ परवाने निलंबित व ६९ रद्द करण्यात आले आहेत. पिक विमा योजनेंतर्गत आतापर्यंत ३२ हजार ६९२ कोटी रुपयांची नुकसानभरपाई वितरित झाली असून, ७६ टक्के विमा हप्त्याची परतफेड झालेली आहे.  सुधारित योजना राबविल्याने राज्याचा ५ हजार कोटींचा खर्च...

ज्ञानदान करणाऱ्यांवर संघर्ष करण्याची वेळ येऊ नये - शरद पवार

Image
  ज्ञानदान करणाऱ्यांवर संघर्ष करण्याची वेळ येऊ नये - शरद पवार मुंबई / रमेश औताडे  शिक्षकांना त्यांच्या हक्कांसाठी संघर्ष करण्याची वेळ आली आहे.जे महाराष्ट्रासाठी भूषणावह नाही. सरकार फक्त आदेश काढते पण निधीची तरतूद करत नाही.  शिक्षकांचा प्रश्न आज किंवा उद्या मार्गी लावावा. असे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आझाद मैदानात शिक्षकांच्या आंदोलनाला भेट देत सांगितले. वाढीव अनुदानाच्या रक्कमेची तरतूद आणि जुनी पेन्शन योजना लागू  करावी यासाठी राज्यातील शिक्षकांनी आझाद मैदानावर आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार आझाद मैदानात आले होते.  मला ५६ वर्षांचा प्रशासकीय अनुभव आहे आणि निर्णय कसे घ्यायचे, निधीची तरतूद कशी करायची हे  चांगले माहीत आहे. त्यामुळे सरकारने तात्काळ निर्णय घ्यावा असे त्यांनी सांगितले. शरद पवार आता मैदानात उतरत शिक्षकांना पाठिंबा देणार आहेत म्हणून शिक्षक आनंदी होते. शरद पवार यांनी शिक्षक आंदोलनांना भेट देत इतर आंदोलनाला भेट दिली.  भर पावसात आंदोलने होतात. उन्हाळ्यात भर उन्हात अ...

कामगार नेते लक्ष्मणराव भोसले यांना कामगारमंत्र्यांची ग्वाही

Image
    कामगार नेते लक्ष्मणराव भोसले यांना कामगारमंत्र्यांची ग्वाही मंत्रालय प्रतिनिधी  रमेश औताडे  सुरक्षा रक्षक मंडळातील सुरक्षा रक्षकांना योग्य तो न्याय देण्यासाठी महाराष्ट्र राज्य सुरक्षा रक्षक आणि जनरल कामगार संघटनेने केलेल्या सर्व मागण्या बाबत सरकार योग्य तो निर्णय घेईल अशी ग्वाही कामगारमंत्री आकाश फुंडकर यांनी कामगार नेते व संघटनेचे अध्यक्ष लक्ष्मणराव भोसले यांना अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर सह्याद्री अतिथीगृह येथे एका बैठकी दरम्यान दिली. शासकीय आस्थापनेत प्रामुख्याने सुरक्षा रक्षक मंडळाचे सुरक्षा रक्षक घेतले पाहिजेत असा कायदा आहे. मात्र आरोग्य विभागाच्या नवीन सात शासन निर्णयामुळे सर्व गोंधळ झाला आहे. सुरक्षा रक्षक बल व मेस्को यांची सुरक्षा यंत्रणा घ्यावी असे त्या कायद्यात असल्याने राज्यातील  लाखो सुरक्षा रक्षकावर अन्याय होत आहे. त्यामुळे कायद्याची अंमलबजावणी प्रभावीपणे झालीच पाहिजे असे लक्ष्मणराव भोसले यांनी यावेळी कामगार मंत्र्यांना सांगितले. कामगारमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली  सुरक्षारक्षक कृती समितीची बैठक बुधवारी ९ जुलै रोजी सह्याद्री अतिथी...

पिक विमा उतरवला नसला तरी नुकसान भरपाई मिळणार

Image
         विमा उतरवला नसला तरी नुकसान भरपाई मिळणार मुंबई / रमेश औताडे  प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना केंद्र आणि राज्य शासनाच्या माध्यमातून नुकसान भरपाई म्हणून मदत दिली जाते. नुकसान झाले तर विमा कंपनीवर अवलंबून न राहता शासनामार्फत मदत दिली गेली पाहिजे, ही शासनाची भूमिका असून पीक विमा उतरवला नाही म्हणून शेतकरी नुकसान भरपाईपासून वंचित राहणार नाही, असे कृषी राज्यमंत्री ॲड.आशिष जयस्वाल यांनी विधान परिषदेत सांगितले. सदस्य रणजितसिंह मोहिते-पाटील यांनी सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मंजूर करण्यात आलेल्या पीक विमा रकमेबाबत प्रश्न विचारला होता. या अनुषंगाने झालेल्या चर्चेत सदस्य सतेज उर्फ बंटी पाटील यांनी सहभाग घेतला. राज्यमंत्री ॲड.जयस्वाल म्हणाले, सोलापूर जिल्ह्यातील यापूर्वी शेतकऱ्यांना झालेल्या नुकसानीच्या पीक विम्यासंदर्भात भरपाई दिली गेली आहे. उर्वरित ६९ हजार ९५४  विमा अर्जांसाठी ८१.८०  कोटी इतकी अतिरिक्त विमा नुकसान भरपाई मंजूर झाली आहे. ही रक्कम येत्या ३ ते ४ दिवसात वित्त विभागाकडून दिली जाईल, असे राज्यमंत्री ॲड.जयस्वाल ...