व्यस्त दिनक्रमातही पत्रकार आरोग्यासाठी जागरूक



  व्यस्त दिनक्रमातही पत्रकारांनी आरोग्य तपासणीला दिले प्राधान्य
मुंबई / रमेश औताडे 

अखिल महाराष्ट्र राष्ट्रवादी जनरल कामगार युनियन आणि रोटरी क्लब ऑफ बॉम्बे नॉर्थ यांच्या संयुक्त विद्यमाने गुरुवारी मुंबई मराठी पत्रकार संघ, आझाद मैदान येथे आयोजित करण्यात आलेल्या मोफत आरोग्य तपासणी शिबिराला पत्रकार आणि त्यांच्या कुटुंबीयांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या उपक्रमात सुमारे २०० पेक्षा अधिक पत्रकार व त्यांच्या कुटुंबीयांनी घेतला.

या शिबिराचे उदघाटन रोटरी क्लब ऑफ बॉम्बे नॉर्थचे अध्यक्ष कमल चोक्सी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी क्लबचे सचिव गिरीश वालावलकर, उपाध्यक्ष अशोक जोशी, माजी अध्यक्षा नफीसा खोराकीवाला, फिरोज कच्छवाला, सदस्या रसिदा अनिस, माधवी तन्ना, नर्गिस गौर, तसेच वोक्हार्ट फाउंडेशनच्या डायरेक्टर समिना खोराकीवाला, व्यवस्थापक जितेश रांभिया आणि अखिल महाराष्ट्र राष्ट्रवादी जनरल कामगार युनियनचे महाराष्ट्र अध्यक्ष सुभाष देसाई, तसेच मुंबई पदाधिकारी रमेश औताडे, नंदू घोलप,शिरीष वानखेडे, सुबोध शाक्यरत्न, सुरेश गायकवाड, सुरेश ढेरे,अल्पेश म्हात्रे हे पदाधिकारी उपस्थित होते. 

हृदयविकार व रक्तदाब , मधुमेह , ईसीजी, व हिमोग्लोबिन , नेत्र  तपासणीनंतर गरजूंना मोफत औषधांचे वाटप आणि चष्म्यांचे वाटप करण्यात आले. पत्रकारांच्या व्यस्त आणि तणावपूर्ण दिनचर्येमध्ये वेळेवर आरोग्य तपासणी होणे आवश्यक आहे, यासाठी अशा प्रकारचे उपक्रम अत्यंत उपयुक्त ठरतात असे वोक्हार्ट फाउंडेशनच्या समिना खोराकीवाला यांनी सांगितले.


Comments

Popular posts from this blog

विधेयक मागे न घेतल्यास देशव्यापी संपाचा इशारा!

राज्यातील आरोग्य विभागातील चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांबाबत सरकारने गंभीर व्हावे -- आमदार सचिन अहिर

मेघमल्हार संकुल अन् पुढील दिशा