"जम्मू-काश्मीरमध्ये उर्दूची सक्ती नको" — डोगरा समाजाचा मुंबईत निषेध


"जम्मू-काश्मीरमध्ये उर्दूची सक्ती नको" — डोगरा समाजाचा मुंबईत निषेध
मुंबई / रमेश औताडे 

"जम्मू-काश्मीरमध्ये उर्दू भाषेची सक्ती बंद झाली पाहिजे. डोगरी, काश्मीरी, हिंदी आणि इंग्रजी या स्थानिक भाषांना डावलून उर्दू भाषा लादण्याचा प्रयत्न हा अन्यायकारक आहे," असा संतप्त सूर डोगरा समाजाने आज मुंबई प्रेस क्लब येथे आयोजित पत्रकार परिषदेत मांडला.

या पत्रकार परिषदेला डोगरा समाज ट्रस्टचे अध्यक्ष कृष्णा पंडित, उपाध्यक्ष गगन महोत्रा, सल्लागार  निधी डोगरा यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. पत्रकारांशी संवाद साधताना निधी डोगरा यांनी सांगितले की, “जम्मू-काश्मीरमध्ये उर्दू भाषिकांची संख्या केवळ ४.५ टक्के आहे. मात्र, प्रशासन आणि सार्वजनिक क्षेत्रात उर्दू भाषेचं प्राबल्य सक्तीने लादलं जातंय, हे आम्ही कधीच मान्य करणार नाही."

डोगरा समाजाने केंद्र सरकारच्या ३७० कलम रद्द करण्याच्या निर्णयाचे समर्थन करत, त्या निर्णयानंतरही न्याय न मिळाल्याचे त्यांनी नमूद केले. "आज आम्हाला प्रश्न विचारायचा आहे की, इंग्रजी आणि हिंदीसारख्या डिजिटल व सार्वत्रिक भाषांपेक्षा उर्दूच का लादली जाते?" असा सवाल त्यांनी सरकारला केला.

Comments

Popular posts from this blog

स्वराज पक्षाच्या रडारवर आता शिधावाटप दुकाने

विधेयक मागे न घेतल्यास देशव्यापी संपाचा इशारा!

शिक्षणमंत्रांच्या खोट्या आश्वासना विरोधात शिक्षकांचे आझाद मैदानात आंदोलन