बेकायदेशीर बांधकाम थांबविण्याची जेष्ठ नागरिकांची मागणी
बेकायदेशीर बांधकाम थांबविण्याची जेष्ठ नागरिकांची मागणी
मुंबई / रमेश औताडे
महत्वाची कागदपत्र नसताना तसेच सीसी नसतानाही विकासक बांधकाम करत आहे. संदर्भात पोलिस स्टेशन आणि वॉर्ड ऑफिसमध्ये तक्रार देखील दाखल केली आहे. तरीही बेकायदेशीर काम थांबवण्यासाठी आजपर्यंत त्यांच्याकडून देखील कोणतीही कारवाई केलेली नाही. तरी कृपया वरील बेकायदेशीर काम तात्काळ थांबवा, कारण यामुळे आमच्यासारख्या ज्येष्ठ नागरिकांचे जीवन अत्यंत वेदनादायक बनले आहे आणि आमच्या गृहिणी आणि लहान मुले आजारी पडत असल्याचे सोसायटीचे अध्यक्ष अशोक गुप्ता गुप्ता यांनी सांगितले.
श्री रामानुज को.ऑप.हौ.सोसायटी , गुरुकृपा, ६ दीक्षित रोड (प), विले पार्ले,मुंबई या सोसायटीचे अध्यक्ष अशोक गुप्ता यांनी मुंबई महानगरपालिका इमारत प्रस्ताव फाइल पी-१०९०२/२०२२/१८५/ केई, विलेपार्ले (पूर्व) येथील एफपी १८५, टीपीएस II येथील बेकायदेशीर बांधकामाबाबत माहिती देण्यासाठी पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती.
यावेळी गुप्ता म्हणाले आम्ही आमची सोसायटी १९९४ मध्ये विकत घेतली होती.आमच्या त्या जागेत आम्ही मीनल,माधवकुंज आणि रामानुज या तीन सोसायटी उभारल्या होत्या. त्यापैकी आमची रामानुज या सोसायटी मध्ये १५ कुटुंब राहत होते. आमच्या बिल्डिंग ला मान्यता २००६ मध्ये दिली होती. त्यात मीनल, माधवकुंज या दोन बिल्डिंग मधले अंतर कमी करून इमारतीची उंची वाढवून १२ मजले करून त्या दोन इमारती चे काम पूर्ण करून दिले आहे. परंतु आमच्या इमारतीचे मजले वाढवून दिले नाही.
Comments
Post a Comment