मुंबईतील ग्राहकांना एक विश्वासार्ह आणि दर्जेदार पर्याय



मुंबईतील ग्राहकांना एक विश्वासार्ह आणि दर्जेदार पर्याय
मुंबई / रमेश औताडे 

भारतातील आघाडीची दागिन्यांची कंपनी कल्याण ज्वेलर्सने मुंबईतील फिनिक्स मार्केटसिटी येथे आपल्या नवीन शोरूमचे उद्घाटन बॉलिवूड अभिनेत्री तब्बू यांच्या हस्ते केले. या नव्या शोरूममुळे मुंबईतील ग्राहकांना एक विश्वासार्ह आणि दर्जेदार पर्याय उपलब्ध झाला आहे.

उद्घाटनप्रसंगी तब्बू म्हणाल्या, “कल्याण ज्वेलर्सच्या ब्रँडमधील पारदर्शकता, विश्वास आणि ग्राहकाभिमुख सेवा ही नेहमीच प्रशंसनीय आहे. अशा प्रतिष्ठित ब्रँडसोबत जोडले जाणे याचा मला आनंद आहे.” शोरूमचे प्रमुख  रमेश कल्याणरमण यांनी सांगितले की, “मुंबईत ग्राहकांच्या वाढत्या गरजांनुसार आम्ही आमच्या सेवा आणखी विस्तारित करत आहोत. दर्जा, पारदर्शकता आणि ग्राहकांचा विश्वास ही आमची ओळख आहे.”

ऑफर अंतर्गत, ग्राहकांना २५ टक्के पर्यंत सूट तसेच दोन लाख रुपयांपर्यंतच्या खरेदीवर आकर्षक भेटवस्तू दिल्या जाणार आहेत. याशिवाय सर्व दागिन्यांसोबत ‘केडब्ल्यू अश्युअर सर्टिफिकेट’ देण्यात येणार असून, पारदर्शकतेची हमी दिली जाते.


Comments

Popular posts from this blog

विधेयक मागे न घेतल्यास देशव्यापी संपाचा इशारा!

राज्यातील आरोग्य विभागातील चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांबाबत सरकारने गंभीर व्हावे -- आमदार सचिन अहिर

मेघमल्हार संकुल अन् पुढील दिशा