सहकार परिषदेचे मुंबईत भव्य आयोजन
सहकार परिषदेचे मुंबईत भव्य आयोजन
मुंबई / रमेश औताडे
देशात सहकारातून अनेक प्रकारचा विकास होत आहे. या क्षेत्रात अजून प्रगती कशी करता येईल. नवीन आव्हानाचा सामना करताना नवीन तंत्रज्ञान कसे आत्मसात करावे यासाठी एका भव्य दिव्य सहकार परिषदेचे आयोजन मुंबईत केले असल्याची माहिती सहकार परिषदेचे आयोजक आनंदराव अडसूळ यांनी एका पत्रकार परिषदेत दिली.
आंतरराष्ट्रीय सहकार वर्षाचे औचित्य साधून सहकार सेना व को-ऑपरेटीव्ह बँक एम्प्लॉईज युनियन, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने सहकार परिषदेचे आयोजन १६ जुलै रोजी सकाळी १० ते सायं ५ या वेळेत यशवंतराव चव्हाण सेंटर-सभागृहात होणार आहे.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शुभ हस्ते आणि माजी केंद्रीय अर्थ राज्यमंत्री आनंदराव अडसूळ यांच्या अध्यक्षतेखाली परिषद संपन्न होईल. केंद्रीय सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, विधानपरिषद उपसभापती नीलम गोऱ्हे, खासदार श्रीकांत शिंदे, सहकार मंत्री बाबासाहेब पाटील, उद्योग मंत्री उदय सामंत, सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट, सहकार राज्यमंत्री पंकज भोयर, शिवसेना राष्ट्रीय सचिव कॅप्टन अभिजीत अडसूळ आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेचे यशस्वी प्रशासक विद्याधर अनास्कर यांचे सहकारी बँकांच्या सक्षमीकरण व समृध्द वाटचालीबाबत तसेच मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष तसेच गृहनिर्माण स्वयंपुनर्विकास समितीचे अध्यक्ष आमदार प्रवीण दरेकर यांचे गृहनिर्माण स्वयंपुनर्विकासबाबत तसेच विदर्भातील बुलाढाणा अर्बन पतसंस्थेचे अध्यक्ष राधेश्याम चांडक यांचे आधुनिक तंत्रज्ञान व पारदर्शक कारभाराबाबत तसेच सारस्वत बँकेचे अध्यक्ष गौतम ठाकूर यांचे बँक विलीनिकरणबाबत तसेच मुंबई महानगरपालिकेच्या उपायुक्त डॉ. प्राची जांभेकर यांचे महिला बचत गटाबाबत तसेच ज्ञानदीप पतसंस्थेचे अध्यक्ष जिजाबा पवार यांचे स्वयंसहायता गटाबाबत तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सहकारातून समृध्दीवर विशेष मार्गदर्शन होणार आहे.
Comments
Post a Comment